१२ ते १८ जून २०२२ या कालावधीत विद्याधिराज सभागृह, रामनाथी, गोवा येथे दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन चालू आहे. या अधिवेशनात सहभागी झालेले संत आणि हिंदुत्वनिष्ठ यांनी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिली अन् येथील कार्याची ओळख करून घेतली.
१. रामनाथी, गोवा येथील सनातनचा आश्रम पहातांना धर्मप्रेमींनी व्यक्त केलेले विचार
१. आश्रमातील सकारात्मक ऊर्जेने ताजातवाना झालो !
आश्रम पाहून मी फारच भारावून गेलो. माझे मन आणि शरीर यांतील नकारात्मक ऊर्जा निघून गेली आणि सकारात्मक ऊर्जेमुळे मी ताजातवाना झालो. सर्व साधकांना नम्रपणे प्रणाम !
– श्री. शरद प्रभाकर कुलकर्णी, जनसंपर्क अधिकारी, मंगळग्रह सेवा संस्था, अंमळनेर, जळगाव.
२. आश्रम पाहून झालेला आनंद सांगायला शब्दही अल्प पडतील !
रामनाथी आश्रम पहात असतांना येथील सात्त्विकता अनुभवता आली. येथील साधकांशी बोलून आणि आपण हिंदु राष्ट्रासाठी केलेली वाटचाल पाहून पुष्कळ आनंद झाला. मला झालेला आनंद सांगायला शब्दही अल्प पडत आहेत.
– सौ. प्रतिमा संदीप रामीनवार, विश्व निवास, पूर्णा रोड, नांदेड.
३. आश्रम पाहून ‘इतक्या वर्षांच्या साधनेला फळ आले’, असे वाटले !
आश्रम पाहून माझी भावजागृती झाली आणि ‘इतक्या वर्षांच्या साधनेला फळ आले’, असे मला वाटले. ‘हिंदु राष्ट्र’ स्थापनेच्या कार्यात मलाही साहाय्य करता येऊ शकते’, याची जाणीव झाली.
– श्री. संदीप भारत रामीनवार, विश्व निवास, पूर्णा रोड, नांदेड.
४. ‘आश्रम पाहून मला छान वाटले.
आपण मंदिरात गेल्यावर जसे आपले मन भरून येते, आश्रमात आल्यावर माझे तसेच झाले आणि माझ्या मनाला शांत वाटले.’
– सौ. अमृता पद्माकर रामीनवार, साईबाबानगर, नांदेड.
५. ‘रामनाथी आश्रम पाहून मला पुष्कळ आनंद झाला
रामनाथी आश्रम पाहून मला पुष्कळ आनंद झाला आणि समाधान वाटले. ‘येथून बाहेर जावे’, असे वाटत नाही.
– सौ. मीरा भारत रामीनवार, नांदेड
२. सूक्ष्म-जगताविषयीचे प्रदर्शन पाहून दिलेले अभिप्राय
सनातनच्या आश्रमात सूक्ष्म-जगताच्या संदर्भात प्रयोगही होतात’, हे समजले. ‘वैज्ञानिक दृष्टीकोन ठेवून आध्यात्मिकता कशी वाढवावी ?’, याचे ज्ञान झाले.
– श्री. शरद प्रभाकर कुलकर्णी, जळगाव.
२. ‘सूक्ष्म-जगता विषयीचे प्रदर्शन पाहून ‘आजकालच्या कलियुगात ही गोष्ट फार महत्त्वाची आहे’, असे वाटले. जेणेकरून लोकांना हे प्रदर्शन पाहून ‘देव अन् देवाची माणसे या जगात आहेत’, याची ओळख पटेल.’
– सौ. प्रतिमा संदीप रामीनवार, पूर्णा रोड, नांदेड.
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
सूक्ष्म-जगत् : जे स्थूल पंचज्ञानेंद्रियांना (नाक, जीभ, डोळे, त्वचा आणि कान यांना) कळत नाही; परंतु ज्याच्या अस्तित्वाचे ज्ञान साधना करणार्याला होते, त्याला सूक्ष्म-जगत् असे संबोधतात. या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |