क्षात्र आणि ब्राह्म तेजाचा हुंकार देणारी सातारा येथील भव्य ‘हिंदू एकता दिंडी’ !

दिंडीतील धर्मध्वजाचे पूजन करतांना पुरोहित

सातारा – सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले हे सनातन धर्माचा प्रसार आणि हिंदु राष्ट्राची स्थापना या ध्येयाच्या दिशेने कार्यरत असणारे अवतारी पुरुष आहेत. त्यांच्या ८० व्या जन्मोत्सवानिमित्त सातारा येथे २४ मे या दिवशी भव्य ‘हिंदू एकता दिंडी’ काढण्यात आली. दिंडीचा प्रारंभ शंखनादाने झाला. दिंडी निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी भगवान श्रीकृष्ण आणि सातारा शहराचे ग्रामदैवत श्री ढोल्या गणपति यांच्या चरणी प्रार्थना करण्यात आली.

वेदशास्त्रसंपन्न आहिताग्नी पू. गोविंदशास्त्री जोशी यांच्या हस्ते धर्मध्वजाचे पूजन करून श्रीफळ वाढवून दिंडी मार्गस्थ झाली. ६४ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. माधुरी प्रकाश दीक्षित यांनी परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या पालखीतील छायाचित्राचे पूजन केले, तर छत्रपती शिवाजी महाराज आणि श्री भवानीमातेच्या पालखीचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. श्री शाहू कला मंदिर येथून प्रारंभ झालेल्या दिंडीची सांगता पंचपाळी हौद दुर्गामाता मंदिराच्या प्रांगणामध्ये झाली.

 

पालखीचे भावपूर्ण पूजन करणारे धर्मप्रेमी !

पालखीतील छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर पुष्पवृष्टी करतांना
पालखीतील परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या छायाचित्राचे पूजन करतांना सनातनच्या साधिका

ज्योती ज्वेलर्सचे मालक श्री. धनंजय पारखी, गणेश ज्वेलर्सचे मालक श्री. अमित शिंदे, वर्धमान ज्वेलर्सचे श्री. सुरेश बोहरा, पंडित ज्वेलर्सचे सर्व पंडित कुटुंबीय, संचित ज्वेलर्सचे श्री. तानाजी वाघमोडे, घोडके सराफचे मालक तथा सराफ असोसिएशनचे किशोर घोडके (धनी), श्री शनिमंदिर येथे पुजारी किरण गुरव, राजोपाध्ये कुटुंबीय आणि अन्य कुटुंबीय, रमाकांत बुक सेलर्सचे मालक श्री. सचिन पिंपळे, सातारा प्लायवूड सेंटरचे मालक श्री. लोया बंधू, धर्मप्रेमी श्री. जितेंद्र लंगडे यांनी धर्मध्वज आणि पालखी यांचे उत्स्फूर्तपणे अन् भावपूर्ण पूजन केले.

देवी चौकात माजी नगरसेवक जयवंत भोसले यांचे बंधू प्रा. अरुण भोसले यांनी फटाके वाजवून दिंडीचे स्वागत करत धर्मध्वज आणि पालख्यांचे पूजन केले.  शालगर हार्डवेअर यांनीही उत्स्फूर्तपणे धर्मध्वजाचे पूजन केले.

पंचमुखी गणपति मंदिरासमोरील हॉटेल चंद्रविलासचे मालक श्री. वसंत जोशी यांनी धर्मध्वजाचे पूजन करून चैतन्यमय दिंडीवर पुष्पवृष्टी केली.

पालखीतील प्रतिमांचे पूजन झाल्यानंतर पुष्पवृष्टी करतांना संत आणि साधक

 

सहभागी हिंदुत्वनिष्ठ संघटना, संप्रदाय आणि उपस्थित प्रमुख मान्यवर

धर्मध्वज घेऊन मार्गक्रमण करतांना दिंडी

सातारा येथील उमाशंकर अद्वैत वेदांत विद्यापिठाचे प्रधान अध्यापक तथा संचालक वेदशास्त्रसंपन्न आहिताग्नी गोविंद सोमेश्वरशास्त्री जोशी, पू. विजय महाराज, वारकरी संप्रदायाचे ह.भ.प. कृष्णराव क्षीरसागर महाराज, कोंढवे येथील इस्कॉनचे आचार्य बिपीन बिहारी दास प्रभु, अखिल भारत हिंदु महासभेचे महाराष्ट्र प्रदेश प्रमुख कार्यवाह अधिवक्ता दत्ताजी सणस, कार्यकारिणी सदस्य श्री. उमेश गांधी, जिल्हाध्यक्ष श्री. धनराज जगताप, विश्व हिंदु परिषदेचे सातारा शहरमंत्री श्री. जितेंद्र वाडेकर, बजरंग दलाचे श्री. मुकुंदराव पंडित, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे सर्वश्री ओंकार डोंगरे, चंदन जाधव, योग वेदांत सेवा समितीचे श्री. दीपक पाटील, धर्मप्रेमी सर्वश्री रमेश हलगेकर, गोडसे, भाजपचे नगरसेवक श्री. विजयकुमार काटवटे, हिंदु एकता आंदोलनचे जिल्हाध्यक्ष श्री. विक्रम पावसकर, कराड येथील गोरक्षणचे श्री. सुनील पावसकर, कराड येथील शिवसेनेचे कराड दक्षिण विभागाचे उप तालुकाप्रमुख श्री. काकासाहेब जाधव.

