सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी ठिकठिकाणी हिंदुत्वनिष्ठांचे साकडे !

परात्पर गुरु डॉ. आठवले
 

मुंबईसह उपनगरांमध्ये विविध ठिकाणी देवतांना साकडे !

मुंबई – येथे बोरिवली (दत्तपाडा), दहिसर (अशोकवन), अंधेरी (म्हातारपाडा), जोगेश्वरी (बांद्रेकरवाडी), वरळी (कोळीवाडा), चेंबूर, नवी मुंबईमध्ये कोपरखैरणे, तर पालघर जिल्ह्यात नालासोपारा (आचोले), बोईसर (चिंचणी), भेंडीबाजार आणि खारघर आदी ठिकाणी मंदिरांमध्ये हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी देवतांना साकडे घालण्यात आले.

नालासोपारा (आचोले) येथे साकडे घालतांना भाविक

यामध्ये स्थानिक नागरिक, धर्मप्रेमी हिंदू, तसेच ‘सनातन प्रभात’चे वाचक सहभागी झाले. नालासोपारा येथे हिंदु जनजागृती समितीचे श्री. प्रथमेश कुडव यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

कोपरखैरणे (नवी मुंबई) येथे साकडे घालतांना भाविक

 

ठाणे जिल्ह्यात श्रीरामनवमीनिमित्त व्यापक धर्मप्रसार !

१७ मंदिरांमध्ये साकडे घातले

डोंबिवली (पूर्व) येथील राममंदिरात रामनवमीनिमित प्रवचन घेतांना हिंदु जनजागृती समितीचे श्री. सुनील कदम

ठाणे – सनातन संस्थेच्या वतीने जिल्ह्यातील ठाणे, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ आणि बदलापूर अशा १० ठिकाणी ग्रंथप्रदर्शन, तसेच सनातनची सात्त्विक उत्पादने यांचे विक्री केंद्र उभारून व्यापक धर्मप्रचार करण्यात आला. काही ठिकाणी ‘ऑनलाईन’ आणि ६ ठिकाणी ‘ऑफलाईन’ श्रीरामनाम संकीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. याचा हिंदुत्वनिष्ठांनी लाभ घेतला. देवतांना साकडे घालण्यात आले. या अभियानाचा प्रारंभ रामनवमीपासून करण्यात आला. जिल्ह्यातील ठाणे, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर आणि भिवंडी येथील एकूण १७ मंदिरांमध्ये हिंदुत्वनिष्ठ अन् भाविक यांच्याकडून साकडे घालण्यात आले. रामनवमीनिमित्त ठाणे आणि डोंबिवली येथे ३ ठिकाणी प्रवचनांचे आयोजन करण्यात आले होते. डोंबिवली (पूर्व) येथील रामनगर भागातील श्रीराम मंदिरात हिंदु जनजागृती समितीचे श्री. सुनील कदम यांनी श्रीरामनवमीचे महत्त्व सांगून श्रीरामनामाचा जप करून श्रीरामाची कृपा संपादन करण्याविषयी उपस्थितांना सांगितले.

डोंबिवली पूर्व येथील श्रीराममंदिरात हिंदु राष्ट्रासाठी श्रीरामाला साकडे घालतांना हिंदुत्वनिष्ठ

 

नंदुरबार येथे श्रीराममंदिरात साकडे !

नंदुरबार – येथील नमस्कार वसाहतीतील श्रीराममंदिरात साकडे घालण्यात आले. या वेळी हिंदु धर्मावर होणारे आघात आणि हिंदु राष्ट्र स्थापनेची आवश्यकता यांविषयी उपस्थितांना संबोधित करण्यात आले. हिंदु जनजागृती समितीचे डॉ. सतीश बागुल यांनी विषय मांडला. या वेळी पुष्कळ धर्मप्रेमी उपस्थित होते.

नाशिक – येथे सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त प्रभु श्रीरामाला साकडे घालण्यात आले. शहरातील गंगापूर रस्त्यावरील पंपिंग स्टेशन भागातील श्रीराम मंदिर आणि भोसला परिसरातील श्रीराम मंदिर येथे साकडे घालण्यात आले.

