२०० हून अधिक जिज्ञासूंनी घेतला शिबिराचा लाभ !


पुणे – सनातन संस्थेच्या वतीने पुणे शहर, भोर शिरवळ या भागांतील जिज्ञासूंसाठी ९ एप्रिल या दिवशी साधना सत्संग शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराला २०० हून अधिक जिज्ञासू उपस्थित होते. शिबिराच्या प्रारंभी श्री. विजय चौधरी यांनी शंखनाद केला. श्री. सम्राट देशपांडे, सुश्री उज्ज्वला ढवळे, सौ. रश्मी नाईक यांनी दीपप्रज्वलन करून या शिबिराचे उद्घाटन केले. सनातन संस्थेचे श्री. सम्राट देशपांडे यांनी या शिबिराचा उद्देश सांगितला. त्यानंतर काही जिज्ञासूंनी साधना सत्संगात सहभागी झाल्यानंतर त्यांना आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती आणि त्यांच्या जीवनात झालेले आमूलाग्र पालट यांविषयी अनुभवकथन केले. सौ. रश्मी नाईक, सुश्री उज्ज्वला ढवळे आणि श्री. सम्राट देशपांडे यांनी जिज्ञासू करत असलेल्या प्रयत्नांचे अवलोकन करून त्यांच्या प्रयत्नांतील शिकण्याची सूत्रे सर्वांना सांगितली. सद्गुरु सुश्री (कु.) स्वाती खाडये आणि श्री. नीलेश जोशी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

