मंदाकिनी डगवार, सनातन संस्था हिंदु राष्ट्रासाठी योगदान देणे, ही श्री गुरूंच्या समष्टी रूपाची सेवा ! – पू. (श्रीमती) मंदाकिनी डगवार, सनातन संस्था

पू. (श्रीमती) मंदाकिनी डगवार

संभाजीनगर – प्रत्येकाने धर्मशिक्षण घेऊन आणि धर्माचरण करून धर्मनिष्ठ समाजाची निर्मिती अन् धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राची स्थापना यांसाठी कृतीशील झाले पाहिजे. काळानुसार हिंदु राष्ट्रासाठी योगदान देणे, ही श्री गुरूंच्या समष्टी रूपाची सेवाच आहे, असे प्रतिपादन सनातनच्या संत पू. (श्रीमती) मंदाकिनी डगवार यांनी वासंती मंगल कार्यालय येथे झालेल्या गुरुपौर्णिमा महोत्सवाच्या वेळी केले. श्री वरद गणेश मंदिर, समर्थनगर, वासंती मंगल कार्यालय, बीड बायपास, बागडे पाटील लॉन्स, चित्तेपिंपळगाव आणि श्री स्वामी समर्थ मंदिर, अंबड, जालना येथे सनातन संस्थेच्या वतीने नुकताच गुरुपौर्णिमा महोत्सव भावपूर्ण वातावरणात पार पडला.

गुरुपौर्णिमा महोत्सवाला उपस्थित जिज्ञासू

या वेळी मंदिर सरकारीकरणामुळे होणारे विविध मंदिरांतील भ्रष्टाचार, त्यासाठी हिंदु विधीज्ञ परिषदेच्या माध्यमातून देत असलेल्या लढा यांविषयी हिंदु विधीज्ञ परिषदेचे संस्थापक सदस्य आणि पू. (अधिवक्ता) सुरेश कुलकर्णी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. वासंती मंगल कार्यालय येथे झालेल्या महोत्सवाला निवृत्त जिल्हा न्यायाधीश पू. सुधाकर चपळगावकर यांची वंदनीय उपस्थिती लाभली होती. या महोत्सवाचा ४०० हून अधिक जिज्ञासूंनी लाभ घेतला.

 

क्षणचित्र

श्री वरद गणेश मंदिराचे व्यवस्थापक श्री. देशमुख हे कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यांना कार्यक्रम पुष्कळ आवडला. ‘तुमचे असेच उपक्रम प्रत्येक वेळी येथे घेत जा, म्हणजे मंदिरात येणार्‍या भाविकांना याचा लाभ होईल’, असे त्यांनी सांगितले.

Leave a Comment