रायगडमध्ये कळंबोली, नवीन पनवेल, डेरवली, शिरढोण आणि रोहा येथील श्रीराम मंदिरांमध्ये साकडे घालण्यात आले. सर्वच ठिकाणी भाविकांची लक्षणीय उपस्थिती होती.

 

पुणे जिल्ह्यात विविध उपक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद !

गावठाण केंद्रातील तुळशीबाग राममंदिर कक्षात लावण्यात आलेला प्रदर्शन कक्ष

पुणे – श्रीरामनवमीच्या निमित्ताने १० एप्रिल या दिवशी पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवड येथील श्रीराम मंदिराच्या परिसरात ठिकठिकाणी सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथप्रदर्शन कक्ष लावण्यात आला होता. त्याला समाजातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. येथे सनातन संस्थेच्या वतीने श्रीरामनवमीनिमित्त सामूहिक नामजप आणि प्रवचन आयोजित करण्यात आले होते. सत्संगातील जिज्ञासूंनी धर्मशिक्षण फलक लिहून धर्मजागृती केली. एकूण १२ ठिकाणी फलकप्रसिद्धी करण्यात आली.

गावठाण केंद्रातील तुळशीबाग राममंदिरात लावलेल्या प्रदर्शनकक्षाला पुष्कळ चांगला प्रतिसाद मिळाला. ब्राम्हण बुधवार पेठेतील राममंदिरात गुढीपाडवा ते रामनवमी या काळात प्रवचन आणि नामजप असा उपक्रम प्रतिदिन घेण्यात आला. त्याला साधारणतः ५० जणांची उपस्थिती लाभली.

 

जळगाव नगरीचे ग्रामदैवत प्रभु श्रीरामाला साकडे !

प्रभु श्रीरामाला साकडे घालतांना धर्मप्रेमी

जळगाव – शहरातील श्रीराम मंदिरात हिंदुत्वनिष्ठ आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या वतीने हिंदु राष्ट्र निर्माण होऊन विश्वकल्याणासाठी साकडे घालण्यात आले. उपस्थित धर्माभिमानी हिंदूंनी प्रभु श्रीरामाला प्रार्थना केली की, ‘भारतासह संपूर्ण पृथ्वीवर हिंदु राष्ट्र स्थापन होऊन जगात शांतता नांदू दे. हिंदु राष्ट्राचे कार्य करणाऱ्या सर्व हिंदु प्रेमींचे रक्षण होऊन आयुरारोग्य उत्तम राहू दे, सर्व संत-महंत यांचे प्रकृतीस्वास्थ्य उत्तम राहू दे. या कार्यात अडचणी निर्माण करणाऱ्यांचे आणि धर्मावर आघात करणाऱ्यांचे प्रयत्न निष्प्रभ ठरू दे. विश्वात शांतता राहून युद्धजन्य परिस्थितीत सर्व हिंदु वीरांचे रक्षण होऊ दे आणि ईश्वरी राज्यासाठी पूरक परिस्थिती निर्माण होऊ दे !’

या वेळी सर्वश्री दत्तात्रय वाघुळदे, गजानन तांबट, भिका मराठे, राजू मराठे, संदीप लोंढे यांच्यासह अन्य धर्माभिमानी उपस्थित होते.

 

सांगली येथे विविध मंदिरांत साकडे घातले !

१. ईश्वरपूर येथे धोंडीराम महाराज मंदिर येथे ट्रस्टचे अध्यक्ष श्री. सुभाष बळवंत पाटील यांनी साकडे घातले. सनातन संस्थेचे ६६ टक्के आध्यात्मिक पातळीचे साधक श्री. राजाराम मोरे यांनी संकल्प सांगून नारळ अर्पण केला. या प्रसंगी माळी समाजाचे अध्यक्ष श्री. आनंदराव माळी उपस्थित होते.

