साधकाच्या घरी असलेल्या देवघरातील परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या छायाचित्रामध्ये झालेले पालट आणि आलेल्या अनुभूती

अनुक्रमणिका

 

१. देवघरातील परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या
छायाचित्राला नमस्कार करतांना त्यांच्या छायाचित्रामध्ये
पालट जाणवणे, तसेच परात्पर गुरुदेवांच्या उजव्या गालावर अष्टगंधाचा
पट्टा लावल्याप्रमाणे स्पष्ट दिसत असून हे छायाचित्र पुष्कळ मनोहारी दिसणे

साधारण १२ वर्षांपूर्वी मी कोची (केरळ) येथे रहात असतांना मला परात्पर गुरु डॉ. आठवले यांची काही छायाचित्रे एका साधकाकडून संगणकीय पत्राद्वारे मिळाली होती. त्या वेळी मी घरी राहूनच कार्यालयीन काम करत होतो. मला परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे सतत दर्शन व्हावे; म्हणून मी काम करत असलेल्या खोलीत त्यांची छायाचित्रे सर्वत्र लावली होती. नंतर मी नोकरी सोडून पूर्णवेळ साधना चालू केली. तेव्हा मी त्यांतील २ छायाचित्रे घरी (किर्लाेस्करवाडी, जिल्हा सांगली) आई-बाबांना (सौ. रोहिणी रमेश लुकतुके आणि श्री. रमेश शंकर लुकतुके (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के) यांना दिली होती. आईने त्यांपैकी एक छायाचित्र देवघरात ठेवले आहे. मी ४ वर्षांनी घरी आल्यावर देवघरातील परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या छायाचित्राला नमस्कार करतांना मला त्यांच्या छायाचित्रामध्ये पालट जाणवला. परात्पर गुरुदेवांच्या उजव्या गालावर चंदन किंवा अष्टगंध लावल्याप्रमाणे पट्टा स्पष्ट दिसत होता आणि हे छायाचित्र पुष्कळ मनोहारी दिसले. ‘ते पुन:पुन्हा पहात रहावे’, असे मला वाटले.

 

२. श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ म्हणाल्या…

मी परात्पर गुरुदेवांचे छायाचित्र असलेल्या त्या चौकटीचे छायाचित्र काढून श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांना पाठवले. तेव्हा त्या मला म्हणाल्या, ‘‘छायाचित्रात सुंदर पालट झाले आहेत.’’

 

३. घरामध्ये परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे अस्तित्व जाणवणे आणि विविध अनुभूती येणे

श्री. श्रीराम लुकतुके

३ अ. फरशीला ओल्या चंदनाचा दैवी सुगंध येणे

 

किर्लाेस्करवाडी, सांगली येथील घरातील देवघरासमोर डोके टेकवून नमस्कार करतांना तेथील फरशीला ओल्या चंदनाचा दैवी सुगंध येतो.

३ आ. घर अनेक मास बंद असूनही तिथे एवढे दिवस कोणीही रहात नसल्याप्रमाणे न वाटणे

प्रत्यक्षात आम्ही सर्वजण सेवेसाठी विविध ठिकाणी रहात असल्याने घर अनेक मास बंद असते. वर्षातील अनेक मास घर बंद असले, तरी बंद किंवा कुणीही रहात नसलेल्या वास्तूमध्ये आल्यासारखे वाटत नाही.

३ ई. परत्पर गुरु डॉ. आठवले यांनी कुटुंबियांना पदोपदी आणि क्षणोक्षणी सांभाळणे

‘पदोपदी आणि क्षणोक्षणी परात्पर गुरुदेवच आम्हाला सांभाळत आहेत’, याची अनुभूती आम्ही कुटुंबीय घेत आहोत. परात्पर गुरुदेवांच्या कृपावर्षावाविषयीचे असे अगणित प्रसंग आहेत.

‘हे साक्षात् श्रीहरि (गुरुदेवजी), आपणाला अपेक्षित अशी साधना आम्हा सर्व साधकांकडून घडू दे आणि माझा प्रत्येक श्वास श्रीगुरुचरणांच्या सेवेत आणि श्रीगुरूंच्या अनुसंधानात घेतला जाऊ दे’, अशी आपल्या चरणी प्रार्थना करतो.

– श्रीहरि दास,
श्री. श्रीराम लुकतुके, देहली सेवाकेंद्र, देहली. (१५.२.२०२२)

४. घरी चोरी झाल्यावर आईने एकटीने कठीण
प्रसंग हाताळणे आणि गुरुकृपेने तिला स्थिर रहाता येणे

दोन वर्षांपूर्वी आमच्या घरी मोठी चोरी झाली. दुपारी शेजाऱ्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी माझ्या आईला (सौ. रोहिणी लुकतुके) तसे कळवले. आई संध्याकाळी घरी पोचली आणि तिने पोलीस तक्रार आदी प्रक्रिया चालू केली. त्या वेळी ती. बाबांचा अपघात झाल्याने आणि मी सेवेसाठी देहलीला असल्याने आईने एकटीने सर्व परिस्थिती स्वीकारून प्रसंग हाताळला. परात्पर गुरु डॉ. आठवले हे शेजाऱ्यांच्या रूपात धावून आले. गावात पोलीस ठाणे नसल्याने तक्रार करून येणे, पंचनामा आदी सर्व होईपर्यंत रात्रीचा दीड वाजला. त्या वेळी आई घरी एकटी असल्याने शेजारच्या लोकांनी दुसऱ्या दिवशी रात्री आईला त्यांच्याकडे झोपायला बोलावले; परंतु ‘मला एकटीला भीती वाटणार नाही’, असे सांगून ती एकटीच राहिली. त्याच्या मागील मूळ कारण घरातील परात्पर गुरुदेवांचे दैवी अस्तित्व हेच आहे. या चोरीमध्ये आईचे मोठे दागिने गेले; पण परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने आईच्या मनाची स्थिरता चांगली होती. प्रत्यक्षात ‘ज्या दिवशी चोरी झाली त्याच्या आदल्या दिवशी आईला उद्या घरी जाऊया’, असा विचार आला होता; परंतु गुरुदेवांच्या कृपेने काही कारणास्तव येणे रहित झाले, अन्यथा एकटी महिला पाहून तिच्या जीवितालाही धोका निर्माण होऊ शकला असता; कारण बाजूचे घरही बंद असून तिथेही चोरी झाली होती. – श्री. श्रीराम लुकतुके, देहली सेवाकेंद्र, देहली. (१५.२.२०२२)

Leave a Comment