वर्धा, १४ जुलै (वार्ता.) – सनातन संस्थेच्या वतीने १३ जुलै या दिवशी येथील संताजी सभागृह आणि यमुना लॉन, तर हिंगणघाट येथील संत कँवरराम भवन या ३ ठिकाणी चैतन्यमय वातावरणात ‘गुरुपौर्णिमा महोत्सव’ साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने जिज्ञासू उपस्थित होते.
आज हिंदूंचा धर्माप्रतीचा अभिमान आणि निष्ठा न्यून झाल्यामुळे हिंदूंवर अनेक आघात होत आहेत. धर्म हा राष्ट्राचा प्राण आहे आणि म्हणून धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी एकत्रित प्रयत्नांची दिशा स्पष्ट व्हावी, हा उद्देश ठेवून कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर वक्त्यांनी ‘धर्मनिष्ठ समाजाची निर्मिती आणि धर्माधारित हिंदु राष्ट्राच्या स्थापनेची आवश्यकता’ या विषयावर मार्गदर्शन केले.