हिंदुत्वनिष्ठांची रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला भेट आणि अभिप्राय !

दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाला उपस्थित हिंदुत्वनिष्ठांची रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिली. त्यांचे आश्रमाविषयीचे मत जाणून घेऊया.

रामनाथी, गोवा येथील सनातनचा आश्रम पाहून धर्मप्रेमींनी दिलेले अभिप्राय

१. आश्रमात आपुलकीने आणि आपलेपणाने होणारे आदरातिथ्य मनाला भावणारे आहे !

‘आश्रम पहातांना आश्रमातील वातावरण शांत आणि प्रसन्न वाटले. सर्व साधकांमध्ये उत्साह आणि आत्मविश्वास आढळला. साधकांमध्ये ‘नम्रता अन् सात्त्विकता’ विशेषत्वाने जाणवली. शिस्त आणि नीटनेटकेपणा जाणवला.

आपुलकीने आणि आपलेपणाने होणारे आदरातिथ्य मनाला भावणारे आहे. प्रत्येक साधक आपल्यावर असलेले दायित्व श्रद्धेने आणि आस्थेने पूर्ण करतात. त्यांच्यातील ज्ञानलालसा अन् जिज्ञासा वाखाणण्याजोगी आहे.’

– श्री. दुर्गेश जयंत परुळकर (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के), व्याख्याते आणि लेखक, डोंबिवली (पूर्व), ठाणे.

२. आश्रमातील सर्व साधकांचे प्रसन्न हास्य पाहून मन प्रसन्न झाले !

‘सर्वांत महत्त्वाची अनुभूती, म्हणजे सर्व साधकांचे प्रसन्न हास्य ! त्यामुळे मनही प्रसन्न झाले. आश्रमातील स्वच्छता पाहून आणि सर्व साधकांची सेवा करण्याची वृत्ती पाहून खरेच आश्चर्य वाटले. या सर्वांवर प्रेम करणाऱ्या आणि त्यांना शिस्त शिकवणाऱ्या परम पूज्य आदरणीय आठवलेजींना शिरसाष्टांग नमस्कार !’

– सौ. मेधा दुर्गेश परुळकर, डोंबिवली (पूर्व), ठाणे.

३. ‘आश्रमात पुष्कळ सात्त्विकता जाणवली, तसेच आश्रमातील वातावरण चैतन्यदायी आहे.’ – श्री. किरण भालचंद्र कुलकर्णी, कागल, कोल्हापूर.

४. ‘आश्रम हिंदु धर्माचे विद्यापीठ व्हावे’, असे वाटले.’ – अधिवक्ता जगदीश हाके, नांदेड, महाराष्ट्र.

५. ‘आश्रम पाहून येथे दिव्य शक्ती असल्यासारखे वाटले.’ – श्री. श्रीराज जगन्नाथ चक्रवार, जिल्हा उपाध्यक्ष, भारतीय जनता पक्ष, युवा मोर्चा, नांदेड.

६. ‘आश्रम पाहून ‘साक्षात् मंदिरामध्ये आलो असून, येथे दैवी शक्ती आहेत’, असे जाणवले.’ – श्री. गणेश डी. महाजन, उपाध्यक्ष, जागतिक आर्य वैश्य महासभा, वझिराबाद, नांदेड.

७. ‘आश्रम मंदिर झाले आहे. इतके चैतन्य कुठेच जाणवले नाही.’ – श्री. स्वागत श्रीधर गांवस, सदस्य, विश्व हिंदु परिषद, आमोणा, डिचोली, गोवा.

 

आश्रमातील सूक्ष्म-जगताविषयीचे प्रदर्शन पाहून धर्मप्रेमींनी दिलेले अभिप्राय

१. ‘जीवनाचे मूळ काय आहे ?’, ते कळले. ‘कसे जगायचे ?’, ते कळले.’ – श्री. स्वागत श्रीधर गांवस, आमोणा, डिचोली, गोवा.

२. ‘सूक्ष्म-जगताविषयी आज माहिती मिळाली. त्यामुळे ‘स्थुलापेक्षा सूक्ष्म किती प्रचंड आहे’, हे आज जाणवले.’ – श्री. जनार्दन सखाराम जाधव, अध्यक्ष, बाबू मामा सामाजिक प्रतिष्ठान, खोपोली, रायगड.

Leave a Comment