रामनाथी (गोवा) – राजकोट (गुजरात) येथील पुनरुत्थान विद्यापिठाचे माजी संयोजक आणि ‘भारतीय शिक्षण मंचा’चे ज्येष्ठ कार्यकर्ते श्री. पंकज बाबरिया यांनी २६ जुलै २०२२ या दिवशी रामनाथी (गोवा) येथील सनातन आश्रमाला सदिच्छा भेट दिली. या वेळी सनातनच्या साधिका कु. निधी देशमुख यांनी त्यांना आश्रमात चालणार्या राष्ट्र आणि धर्म यांच्याविषयीच्या कार्याची माहिती दिली.
श्री. पंकज बाबरिया यांनीही कार्याविषयीची माहिती जिज्ञासेने जाणून घेतली. ‘समाजाने दिलेल्या अर्पणाचा आश्रमात चांगल्या प्रकारे विनियोग केला जातो, हे आश्रम पाहून लक्षात आले. भारतीय शिक्षण पद्धतीनुसार येथे साधकांना घडवले जात आहे. हिंदु संस्कृतीविषयी चांगल्या प्रकारे समजावले जाते, हे पाहून चांगले वाटले’, असे श्री. बाबरिया म्हणाले.