भव्य ‘हिंदू एकता दिंडी’च्या माध्यमातून पुण्यनगरीत संचारले हिंदू नवचैतन्य !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या पालखीचे पूजन करतांना श्री. अनिल साळुंखे आणि सौ. कीर्ती साळुंखे

पुणे – सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले हे अखिल मानवजातीच्या उद्धारासाठी कार्यरत असलेली विभूती असून सनातन धर्माचा प्रसार आणि हिंदु राष्ट्राची स्थापना हे त्यांचे जीवितकार्य आहे. त्यांच्या ८० व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने हिंदु राष्ट्र-जागृती अभियानाच्या अंतर्गत पुणे येथे १५ मे या दिवशी ‘हिंदू एकता दिंडी’ काढण्यात आली. दिंडीचा प्रारंभ शंखनादाने झाला. हिंदूंमध्ये धर्मतेज आणि क्षात्रतेज जागृत करणारी दिंडी निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी श्रीकृष्ण, पुण्याचे ग्रामदैवत श्री कसबा गणपति आणि ग्रामदेवी श्री तांबडी जोगेश्वरी यांच्या चरणी प्रार्थना करण्यात आली. धर्मध्वजाचे पूजन करून आणि श्रीफळ वाढवून दिंडी मार्गस्थ झाली. सौ. कीर्ती महाजन यांनी परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या पालखीतील प्रतिमेचे पूजन केले, तर सौ. मोहिनी आटोळे यांनी श्री तुळजाभवानीमातेच्या पालखीतील प्रतिमेचे पूजन केले. भिकारदास मारुति मंदिर येथून प्रारंभ झालेल्या दिंडीची सांगता स्वातंत्र्यवीर सावरकर स्‍मारक येथे झाली.

पुणे येथील दिंडीत सजवण्यात आलेली श्री तुळजाभवानीदेवीची पालखी

दापोडी येथून मशाल घेऊन श्री. कृष्णा माने आणि श्री. प्रथमेश फुगे यांनीही दिंडीत सहभाग नोंदवला. ‘अशा प्रकारची उत्कृष्ट दिंडी प्रथमच पहात आहोत. सर्व प्रकारचे दर्शन या दिंडीत होत आहे’, असेही सांगितले. या वेळी मशालीच्या ज्वाळेत सिंहाची प्रतिकृती साधकांना दिसली. ‘जणू देवीचे वाहन सिंह दिंडीसमवेत आहे’, असे यातून जाणवले.

लाठीकाठीची प्रात्यक्षिके दाखवतांना समितीचे कार्यकर्ते

विशेष सहभाग

संपूर्ण दिंडीच्या मार्गावर ‘शाहू लक्ष्मी कला क्रीडा अकॅडमी’च्या विद्यार्थ्यांनी मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके केली.

स्वरक्षण ही काळाची आवश्यकता असून अधिकाधिक लोकांपर्यंत स्वरक्षणाचा विषय पोचावा, यासाठी संपूर्ण दिंडी मार्गावर स्वरक्षण प्रशिक्षण पथकातील कार्यकर्त्यांनी प्रात्यक्षिके दाखवली.

श्री. सुरेश पांडुरंग भांडे (गोंधळी) यांनी दिंडीमार्गावर संबळ वाजवली.

‘पांचजन्य शंखनाद पथका’ने दिंडी मार्गावर आणि प्रत्येक चौकात भावपूर्ण शंखनाद केला.

‘आराध्य रंगावली’ आणि ‘सोमनाथ आर्ट’ यांनी दिंडी मार्गावर हिंदु ऐक्याचा संदेश देणारी रांगोळी काढली.

 

चैतन्यमय दिंडीवर आनंदाने पुष्पवृष्टी करणारे धर्मप्रेमी !

पुणे येथील दिंडीत सजवण्यात आलेली परात्पर गुरु डॉ. आठवले यांची पालखी

१. ‘पायताण’ दुकानाचे मालक श्री. अभिजीत कारंडे आणि ‘गंगधर मिठाई दुकाना’चे मालक श्री. अभिजित गंगधर यांच्या हस्ते पुष्पवृष्टी करण्यात आली. ‘दिंडी उत्कृष्ट आणि शिस्तबद्ध आहे. मी याचा एक भाग असल्याचा मला अभिमान आहे’, असे गौरवोद्गार श्री. अभिजीत गंगधर यांनी काढले.