२. शिंगण महादेव मंदिर आणि श्रीराम मंदिर येथे मंदिराचे विश्वस्त श्री. सुनील शिंगण अन् श्री. चंद्रशेखर शिंगण उपस्थित होते. सनातन संस्थेचे ६६ टक्के आध्यात्मिक पातळीचे साधक श्री. राजाराम मोरे यांनी संकल्प सांगून नारळ अर्पण केला. या प्रसंगी ५० महिला आणि २५ पुरुष यांची उपस्थिती होती. शिंगण मंदिरात प्रवचन करणारे श्री. राम गुरव यांनी पुढाकार घेऊन प्रार्थना सांगितली आणि १० मिनिटे नामजप घेतला.

कुंडल (जिल्हा सांगली) येथे साकडे घालतांना श्रीरामभक्त

३. कुंडल येथील श्रीराम मंदिरात साकडे घालण्यात आले. या प्रसंगी हिंदुत्वनिष्ठ श्री. गजानन हेंद्रे, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी श्री. सागर हेंद्रे, चौंडेश्वरी भजनी मंडळाच्या महिला, तसेच इतर श्रीरामभक्त उपस्थित होते.

 

कोल्हापूर येथे ३ ठिकाणी भाविकांकडून साकडे !

लांडोबा मंदिर – श्री हनुमान (मलकापूर-जिल्हा कोल्हापूर) येथे साकडे घालतांना भाविक

१. कोल्हापूर शहरात ३ ठिकाणी साकडे घालण्यात आले. नूतन मराठी शाळेजवळील श्रीराममंदिर येथे साकडे घालण्यात आले. या उपक्रमात मंदिराचे पुजारी श्री. विशाल मिरजकर यांनी पुढाकार घेतला, तसेच सौ. निकिता जाधव या भाविक उपस्थित होत्या.

साईबाबा मंदिर (जिल्हा कोल्हापूर) येथे साकडे घालतांना भाविक

साईबाबा मंदिर येथे मंदिराचे विश्वस्त श्री. गजानन बाबर यांनी साकडे घातले, तसेच संकल्प करून नारळ अर्पण केला. या वेळी सौ. विजयमाला जाधव यांनी उपस्थितांना विषय सांगितला, तर ‘सनातन प्रभात’च्या वाचिका सौ. पौर्णिमा पाटणकर उपस्थित होत्या. शहरात पुई खडी, राधानगरी रस्ता येथील श्रीराम मंदिरात झालेल्या उपक्रमात मंदिराचे पुजारी श्री. शंकर टिपुगडे यांनी पुढाकार घेतला, तर भाविक सौ. शरयू भाट, सौ. बाळकृष्ण भाट, सौ. पाटील उपस्थित होते.

गडहिंग्लज (जिल्हा कोल्हापूर) येते श्री दत्त मंदिरात साकडे घालण्यासाठी जमलेले भाविक

२. गडहिंग्लज (जिल्हा कोल्हापूर) येथे श्रीराम जन्मोत्सव झाल्यावर श्री दत्त मंदिरात साकडे घालण्यात आले.

मलकापूर येथील हर्डिकर यांच्या श्रीराम मंदिरात उपस्थित भाविकांना विषय सांगतांना सौ. ऐश्वर्या देसाई

३. मलकापूर येथे ३ ठिकाणी उपक्रम घेण्यात आला. लांडोबा मंदिर (श्री हनुमान मंदिर) आणि श्रीराम मंदिर येथे वैद्य संजय गांधी यांनी विषय मांडला, तर हर्डीकर यांच्या श्रीराम मंदिरात सौ. ऐश्वर्या देसाई यांनी विषय मांडला. शाहूवाडी येथील डॉ. जे.बी. पाटील (शिगावकर) यांच्या श्री गजानन महाराज मंदिर येथे हिंदु जनजागृती समितीचे श्री. प्रसाद कुलकर्णी यांनी उपस्थितांकडून ‘श्रीराम जय राम जय जय राम’ हा जप करवून घेतला.

