कीव (युक्रेन) – आम्हाला ठाऊक आहे की, रशियाला युक्रेनमधून पूर्णपणे हाकलून लावणे शक्य नाही; मात्र रशिया युक्रेनमधून बाहेर जाणार नसेल, तर तिसरे महायुद्ध होणे निश्चित आहे, असे विधान युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदिमिर झेलेंस्की यांनी केले. ते एका रशियन पत्रकाराला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.
झेलेंस्की पुढे म्हणाले की, युक्रेन रशियासमवेत शांतता कराराविषयी चर्चा करण्यास सिद्ध आहे; मात्र त्यासाठी आमच्या २ अटी आहेत. या चर्चेसाठी कोणत्याही तिसर्या देशाने हमी द्यावी, तसेच जनमत संग्रह केला पाहिजे.
रशिया युक्रेनची फाळणी करण्याच्या विचारात !
युक्रेनच्या एका अधिकार्याने झेलेंस्की यांचा संदर्भ देत सांगितले की, रशिया युक्रेनची फाळणी करण्याच्या विचारात आहे. तो उत्तर आणि दक्षिण कोरिया यांच्याप्रमाणे युक्रेनचे दोन देश करण्याच्या प्रयत्नात आहे.