२. ‘पुना मोटर्स’चे मालक हसमुखराय होरा यांनी शनिपार चौकात पालखीवर पुष्पवृष्टी केली.

३. ‘युवान कलेक्शन’चे मालक श्री. गिरीश धूत, ‘संत वेदांत सेवा समिती’चे श्री. सुधाकर संगनवार आणि सोनार टाकवाले, श्री. भास्कर जाधव यांनी अलका टॉकीज चौकात धर्मध्वज, पालखी आणि दिंडी यांवर पुष्पवृष्टी केली.

४. ‘संस्कृत बाल शिक्षण’चे शिक्षक श्री. अजित सुतार यांनी धर्मध्वज, पालखी आणि दिंडी यांवर पुष्पवृष्टी केली. ‘या दिंडीमुळे हिंदूंना शक्ती मिळाली. संपूर्ण दिंडीमध्ये आनंदाचे आणि दैवी वातावरण अनुभवायला मिळाले’, असे भावपूर्ण उद्गार श्री. सुतार यांनी काढले.

धर्मध्वज आणि पालखीचे भावपूर्ण पूजन करणारे धर्मप्रेमी !

टिळक चौक (अलका टॉकीज चौक) येथे दिंडीवर पुष्पवृष्टी झाली तो क्षण !

१. ‘समर्थ बैठकी’चे साधक सौ. जयश्री शांताराम जाधव यांनी धर्मध्वजाचे पूजन केल्यावर ‘दिंडी पाहून धर्मजागृती होत असून दिंडीमध्ये चैतन्य जाणवत आहे’, असे सांगितले.

२. श्री. महेश केंकरे आणि त्यांच्या धर्मपत्नी सौ. मुग्धा केंकरे, धर्मप्रेमी सौ. स्नेहल पारखी अन् सौ. माई परांडेकर, तसेच श्री. शरद गंजीवाले आणि त्यांच्या धर्मपत्नी यांनी धर्मध्वजाचे पूजन अन् पालखीपूजन केले.

३. शगुन चौकात धर्मप्रेमी श्री. अनिल साळुंखे आणि सौ. कीर्ती साळुंखे यांनी धर्मध्वजाचे पूजन अन् पालखी पूजन करून दिंडीचे स्वागत केले. ‘दिंडीतील आनंदी वातावरण पाहून पुष्कळ भाव जागृत झाला,’ असे भावपूर्ण उद्गार त्यांनी काढले.

४. ‘कलाक्षेत्रम् सिल्क’ दुकानाचे मालक श्री. यशवंत शिंगाडे यांनी धर्मध्वज पूजन करून पालखीवर पुष्पवृष्टी केली. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या पालखीतील प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. ‘आम्ही सर्व सनातनवादी आहोत. दिंडी बघून समाधान वाटते, तसेच आनंद जाणवतो’, असे त्यांनी सांगितले.

सहकार्य

पुणे पोलीस प्रशासन, कार्यवाह श्री. महेश पोहनेरकर, विवेक व्यासपीठ सावरकर अध्ययन डेक्कन जिमखाना, पुणे आदींचे सहकार्य लाभले.

 

प्रमुख मान्यवर

टिळक चौक (अलका टॉकीज चौक) येथे दिंडीवर पुष्पवृष्टी झाली तो क्षण !

स्वातंत्र्यवीर सावरकर स्मृती प्रतिष्ठानचे महामंत्री श्री. विद्याधर नारगोलकर, ‘आशा फाऊंडेशन’चे श्री. पुरुषोत्तम डांगी, भोर येथील शकुंतला केबलचे मालक श्री. ज्ञानेश्वर बांदल, ‘आशा प्रतिष्ठान’चे श्री. अभिजित घाटे, केडगाव येथील ‘स्वातंत्र्यवीर सावरकर युवा विचार मंच’चे श्री. प्रकाश देशमुख, अधिवक्ता शंकर रत्नपारखी, भाजप युवा मोर्चाचे सरचिटणीस श्री. सारंग नवले, भाजप युवा मोर्चाचे श्री. पुरोहित पाचपुते, पुणे येथील अखिल गौड ब्राह्मण समाजचे श्री. मनोहरलाल उणेचा, थेऊर येथील सर्वश्री भरत पाठक, विजय सोनवणे, खंडू कोळेकर, संपत काकडे, शाहू लक्ष्मी कला क्रीडा अकॅडमीचे श्री. राज तांबोळी

