रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात धान्य निवडण्याच्या सेवेसाठी साधकांची आवश्यकता !
Share this on :
रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या चैतन्यदायी आश्रमात सेवेची अमूल्य संधी !
गोवा येथील सनातनचा रामनाथी आश्रमरामनाथी (गोवा) सनातनच्या आश्रमातील साधकांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून स्वयंपाकघरातील विविध सेवांसाठी साधकसंख्या अपुरी पडत आहे. ‘दिवसभरात ६ – ७ घंटे बसून धान्य निवडू शकतील’, अशी शारीरिक क्षमता असलेले (शारीरिक त्रास असल्यास धान्य बसून निवडण्यास मर्यादा येतात) आणि ‘धान्यातील खडे किंवा अन्य कचरा पाहू शकतील’, अशी दृष्टी असलेले साधक यांची आवश्यकता आहे. इच्छुक साधक पूर्णवेळ अथवा काही कालावधीसाठी आश्रमात राहून या संधीचा लाभ घेऊ शकतात. ही सेवा करू शकणाऱ्या साधकांनी जिल्हासेवकांच्या माध्यमातून बाजूला दिलेल्या सारणीनुसार आपली माहिती पाठवावी.
नाव आणि संपर्क क्रमांक
सौ. भाग्यश्री सावंत – ७०५८८८५६१० (वेळ – सकाळी १० ते सायंकाळी ६)