गुरुपौर्णिमेनिमित्त ‘ऑनलाईन’ विशेष सत्संग पार पडला !
मंगळुरू (कर्नाटक) – ‘गुरु’ या शब्दात ‘गु’ म्हणजे अज्ञान, ‘रु’ म्हणजे प्रकाश, म्हणजे अज्ञान दूर करून ज्ञानाकडे घेऊन जाणारे तेच गुरु ! अशा गुरूंचे शिष्य होणे, हे महान भाग्य आहे. जो तन, मन, धन आणि प्रसंगी सर्वस्व अर्पण करण्यास सिद्ध असतो, तोच खरा शिष्य असतो. त्यासाठी आपण सर्वांनी शक्य तेवढी गुरुसेवा करण्याचा प्रयत्न करावा आणि गुरूंविषयी श्रद्धा-भक्तीभाव निर्माण करावा. अशी संधी गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने मिळते. त्यामुळे समस्त हिंदूंनी गुरुपौर्णिमेला उपस्थित राहून गुरुतत्त्वाचा लाभ घ्यावा, असे मार्गदर्शन सनातन संस्थेचे धर्मप्रचारक पू. रमानंद गौडा यांनी केले.
सनातन संस्थेच्या वतीने १० जुलै या दिवशी गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने ‘ऑनलाईन’ विशेष सत्संग आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी पू. रमानंद गौडा यांनी गुरु-शिष्य परंपरेविषयी मार्गदर्शन केले. या सत्संगाचा लाभ ३ सहस्रांहून अधिक जणांनी घेतला.