 

सोलापूर, धाराशिव, लातूर आणि बीड जिल्ह्यांत धर्मप्रेमींनी श्रीरामाला घातले साकडे !

 

सोलापूर येथील श्री सिद्धरामेश्वर मंदिरात झालेल्या बैठकीला उपस्थित धर्मप्रेमी

सोलापूर – येथील श्री सिद्धरामेश्वर मंदिरात हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते आणि विविध हिंदुत्वनिष्ठ यांच्या उपस्थितीत पूजन अन् आरती करण्यात आली, तसेच या वेळी हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी श्री सिद्धरामेश्वरांना साकडे घालण्यात आले. या वेळी उपस्थित धर्मप्रेमींना जन्मोत्सव अभियानाचा उद्देश आणि स्वरूप समितीच्या श्रीमती अलका व्हनमारे आणि कु. वर्षा जेवळे यांनी सांगितले, तसेच अभियानामध्ये सहभागी होण्याचे आवाहनही केले. या वेळी सनातन संस्थेच्या पू. (कु.) दीपाली मतकर यांचीही वंदनीय उपस्थिती होती.

या वेळी सामाजिक कार्यकर्ते श्री. बापूसाहेब ढगे, हिंदुत्वनिष्ठ श्री. प्रमोद चिंचोलकर, सर्वश्री दिलीप पाटील, गणेश देवलकोंडा, अक्कलकोटे, आप्पा गवळी यांच्यासह पुष्कळ धर्मप्रेमी उपस्थित होते.

१. सोलापूर येथील लष्कर रस्ता येथील राममंदिर, अक्कलकोट येथील श्रीराममंदिर, ७० फूट येथील सिद्ध गणेश हनुमान मंदिर, विडी घरकुल येथे धर्मप्रेमी आणि समितीचे कार्यकर्ते यांनी श्रीरामाला सामूहिक प्रार्थना करून साकडे घातले.

२. शिरसोडी (जिल्हा पुणे) – येथील ग्रामदैवत श्री जोतिबा मंदिरात साकडे घालण्यात आले. या वेळी समितीचे कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

३. इंदापूर (जिल्हा पुणे) – येथील पडस्थळ येथे श्रीराम मंदिरात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्या ठिकाणी सर्वांनी मिळून श्रीरामाला साकडे घातले.

अंबाजोगाई येथील रेणुकादेवीच्या मंदिरात साकडे घालतांना धर्मप्रेमी आणि समितीचे कार्यकर्ते

४. अंबाजोगाई (जिल्हा बीड) – येथील पवनसुत हनुमान मंदिर, श्री योगेश्वरीमातेच्या मूळ जोगाई मंदिर, श्री रेणुकादेवी मंदिर आणि श्रीराम मंदिर या ठिकाणी दैनिक ‘सनातन प्रभात’चे वाचक, धर्मप्रेमी आणि सनातन संस्थेचे साधक यांनी सामूहिक प्रार्थना करून देवाला साकडे घातले. श्रीराम मंदिरामध्ये धर्मप्रेमी श्री. भवानी शंकर शर्मा यांच्या पुढाकाराने साकडे घालण्यात आले.

५. धाराशिव – येथील महादेव मंदिरामध्ये धर्मप्रेमी आणि साधक यांनी मिळून साकडे घातले.

तुळजापूर येथे श्री भवानीदेवीच्या मंदिरात देवीला साकडे घालतांना हिंदुत्वनिष्ठ आणि पुजारी

६. तुळजापूर (जिल्हा धाराशिव) – येथे श्री तुळजाभवानी मंदिरात समितीचे कार्यकर्ते, हिंदुत्वनिष्ठ, पुजारी यांच्या उपस्थितीत श्री भवानीदेवीला साकडे घालण्यात आले. साकडे घालण्यापूर्वी श्री भवानीदेवीची विधीवत् पूजा आणि आरती करण्यात आली. या वेळी सर्वश्री दिनेश कदम, कैलास कदम, चैतन्य मलबा, युवराज कदम, धनंजय बगडी, संजय कदम यांच्यासह समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Comment