
रामनाथी (गोवा) – येथील सनातनच्या आश्रमात ‘श्री. अशोक भांड यांचा साधनाप्रवास (खंड २)’ या सनातनच्या मराठी भाषेतील ग्रंथाचे प्रकाशन सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या शुभहस्ते १३ जुलै २०२२ या दिवशी करण्यात आले. अत्यंत कठीण शारीरिक स्थिती असूनही सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले या सोहळ्याला उपस्थित राहिले. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचे गुरु आणि इंदूर येथील थोर संत प.पू. भक्तराज महाराज यांचे इंदूर येथील श्री. अशोक भांड हे भक्त आहेत.