 

सहभागी मंडळे आणि धर्माभिमानी

दिंडीत ग्रंथ पालखी घेऊन जातांना उत्साही साधक

वारकरी संप्रदाय, संत सोपानदेव समाधी मंदिराचे सेवेकरी, बालसंस्कारवर्ग वानवडी यांसह तुकाराम महाराज पालखी सोहळा, छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव मंडळ, कोलवडी येथील धर्मप्रेमी, चिंतामणी गणपति आणि विठ्ठल मंदिर, थेऊर येथील पुरोहित अन् ग्रामस्थ, तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील प्रासादिक दिंडी नं. ३० चे २८ वारकरी आणि सोरतापेश्वर भजनी मंडळ, संस्कृत बाल शिक्षण मंडळ, हडपसर, यांचा गट; श्री योग वेदांत सेवा समिती, पुणे शहर, पू. आसारामजी बापू महिला मंडळ, बचतगट महिला मंडळ, सासवड येथील महिला धर्मप्रेमी, द्वारकाधीश गोशाळा येवलेवाडीचे गोरक्षक, स्वातंत्र्यवीर सावरकर युवा विचार मंच, केडगाव येथील धर्मप्रेमी, आखिल डाळिंबकर शिववंदना ग्रुप, डाळिंब गावचे धर्मप्रेमी, अन्‍य अनेक समविचारी संघटनांचे कार्यकर्ते या दिंडीत बहुसंख्येने सहभागी झाले होते.

 

सहभागी पथके

छत्रपती शिवाजी महाराजांची पालखी घेऊन जातांना वीर मावळे !

अधिवक्ता पथक, क्रांतीकारकांच्या वेशभूषेतील बालसाधकांचे पथक, टाळ पथक, पारंपरिक वेशभूषेतील नऊवारी साडी परिधान केलेल्‍या महिलांचे रणरागिणी पथक, कलशधारी महिला, डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन सहभागी झालेल्या महिला, संपूर्ण दिंडी मार्गावर टाळ वाजवत सहभागी झालेले टाळधारी पथक, हिंदु संस्कृतीची ओळख सांगणारे महिलांचे घागरी फुंकण्याचे पथक, सनातन संस्थेचे कार्य सर्वदूर पसरवण्याचा संदेश असलेल्या सनातन-निर्मित छत्र्या घेऊन सहभागी झालेले महिलांचे पथक, झांज-ढोल आणि लेझीमच्या तालावर नाचत सहभागी झालेले पथक, प्रथमोपचार पथक, प्रत्येक विषयावर विपुल ज्ञान उपलब्ध करून देणारी सनातनची ग्रंथसंपदा अन् त्याचे अलौकिकत्व सिद्ध करणारी सनातनची ग्रंथ पालखी, ‘ज्ञानेश प्राथमिक शाळे’तील सहभागी विद्यार्थी, हिंदु एकतेचा संदेश देणारे गरबा पथक, हिंदु संस्कृतीची महानता विद्यार्थ्यांपर्यंत पोचवण्याचे समष्टी कार्य करणारे शिक्षक पथक, तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे चिंतामणी प्रासादिक दिंडी सोरतापवाडी वारकरी भजनी मंडळ आणि सोरतापेश्वर भजनी मंडळ, भगवे ध्वज धरून सहभागी झालेल्या महिला आणि पुरुष यांचे पथक

 

सांगता सभेतील मार्गदर्शन

हिंदु एकतेचे दर्शन घडवणारे कार्यक्रम सातत्याने व्हावेत ! – अधिवक्ता नीलेश निढाळकर, प्रखर हिंदुत्वनिष्ठ

जोपर्यंत हिंदु स्वतःचा परिचय हिंदु म्हणून करून देणार नाहीत, तोपर्यंत हिंदु राष्ट्र येणार नाही. भारतात हिंदू बहुसंख्य आहेत; परंतु जगात हिंदू अल्पसंख्य आहेत. आजची हिंदू एकता दिंडी ही हिंदु ऐक्याची झलक आहे. याचे आयोजन केल्यासाठी मी आभार मानतो. हिंदु एकतेचे दर्शन घडवणारे असे कार्यक्रम सातत्याने व्हावेत !