 

सहभागी पथके

दिंडीमध्ये फेर धरलेल्या महिला

क्षात्रतेज कराटे वर्गाचे संचालक श्री. प्रताप गुजले यांचे कराटे पथक, लाठीकाठी पथक, दांडपट्टा पथक, दंडसाखळी पथक, दिव्यनगरी, शाहूपुरी येथील शिवमुद्रा शस्त्र पथक, सौ. पुष्पा सकुंडे आणि सहकारी यांचे प्रथमोपचार पथक, पाटण तालुक्यातील ढोरोशी गावातील धर्मप्रेमी युवकांचे लाठीकाठी पथक, अतित, नागठाणे येथील शिवशंभो दांडपट्टा पथक, नारायणी पथक, ऐतिहासिक वेशभूषा करून दिंडीत सहभागी झालेले बालसाधकांचे पथक, रणरागिणी पथक

क्षणचित्रे

दिंडीतील बालसाधकांचे पथक

१. दिंडीमध्ये सहभागी धर्मप्रेमी श्री. रमेश हलगेकर आणि विश्व हिंदु परिषदेचे शहरमंत्री श्री. जितेंद्र वाडेकर यांनी स्वयंस्फूर्तीने स्वयंसेवक म्हणून वाहतूक नियंत्रण करण्याच्या सेवेत सहभाग नोंदवला.

२. धर्मध्वजाचे पूजन करणारे धर्मप्रेमी स्वयंस्फूर्तीने दुकानातून बाहेर पडून दिंडीत सहभागी झाले आणि काही काळ दिंडीसोबत चालले.

३. शाहूपुरी येथील शिवमुद्रा शस्त्र पथक आणि अतित, नागठाणे येथील शिवशंभो दांडपट्टा पथक यांनी दांडपट्टा अन् आगीच्या गोळ्यांचे चित्तथरारक प्रात्यक्षिके दाखवून वातावरण
शिवमय केले.

दिंडीत समारोपीय मार्गदर्शन करतांना श्री. हेमंत सोनवणे

४. शेळकेवाडी येथील श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी श्री. अमोल सकपाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची वेशभूषा केली होती.

५. सातारा शहरातील नारायणी पथकाने दिंडीमध्ये उत्स्फूर्तपणे शिवतांडव स्तोत्र म्हटले.

६. दिंडी राजवाडा येथील गोलबाग परिसरात आल्यावर सनातन संस्थेच्या वतीने श्रीमंत छत्रपती (थोरले) प्रतापसिंह महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.

७. दिंडीत नऊवारी साडी परिधान करून धर्मप्रेमी युवतींचे पथक सहभागी झाले होते


आगीच्या गोळ्यांची चित्तथरारक प्रात्यक्षिके दाखवतांना शाहूपुरी येथील शिवमुद्रा शस्त्र पथक
कराटेचे प्रकार सादर करतांना श्री. प्रताप गुजले यांचे क्षात्रतेज कराटे पथक
दांडपट्ट्याचे प्रात्यक्षिक सादर करतांना अतित, नागठाणे येथील शिवशंभो दांडपट्टा पथक

सहकार्य

मंगलमूर्ती रुग्णालय व्यवस्थापनाने दिंडीसाठी पाण्याच्या बाटल्या आणि गोळ्या उपलब्ध करून दिल्या. भगवती ज्वेलर्सचे मालक श्री. जितेंद्रसिंह राठोड यांनीही पाण्याच्या बाटल्या दिल्या. शालगर हार्डवेअरचे श्री. नाना शालगर यांनी गोळ्या दिल्या. पंचपाळी हौद दुर्गामाता मंदिर यांनी मंदिर उपलब्ध करून दिले. गडकर आळी येथील श्री महालक्ष्मी मंदिर व्यवस्थापनाने दिंडीसाठी पालखी, २ आब्दागिरी आणि छत्रचामर उपलब्ध करून दिले. सदरबझार येथील ‘भारतमाता मित्र मंडळा’ने आणि करंजे पेठेतील ह.भ.प. देवरुखकर महाराज यांनी दिंडीसाठी पालखी उपलब्ध करून दिली.

Leave a Comment