‘ई-बूक’ म्हणजे काय ?
‘ई-बूक’ (ई-पुस्तक) म्हणजे एखाद्या पुस्तकाचे केलेले डिजिटल किंवा इलेक्ट्रॉनिक रूपांतर होय. इंटरनेटला जोडलेल्या संगणकाच्या किंवा ‘स्मार्टफोन’च्या साहाय्याने हे पुस्तक ‘डाऊनलोड’ करून वाचता येते.
डावीकडून पू. नीलेश सिंगबाळ, इंग्रजी ‘ई-बूक’चे लोकार्पण करतांना श्री. जगजीतन पांडे, स्वामी ब्रह्ममयानंद आणि श्री. देव भट्टाचार्य
वाराणसी (उत्तरप्रदेश) – चैत्र नवरात्रीच्या पवित्र काळात वाराणसी येथील ‘अखिल भारतीय धर्मसंघ शिक्षा मंडल’चे महामंत्री श्री. जगजीतन पांडे यांच्या शुभहस्ते ‘इम्पॉर्टन्स ऑफ पर्सनॅलिटी डिफेक्ट रिमूव्हल अँड इन्कलकेटिंग व्हर्च्यूज्’ (स्वभावदोष निर्मूलन आणि गुणसंवर्धन यांचे महत्त्व) या सनातनच्या इंग्रजी भाषेतील ‘ई-बूक’चे लोकार्पण करण्यात आले. येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित प्रांतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनामध्ये लोकार्पणाचा हा कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रचारक संत पू. नीलेश सिंगबाळ, भारत सेवाश्रम संघाचे स्वामी ब्रह्ममयानंद आणि ‘रामनगर औद्योगिक असोशिएशन’चे अध्यक्ष श्री. देव भट्टाचार्य हे व्यासपिठावर उपस्थित होते.
मनाचे कार्य आणि आनंदी जीवन जगण्यासाठी स्वभावदोष अन् अहं निर्मूलन प्रक्रियेचे महत्त्व यासंदर्भात अमूल्य माहिती देणारे हे इंग्रजी भाषेतील ‘ई-बूक’ ॲमेझॉन किंडलवर उपलब्ध आहे.
वाचक हे ‘ई-बूक’ खालील लिंकवरून खरेदी करू शकतात. – https://www.amazon.in/dp/B09B2VGQYF