देहली – सनातन संस्थेच्या वतीने देहलीच्या सैदुलाजाब येथील ‘लिटिल वंस पब्लिक स्कूल’मध्ये ‘नैतिक शिक्षण’ या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. या मार्गदर्शनाचा इयत्ता ३ री ते ५ वीपर्यंतच्या अनेक विद्यार्थ्यांनी लाभ घेतला. या वेळी ‘जीवनाचा उद्देश, जीवन कसे जगावे ? जीवनात घडणार्या विविध प्रसंगांना सामोरे कसे जावे ? शिक्षणाचा उद्देश काय आहे ? विद्यार्जन म्हणजे काय ?’, इत्यादींविषयी मार्गदर्शन करण्यात आले.
क्षणचित्रे
१. कार्यक्रमाच्या वेळी मुलांना प्रश्न विचारण्यात आले, तसेच योग्य उत्तरे देणार्या मुलांना भेटवस्तू देण्यात आल्या.
२. शाळेच्या प्राचार्या शोम्पा घोष चौधरी यांनी कार्यक्रमाचे कौतुक केले आणि त्यांनी ‘अशाच प्रकारचे कार्यक्रम पुढेही घ्या’, असे सांगितले.