
पनवेल – भारतीय वायूसेनेतील निवृत्त वरिष्ठ अधिकारी एअर मार्शल सतीश गोविंद इनामदार यांनी देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमास नुकतीच भेट दिली. सनातन संस्थेचा आश्रम, साधकांची सेवा करण्याची तळमळ, आश्रमातील शिस्त हे सर्व पाहून ते भारावून गेले. त्यांनी स्वत:चा अमूल्य वेळ देऊन सर्व माहिती अत्यंत जिज्ञासेने जाणून घेतली. या वेळी पू. शिवाजी वटकर यांनी इनामदार यांना हिंदु धर्मासंबंधी ग्रंथ भेट दिले.
१. (निवृत्त) एअर मार्शल सतीश इनामदार
यांनी सनातनचा आश्रम आणि साधक यांना गौरवले !
१.अ. साधक प्रतिदिन स्वतःकडून झालेल्या चुका आश्रमातील फलकावर लिहितात. हे पाहून त्यांना पुष्कळ विशेष वाटले. त्यांनी वायूसेनेच्या नोकरीमुळे अनेक ठिकाणी भ्रमंती केली. ‘स्वत:कडून झालेल्या चुका लिहिण्याचा भाग कुठेच पाहिला नाही’, असे ते उत्स्फूर्तपणे म्हणाले.
१.आ. स्वयंपाकघरातील ‘First in First Out’ (आधी आलेली वस्तू आधी संपवण्याच्या) संदर्भातील कार्यपद्धतीचे त्यांनी कौतुक केले. (शिल्लक राहिलेला अन्नपदार्थ प्रथम संपवण्याची आश्रमात कार्यपद्धत आहे. – संकलक)
१.इ. अन्य वर्तमानपत्रांप्रमाणे ‘दैनिक ‘सनातन प्रभात’च्या कार्यालयाला वर्षभर एकही दिवस सुट्टी नसते’, हे ऐकून आणि ‘साधकांची कार्याप्रतीची तळमळ’ पाहून त्यांना पुष्कळ आश्चर्य वाटले.