रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला देश-विदेशांतील अनेक जिज्ञासू भेट देतात. काही जण साधना करण्यासाठी, तसेच साधनेचे आणखी पुढील बारकावे शिकण्यासाठी आश्रमात रहाण्याची इच्छा व्यक्त करतात. आश्रमात रहाणाऱ्या साधकांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून सध्याची आश्रमाची वास्तू निवासासाठी अपुरी पडत आहे. त्यामुळे सध्या नवीन वास्तूचे बांधकाम करण्याची सेवा चालू आहे. या वास्तू उभारणीच्या कार्यासाठी सुतारकामाचे कौशल्य असलेल्या कारागिरांची आवश्यकता आहे. नवीन पलंग बनवणे, दारे, खिडक्या आणि त्यांच्या चौकटी बनवणे, तसेच उपलब्ध साहित्याची (फर्निचरची, उदा. टेबल, कपाट, पलंग, आसंदी यांची) दुरुस्ती करणे, या सेवांसाठी सुतारांची तातडीने आवश्यकता आहे.
ज्या साधकांत, तसेच वाचक, हितचिंतक किंवा धर्मप्रेमी यांच्यात असे कौशल्य आहे, ते आश्रमात पूर्णवेळ वा काही दिवस राहून या सेवा करू शकतात. जे ‘सेवा’ म्हणून किंवा ‘सेवामूल्य (मजुरी)’ घेऊन वरील सेवांमध्ये सहभागी होण्यास इच्छुक असतील, त्यांनी तसेही कळवावे. बांधकाम करणारे कंत्राटदार, ज्यांच्याकडे असे कारागीर आणि साहाय्यक आहेत, तेही संपर्क करू शकतात.
सेवा करण्यास इच्छुक असलेल्यांनी स्थानिक साधकांच्या माध्यमातून याविषयी जिल्हासेवकांना कळवावे. जिल्हासेवकांनी खालील सारणीनुसार माहिती पाठवावी.
नाव आणि संपर्क क्रमांक
सौ. भाग्यश्री सावंत – ७०५८८८५६१०
(वेळ – सकाळी १० ते सायंकाळी ६)
संगणकीय पत्ता : sanatan.sanstha2025@gmail.com
टपालाचा पत्ता : सौ. भाग्यश्री सावंत, द्वारा ‘सनातन आश्रम’, २४/बी, रामनाथी, बांदिवडे, फोंडा, गोवा. पिन – ४०३४०१