देहली – सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने हिंदु राष्ट्र-जागृती अभियान राबवण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी केलेल्या सामाजिक कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी येथील न्यू कोंडली फेज-३ मधील शिवशक्ती मंदिराच्या परिसराची स्वच्छता करण्यात आली. यात मंदिरातील भक्त, जिज्ञासू आणि धर्मप्रेमी यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. या वेळी सनातनच्या ममता गुप्ता म्हणाल्या, ‘‘एक दिवस मंदिराची स्वच्छता करून न थांबता भगवंताचे मंदिर नेहमीच स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, हीच गुरुदेवांच्या चरणी खरी कृतज्ञता ठरेल.’’ या सत्कार्यासाठी स्थानिक धर्मप्रेमी मधु हरबोला आणि सुमन तिवारी यांनी विशेष साहाय्य केले. मंदिराच्या पुजाऱ्यांनी या अभियानाचे कौतुक केले.
Home > कार्य > समाजसाहाय्य > देहली येथे भाविक आणि धर्मप्रेमी यांच्याकडून शिवशक्ती मंदिराच्या परिसराची स्वच्छता
देहली येथे भाविक आणि धर्मप्रेमी यांच्याकडून शिवशक्ती मंदिराच्या परिसराची स्वच्छता
Share this on :
Share this on :
संबंधित लेख
- सनातन संस्थेच्या वतीने ‘बिंदूदाबन उपचार’ शिबिराचे छत्रपती संभाजीनगर येथे आयोजन !
- अहिल्यानगर येथे सनातन संस्थेच्या वतीने बिंदूदाबन उपचार शिबिर पार पडले !
- सनातन संस्था आयोजित बिंदूदाबन शिबिराचा नाशिक जिल्ह्यातील शिबिरार्थींनी घेतला लाभ !
- पुणे येथील विश्वशांतीनिकेतन विद्यालयाच्या कुरुळी शाखेमध्ये पालकांसाठी व्याख्यानाचे आयोजन !
- धरुहेडा (हरियाणा) येथे सनातन संस्थेच्या वतीने ‘नैतिक मूल्यांचे संवर्धन’ या विषयावर मार्गदर्शन
- सनातन संस्थेच्या वतीने मथुरा (उत्तरप्रदेश) येथील ‘राधा माधव इंटर कॉलेज’मध्ये ‘तणाव निर्मूलन’ विषयावर व्याख्यान पार...