सिक्कीममधील चीन सीमेजवळील ‘हनुमान टोक’ या जागृत
देवस्थानी श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी भारतभूमीच्या रक्षणासाठी केली प्रार्थना !
श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचा सिक्कीम राज्याचा दैवी दौरा !
प्रभु श्रीराम, लक्ष्मण आणि सीतामाता यांना भावपूर्ण प्रार्थना करतांना श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ
गंगटोक – सिक्कीमची राजधानी गंगटोकपासून ८ किलोमीटर अंतरावर हिमालय पर्वतांच्या कुशीत ‘हनुमान टोक’ हे पवित्र स्थान वसलेले आहे. या पर्वत शिखरांमध्ये ‘हनुमान टोक’ ही एक टेकडी आहे. असे म्हटले जाते की, हनुमंताने जेव्हा हिमालयातून संजीवनी वनस्पती असलेला द्रोणगिरी पर्वत घेऊन लंकेच्या दिशेने उड्डाण केले, तेव्हा तो काही काळ विश्रांती घेण्यासाठी या ठिकाणी थांबला होता. त्यामुळे स्थानिक लोक या स्थानाला ‘हनुमान टोक’ असे म्हणतात. येथील मातीचा स्पर्श आणि गंधही निराळाच आहे. श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ या सिक्कीम राज्याच्या दौऱ्यावर असतांना सप्तर्षींच्या आज्ञेने त्यांनी २१.०३.२०२२ या दिवशी ‘हनुमान टोक’ ठिकाणाला भेट दिली आणि हनुमंताचे दर्शन घेतले.
हनुमान टोक येथील श्री हनुमान मंदिर
‘हनुमान टोक’ मंदिराविषयीची माहिती
हनुमान मंदिरात रेखाटलेली भावपूर्ण चित्रे
वर्ष १९५२ मध्ये भारत सरकारचे एक उच्चपदस्थ अधिकारी श्री. अप्पाजी पंत जे मूळचे महाराष्ट्रातील होते, त्यांची सिक्कीम राज्यात नियुक्ती झाली होती. श्री. अप्पाजी पंत हे धार्मिक प्रवृत्तीचे आणि देवाचे भक्त होते. त्यांना झालेल्या दैवी दृष्टांतानुसार त्यांनी या ठिकाणी एका मंदिराची स्थापना केली आणि त्यामध्ये हनुमंताची मूर्ती प्रतिष्ठापित केली. वर्ष १९६८ पासून या टेकडीचे संपूर्ण दायित्व भारतीय सैन्याकडे आहे. या मंदिराची देखरेख, स्वच्छता, पूजा आणि भक्तांची सोय हे सर्व सैनिकच करतात.
हनुमान मंदिरात रेखाटलेली भावपूर्ण चित्रे
हनुमान टोक टेकडीवरील हनुमान मंदिरात जाण्यासाठी १०० हून अधिक पायऱ्या चढून जावे लागते. पायऱ्यांवरून जातांना मार्गामध्ये भारतीय सैन्याने हनुमंताविषयी भाव-भक्ती जागृत करणारी सुंदर चित्रे लावली आहेत. हवामान चांगले असेल आणि धुके नसेल, तर या टेकडीवरून ‘कांचनजुंगा’ पर्वताचे दर्शन होते.
श्रीराम, सीता आणि लक्ष्मण यांच्या मंदिराबाहेर बसलेल्या श्रीचितशक्ती (सौ.) अंजली गाडगीळ आणि महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे अन्य साधक
भारत-चीन सीमेपासून जवळच असलेल्या
हनुमान टोक येथून ‘हनुमंत देशाच्या सीमेचे रक्षण
करत आहे’, असे श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी सांगणे
श्रीराम, सीता आणि लक्ष्मण यांच्या मंदिराबाहेर बसलेल्या श्रीचित्शक्ती (सौ.) अंजली गाडगीळ
हनुमान टोक येथे हनुमान मंदिराच्या बाजूला श्रीराम, सीता, लक्ष्मण यांचे एक मंदिर आहे. या मंदिरात श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ नामजप आणि प्रार्थना करण्यासाठी बसल्या. तेव्हा त्यांच्या शरिराला कंप सुटला आणि शहारे आले. त्या म्हणाल्या, ‘‘हे क्षेत्र दैवी आहे. भारत-चीनची सीमा येथून केवळ ५० कि.मी. आहे. हनुमंत येथे राहून देशाच्या सीमेचे रक्षण करत आहे.’’
श्रीचितशक्ती (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या मागे दिसत असलेले श्री हनुमान मंदिर
या वेळी श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी ‘हे हनुमंता, हे रामदूता, या पवित्र भारतभूमीचे तू रक्षण कर. येणाऱ्या आपत्काळात श्रीरामाच्या भक्तांसाठी असलेल्या या भरतभूमीचे तू रक्षण कर’, अशी भावपूर्ण प्रार्थना केली. |
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार सद्गुरुंच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |