परात्परगुरु डॉ. आठवले यांचा साधना प्रवास : खंड १, परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांची गुरुभेट आणि त्यांनी गुरूं कडून शिकणे’, या सनातन-निर्मित ग्रंथाचे प्रकाशन !

कोल्हापूर येथे गुरुपौर्णिमा महोत्सव

ग्रंथ प्रकाशन करतांना डावीकडून श्री. शरद माळी, पू. सदाशिव (भाऊ) परब, पू. आधुनिक वैद्या (श्रीमती) शरदिनी कोरे आणि श्री. आनंदपाटील

कोल्हापूर – कोल्हापूर शहरात राजारामपुरी येथील ‘इंद्रप्रस्थ सांस्कृतिक भवन’ येथे गुरुपौर्णिमा महोत्सव आयोजित करण्यात आला होता. या महोत्सवात सनातन-निर्मित ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा साधना प्रवास : खंड १, परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांची गुरुभेट आणि त्यांनी गुरूं कडून शिकणे’, या मराठी भाषेतील ग्रंथाचे प्रकाशन सनातनच्या संत पू. आधुनिक वैद्या (श्रीमती) शरदिनीकोरे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या प्रसंगी सनातनचे संत पू. सदाशिव (भाऊ) परब, बांधकाम व्यावसायिक आणि उद्योजक श्री. आनंद पाटील (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के), तसेच हिंदुत्वनिष्ठ श्री. शरदमाळी उपस्थित होते. या ग्रंथाचे मनोगत सूत्रसंचालक आणि सनातनच्या साधिका सौ. मेघमाला जोशी यांनी वाचून दाखवले.

Leave a Comment