‘ऑल इंडिया लीगल एड फोरम’ तथा ‘अखिल भारतीय बार असोसिएशन’चे महासचिव अधिवक्ता जॉयदीप मुखर्जी यांच्या वतीने १४ जून या दिवशी हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रचारक पू. नीलेश सिंगबाळ, पूर्वाेत्तर भारत समन्वयक श्री. शंभू गवारे, महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्यांचे संघटक श्री. सुनील घनवट, सनातन संस्थेच्या प्रवक्त्या कु. कृतिका खत्री आणि हिंदु विधीज्ञ परिषदेचे संघटक अधिवक्ता नीलेश सांगोलकर या सर्वांचा सत्कार करण्यात आला.
वैशिष्ट्यपूर्ण
१. पू. (अधिवक्ता) हरि शंकर जैन यांचा परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्याविषयी भाव !
१४ जून या दिवशी सर्वाेच्च न्यायालयाचे अधिवक्ता पू. (अधिवक्ता) हरि शंकर जैन यांनी त्यांच्या भाषणाला प्रारंभ करण्यापूर्वी परात्पर गुरु डॉ. आठवले यांना वंदन करून ‘परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या प्रेरणेने आपण एकत्र आलो आहोत. जगाचा इतिहास आणि भूगोल पालटणारे परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांना प्रणाम’, असा भावपूर्ण प्रमाण केला.
२. हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांना पू. परमात्माजी महाराज यांचे आशीर्वाद !
हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यामागे परात्पर गुरु डॉ. आठवले यांची अद़्भुत शक्ती आहे. त्यांचे मी स्मरण करतो. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाचे आयोजन करणार्या हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांना मी आशीर्वाद देतो. भगवंताने जे दिले आहे, ते सर्व हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी समर्पित करावे. आपणाला भगवंताचे आशीर्वाद आहेत.
३. श्री. टी.एन्.मुरारी (शिवसेना, तेलंगाणा) यांचा परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रतीचा भाव
मनोगताच्या आरंभी श्री. टी.एन्. मुरारी म्हणाले, ‘‘हिंदु जनजागृती समितीचे (प्रेरणास्रोत) गुरुजी (परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले) हे आपला सर्वांचा हात पकडून आध्यात्मिक स्तरावर जाण्यासाठी मार्गदर्शन करत आहेत, त्याविषयी त्यांना प्रणाम करतो. हात पकडून पुढे घेऊन जाणार्यांची आवश्यकता असते. त्यामुळे कार्य चांगले होते.’’
४. हिंदूंमध्ये हिंदु राष्ट्राचा विचार निर्माण करण्याचे श्रेय परात्पर गुरु डॉ. आठवले
आणि हिंदु जनजागृती समिती यांना जाते ! – टी. राजासिंह, आमदार, भाजप, तेलंगाणा
‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनातून समस्त हिंदूंना नवी ऊर्जा मिळत आहे. या ऊर्जेतून आपल्या राज्यात जाऊन हिंदुत्वनिष्ठ कार्य करत आहेत. यापूर्वी हिंदू ‘भारत हिंदु राष्ट्र होईल’, असा विचार करत नव्हते. ‘भारत देश हिंदु राष्ट्र व्हावा’, असा विचार हिंदूंमध्ये निर्माण झाला, त्याचे श्रेय परात्पर गुरु डॉ. आठवले आणि हिंदु जनजागृती समिती यांचे आहे’, असे गौरवोद़्गार आमदार टी. राजा सिंह यांनी काढले.