कोल्हापूर – सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने कोल्हापूर जिल्हा, सांगली, कराड (जिल्हा सातारा) आणि कर्नाटकातील जत्राट अन् संकेश्वर येथे ठिकठिकाणी प्रवचन घेणे, मंदिर स्वच्छता असे उपक्रम घेण्यात आले. या उपक्रमांमध्ये ‘सनातन प्रभात’चे वाचक, हितचिंतक, तसेच धर्मप्रेमी यांचाही सक्रीय सहभाग होता.
कोल्हापूर

१. बांबवडे येथील महादेव मंदिरात श्री. प्रसाद कुलकर्णी आणि सौ. सुनिता भोपळे यांनी प्रवचन घेतले. या प्रसंगी बांबवडे येथील प्रसिद्ध अस्थिरोगतज्ञ डॉ. गुरुदास दळवी आणि डॉ. पचकर उपस्थित होते.

२. कोल्हापूर शहरात कुडपकर येथील दत्त मंदिरात प्रवचन घेण्यात आले.

३. शिरोली येथे सौ. साधना गोडसे आणि सौ. मेघमाला जोशी यांचे प्रवचन झाले. याचा लाभ अनेक जिज्ञासूंनी घेतला.



४. आजरा येथील रवळनाथ मंदिर, राम मंदिर, विठ्ठल मंदिर, महादेव मंदिर येथे स्वच्छता उपक्रमात धर्मप्रेमी सहभागी झाले होते.
कराड

कराड येथे कोयना वसाहत येथील वत्सलानगरमध्ये ५ मंदिर येथे महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे अध्यात्मविषयक शोधकार्य यावर ध्वनीचित्रचकती दाखवण्यात आली, तसेच सनातन संस्थेच्या साधिका श्रीमती नलिनी सूर्यवंशी यांनी साधनाविषयक प्रवचन घेतले.
अभिप्राय
१. अंजनी खराडे – कार्यक्रमातून सकारात्मक ऊर्जा मिळाली.
२. नीलम साठे – प्रवचन ऐकून मन प्रसन्न झाले. ‘श्री गुरुदेव दत्त’ हा नामजप करण्यास प्रारंभ करणार आहे.
विशेष
१. प्रवचनास प्रारंभ केल्यावर २ पोलीस त्या ठिकाणी आले होते. त्यांनीही प्रवचन ऐकले.
कर्नाटक
जत्राट (कर्नाटक) येथील महादेव मंदिरात धर्मप्रेमींच्या पुढाकाराने स्वच्छता आणि प्रवचनाचे आयोजन !



१. जत्राट (कर्नाटक) येथे धर्मप्रेमींच्या पुढाकाराने महादेव मंदिराची स्वच्छता करण्यात आली, तसेच साधना प्रवचनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रवचनाचा प्रसार धर्मप्रेमींनी उत्स्फूर्तपणे प्रसार केला. हे प्रवचन सनातन संस्थेच्या श्रीमती अलका पाटील यांनी घेतले. या प्रवचनात ‘सनातन प्रभात’चे वाचक श्री. राजेंद्र कल्लोळ यांनी उद्देश स्पष्ट केला. याचा लाभ अनेक जिज्ञासूंनी घेतला. हे सर्व जिज्ञासू ग्रामीण भागातील असून शेतातील कामे संपवून ते प्रवचनासाठी उपस्थित होते. या सर्व जिज्ञासूंनी शेवटपर्यंत विषय चांगल्या प्रकारे ऐकला आणि विषय ऐकल्यावर समाधान व्यक्त केले.

२. संकेश्वर (कर्नाटक) येथील ‘आय.एम्.ए. हॉल’ येथे ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या आधुनिक वैद्या (डॉ.) श्रीमती शिल्पा कोठावळे यांनी प्रवचन घेतले.