यवतमाळ जिल्ह्यात ४ ठिकाणी महोत्सव भावपूर्ण वातावरणात साजरा !

यवतमाळ – हिंदु धर्माला उत्पत्ती, स्थिती आणि लय ही बंधने लागू होत नाहीत. हिंदु धर्माचा नाश कधीही होऊ शकत नाही. हिंदु धर्मरक्षणासाठी प्रयत्न केल्याने आपली साधना होणार आहे, असे मार्गदर्शन यवतमाळ येथील गुरुपौर्णिमा महोत्सवाला उपस्थित असणारे प्रमुख अतिथी श्री. सूरज गुप्ता यांनी केले. सनातन संस्थेच्या वतीने येथे ४ ठिकाणी गुरुपौर्णिमा महोत्सव भावपूर्ण वातावरणात पार पडला. एकूण ५०० जणांनी याचा लाभ घेतला.

वणी येथील गुरुपौर्णिमा महोत्सवात श्री. अनुराग काठेड म्हणाले, ‘‘धर्मरक्षणासाठी आपण संघटित होऊन कार्य करणे आवश्यक आहे.’’

 

हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी एकत्रित येऊन कार्य केल्यास
हिंदु राष्ट्राची स्थापना लवकर होईल ! – अधिवक्ता अजय चमेडिया

अधिवक्ता अजय चमेडिया

सनातन धर्म अनंत आणि अविनाशी आहे; मात्र पाश्चात्त्यांच्या परंपरांचे अंधानुकरण केल्याने सनातन धर्माची हानी होत आहे. सर्व हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी एकत्रित येऊन कार्य केल्यास हिंदु राष्ट्राची स्थापना लवकर होऊ शकते.

Leave a Comment