जातपात, पंथ विसरून हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी सर्वांनी एकत्र येऊया ! – नागेश जोशी, हिंदु  जनजागृती समिती

सध्या नाटकातून, चित्रपटातून हिंदु देवतांचे विडंबन, हिंदु धर्मावरील आघात, लव्ह जिहाद,  गोहत्या यांचे प्रमाण वाढले आहे. हिंदु जनजागृती समिती धर्म जागृतीचे कार्य करत असून या सर्व आघातांना सनदशीर मार्गाने विरोध करत आहे. हिदूंची ही स्थिती पालटण्यासाठी आज हिंदू संघटनाची आवश्यकता आहे. आपल्या सर्वांना संघटित होऊन हिंदु राष्ट्राची स्थापना करायची आहे. यासाठी सर्वांनी एकत्र येऊया. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात यथाशक्ती आपले योगदान देऊया. असे झाले, तर हिंदु राष्ट्राची पहाट बघणे दूर नाही.

पुरो(अधो)गामी आणि सेक्युलरवादी यांना सडेतोड उत्तर देण्यासाठी हिंदूंची एकता आवश्यक – चैतन्य तागडे, सनातन संस्था

हिंदूंची मंदिरे, महिला, युवक-युवती सुरक्षित झाले पाहिजेत. धर्मांधांच्या वृत्तीला विरोध करणारे वातावरण आपल्याला निर्माण करायचे आहे. पुरो(अधो)गामी आणि सेक्युलरवादी यांना सडेतोड उत्तर द्यायचे आहे. यासाठी हिंदूंची एकता हे एकच उत्तर आहे. सकल हिंदू शक्ती एकत्रित आल्यास एकतेची वज्रमूठ निर्माण होईल तेव्हा हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी वेळ लागणार नाही. आजची दिंडी ही हिंदूंचे महासंघटन दर्शवण्यासाठी, हिंदूंच्या स्वाभिमानासाठी, हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी आहे. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी हिंदू ऐक्याचे कार्य करण्याचा समष्टी साधनेचा संदेश दिला आहे. या अवतारी कार्यात तन-मन-धनाने सहभागी व्हा.

दिंडी पाहून उत्स्फूर्तपणे गौरवोद्गार काढणारे धर्मप्रेमी !

१. दिंडीत सहभागी झालेल्यांची संख्या पाहून ‘एवढ्या मोठ्या प्रमाणात हिंदूंचे संघटन होत आहे, हे प्रथमच पाहत आहोत.’

२. ‘हिंदूंचे असे संघटन झाले, तर भारत हे हिंदु राष्ट्र होणारच आहे.

३. भारत हे मुळातच हिंदु राष्ट्र असून केवळ अधिकृतपणे घोषित व्हायला हवे. समस्त हिंदूंनी एकजुटीने मागणी केल्यास भारत हिंदु राष्ट्र म्हणून घोषित होईलच.

४. हिंदू जागृत झाला आहे, हे ही दिंडी पाहून लक्षात येते. हिंदु राष्ट्र येणारच आहे. अद्भुत, अविश्वसनीय असे या दिंडीचे वर्णन करता येईल.

– श्री. धनंजय धांडेकर

५. भारत अधिकृतपणे हिंदु राष्ट्र म्हणून घोषित व्हायला हवे. त्यासाठी जनजागृती करणाऱ्या अशा दिंड्या आयोजित व्हायला हव्यात.

– श्री. जगदीश गुप्ता, शनिपार

६. आज भारतात हिंदु म्हणवून घेण्याची लोकांना लाज वाटते. ही स्थिती पालटायला हवी. हिंदूंचे संघटन व्हायला हवे.

– श्री. सुमित धुमाळ, विद्यार्थी

७. गेल्या १५ वर्षांत एवढी सुंदर रचना आणि शिस्तीत चालणारी पहिलीच फेरी मी पाहिली.

