नेपाळमधील हिंदुत्वनिष्ठांकडून संत आणि धर्मप्रेमी यांचा सन्मान !
अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाच्या व्यासपिठावर नेपाळ येथील ‘हिंदु विद्यापिठा’चे अध्यक्ष डॉ. भोलानाथ योगी आणि पोखरा येथील ‘विश्व हिंदु महासंघा’चे जिल्हाध्यक्ष श्री. शंकर खराल यांनी हाँगकाँग येथील उद्योजक श्री. दयाल हरजानी, हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद़्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, हिंदु जनजागृती समितीचे कर्नाटक येथील सनातनचे धर्मप्रचारक पू. रमानंद गौडा यांना रुद्राक्षाची माळ घालून आणि नेपाळी टोपी घालून सन्मान केला, तसेच सनातनच्या धर्मप्रचारक सद़्गुरु (सुश्री) स्वाती खाडये यांना रुद्राक्ष माळ आणि भेटवस्तू देऊन सन्मान केला.



