१. आश्रमातील ध्यानमंदिरात बसल्यावर सकारात्मकता वाढली आणि मन हलके झाले !
‘ध्यानमंदिरात ध्यानास बसल्यावर आवरण अल्प झाले ’, असे वाटले. नकारात्मकता न्यून होऊन सकारात्मकता वाढली आणि ‘मन हलके झाले’, असे जाणवले.’ – श्री. किशोर पिलाजी पडवळ (व्यावसायिक), खोपोली, रायगड.
२. ‘आश्रम पाहून ईश्वराचे अस्तित्व अनुभवण्यास मिळाले.’ – श्री. जनार्दन सखाराम जाधव, अध्यक्ष, बाबू मामा सामाजिक प्रतिष्ठान, खोपोली, रायगड.
३. ‘आश्रम पहातांना ‘न भूतो न भविष्यति ।’ असे सुंदर दैवी कार्य आहे’, असे वाटले.’ – श्री. अमोल म. शिंदे, भूमी संरक्षण जिल्हा संयोजक, हिंदु जागरण मंच, नगर, महाराष्ट्र.
४. ‘आश्रम पाहून मनाला समाधान प्राप्त झाले. आश्रमातील नियोजन सर्वाेत्कृष्ट वाटले.’ – श्री. बाळकृष्ण राजाराम बाईत, कात्रण, पोफळवणे, दापोली, जिल्हा रत्नागिरी.
५. ‘आश्रम पाहून ‘पुरातन हिंदु संस्कृतीचे जतन आणि संवर्धन होऊ शकते’, असा विश्वास वाढला.’ – श्री. उल्हास रजनीनाथ वडोदकर, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद, मुंबई विभाग, बोरीवली (प.), मुंबई.