– एक पोलीस कर्मचारी

८. रस्त्यावर एकाकडेने अगदी व्यवस्थितपणे सगळेच नामजप करत, हिंदु राष्ट्राचा जयघोष करत,  ‘हर हर महादेव’ अशा वीरश्रीयुक्त घोषणा देत जात असल्याने  पुष्कळ छान वाटत होते.  मी पहिल्यांदाच अशी दिंडी बघितली.

– एक नागरिक

९. अतिशय शिस्तबद्ध अशी ही दिंडी झाली. पुष्कळ छान नियोजन !

– दैनिक ‘राष्ट्रतेज’चे संपादक श्री. उमेश कदम

१०. आज कामानिमित्त पुण्यात आलो होतो. ही एकता दिंडी पाहून पुष्कळ अभिमान वाटतो. सध्या हिंदूंच्या एकजुटीची आवश्यकता आहे.

– अनुपम प्रकाशराव राऊते, नातेपुते,

११. सध्या एकजूट आवश्यक आहे. सर्वांनी राजकारण, पक्ष, संघटना बाजूला सारून एकत्र यायला पाहिजे. प्रत्येकाने धर्मासाठी दिवसातील काहीतरी वेळ द्यायला हवा. दिंडी पाहून पुष्कळ छान वाटते.

– श्री. गणेश पराडे, पुणे

१२. एकत्र येऊन कार्य करणे ही काळाची आवश्यकता आहे. फेरी पाहून मन शांत होऊन आनंद वाटला. स्वरक्षण पथक पाहून विशेष आनंद वाटला.

– श्री. निखिल पिसाळ, शिरवळ

१३. महाराष्ट्रामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात हिंदूंचे संघटन पाहून चांगले वाटले. उत्तर भारतासारखे येथेही संघटन होत आहे. योगी जसे कार्य उत्तर भारतामध्ये करत आहेत, तसेच कार्य येथे सनातन संस्था करत आहे.

– सुप्रिया मिश्रा (मूळ अलाहाबाद)

क्षणचित्रे

१. दिंडीतील उत्साह आणि चैतन्य अनुभवत अनेक महिलांनी चौकामध्ये फुगड्यांचा फेर धरला.

२. वयोवृद्ध साधकही दिंडीमध्ये आनंदाने सहभागी झाले होते. अशी दिंडी परत कधी अनुभवायला मिळणार ? असे वाटून संजीवनी लिमये या ७८ वर्षांच्या वयोवृद्ध आजी दिंडीमध्ये उत्साहाने सहभागी झाल्या होत्या. ‘संपूर्ण दिंडीमध्ये आनंद जाणवला’, असे त्यांनी सांगितले.

३. येणारे-जाणारे, तसेच इमारतीच्या गच्चीवरून धर्मप्रेमी मोठ्या उत्साहाने दिंडी पहात होते.

४. अनेकांनी दिंडीचे चित्रीकरण केले.

५. रस्त्यावरील नागरिक उत्स्फूर्तपणे घोषणा देत होते.

६. लक्ष्मी रस्त्यावरून दिंडी जातांना दुकानातील वयस्कर महिलेने दिंडीला नमस्कार केला आणि धर्मप्रचारक सौ. मनीषा पाठक यांना परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांच्या पालखीकडे बोट दाखवून ‘तू यांची लेक ना ?’, असे म्हणून त्यांची दृष्ट काढली.

७. संकेतस्थळाच्या माध्यमातून जोडलेले जिज्ञासू हे त्यांची पत्नी रुग्णालयात दाखल असूनही दिंडी बघण्यासाठी काही वेळ आले होते.

 

हिंदू एकता दिंडी …..

हिंदु राष्ट्र स्थापनेच्या उद्देशाने हिंदू ऐक्याचा विशाल आविष्कार आणि शक्तीप्रदर्शन करण्यासाठी दिंडी !

हिंदु वीरांची दिंडी !

दिंडी म्हणजे आहे सिंहगर्जना !

दिंडी म्हणजे हिंदूंच्या संघटित शक्तीचा आविष्कार !

दिंडी होती हिंदू ऐक्यासाठी, गोमातेच्या रक्षणासाठी, हिंदु महिलांच्या सक्षमीकरणासाठी, मंदिरांच्या रक्षणासाठी, अखंड हिंदुस्थानासाठी आणि हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी….

 

 

Leave a Comment