जिवाने तन, मन, बुद्धी, चित्त, अहं आणि प्रकृती यांनी निर्मित स्वतःच्या अस्तित्वाचा, म्हणजे सर्वस्वाचा त्याग केल्यावर त्याला ईश्वरेच्छेने कार्य करून ईश्वरस्वरूप होता येते. साधनेमुळे आध्यात्मिक उन्नती होऊ लागल्यावर व्यक्तीच्या देहात दैवी पालट दिसून येतात. हे दैवी पालट व्यक्तीतील वाढत्या देवत्वाची प्रचीती देतात. सनातनच्या धर्मप्रचारक सद्गुरु (सुश्री (कु.)) अनुराधा वाडेकर यांच्या देहामध्ये झालेले काही बुद्धीअगम्य दैवी पालट आणि त्या संदर्भात साधकांना आलेल्या अनुभूती या लेखाद्वारे पाहूया.
सद्गुरु (सुश्री (कु.)) अनुराधा वाडेकर यांच्या उच्च आध्यात्मिक अनुभूती
१. ‘मला माझ्या आज्ञाचक्रावर संवेदना जाणवते.
२. दिवसातून काही वेळा मला ‘माझा श्वास एका लयीत होत आहे’, असे अनुभवायला येते.
३. कारण नसतांनाही मध्ये मध्ये मी आनंदाची स्थिती अनुभवते आणि मला स्थिरता जाणवते.
४. रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात साधक श्री. अक्षय पाटील यांच्या विवाहाच्या वेळी त्यांच्या नातेवाईकांच्या समवेत छायाचित्र काढले. ‘छायाचित्र कसे आले आहे ?’, हे पाहिले असता मला माझ्या डोक्याभोवती सोनेरी रंगाची प्रभावळ दिसली. ‘माझा तोंडवळाही प्रकाशमान जाणवला आणि तेथून तेजाचे प्रसरण होत आहे’, असे मला दिसले.’
– (सद्गुरु) सुश्री (कुमारी) अनुराधा वाडेकर
ठाणे सेवाकेंद्रातील साधकांना सद्गुरु (सुश्री (कु.))अनुराधा वाडेकर
यांच्या देहात जाणवलेले दैवी पालट आणि आलेल्या अनुभूती
सौ. पिरोज जाधव (वय ६१ वर्षे)
सद्गुरु (सुश्री (कु.)) अनुराधा वाडेकर यांच्या आज्ञाचक्रावर विभूतीच्या रंगाचा टिळा दिसणे : ‘११.१२.२०२१ या दिवशी सद्गुरु (सुश्री (कु.)) अनुराधा वाडेकर एक सत्संग घेत असतांना मला त्यांच्या आज्ञाचक्रावर विभूतीच्या रंगाचा टिळा असल्याचे दिसले.’
सौ. दीपाली विभांडिक (पूर्वाश्रमीची कु. दीपाली कदम)
१. सद्गुरु (सुश्री (कु.))अनुराधा वाडेकर यांच्या आज्ञाचक्रावर शिवतत्त्व जाणवणे : ‘१०.१२.२०२१ या दिवशी मी सद्गुरु ताईंना मर्दन करत होते. त्या वेळी त्यांच्या आज्ञाचक्रावर शिवतत्त्व जाणवत होते. तेथे ‘शिव ध्यानस्थ बसले आहेत’, असे वाटत होते.
२. आज्ञाचक्रावर पांढरी ज्योत असल्याचे दिसणे : १२.१२.२०२१ या दिवशी सद्गुरु अनुराधाताईंना मर्दन करण्याची सेवा करतांना मला त्यांच्या आज्ञाचक्रावर पांढरी ज्योत असल्याचे दिसले. तेव्हापासून ‘ती ज्योत मोठी होत आहे’, असे जाणवते.
३. १३.१२.२०२१ या दिवशी ‘सद्गुरु अनुराधाताईंचे आज्ञाचक्र आणि कपाळाचा भाग प्रकाशमान होत आहे’, असे जाणवले.’
सौ. नेहाली शिंपी
१. सद्गुरु ताईंच्या आज्ञाचक्रावर शिवपिंडीसारखा उंचवटा आणि प्रकाश दिसणे : ‘मला सद्गुरु ताईंच्या आज्ञाचक्रावर शिवपिंडीसारखा उंचवटा आणि प्रकाश दिसतो, तसेच तेथे शिवाचा तिसरा डोळा असल्याप्रमाणे जाणवते. आधीच्या तुलनेत आता तो मला सहजपणे दिसतो.
२. मला सद्गुरु ताईंकडे पाहिल्यावर आनंद जाणवतो.
३. सद्गुरु ताईंच्या खोलीत चालत असतांना मला हवेत चालल्याप्रमाणे जाणवते.
४. दोन दिवसांपूर्वी मला ‘सद्गुरु अनुताई बसतात तो पलंग झोक्याप्रमाणे हलत आहे’, असे जाणवले.’
तज्ञ, अभ्यासू आणि वैज्ञानिक दृष्टीने संशोधन करणारे यांना विनंती !
‘संतांच्या देहातील बुद्धीअगम्य पालटांविषयी संशोधन करून त्यांचा कार्यकारणभाव शोधून काढण्यासाठी साधक प्रयत्न करत आहेत. त्यासाठी सद्गुरु (सुश्री (कु.)) अनुराधा वाडेकर यांचे आज्ञाचक्र आणि कपाळाच्या बाजूचा भाग प्रकाशमान होण्यामागे काय कारण आहे ? या संदर्भात तज्ञ, अभ्यासू, या विषयाचे शिक्षण घेणारे विद्यार्थी आणि वैज्ञानिक दृष्टीने संशोधन करणारे यांचे साहाय्य आम्हाला लाभल्यास आम्ही कृतज्ञ असू.’
– व्यवस्थापक, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
संपर्क : श्री. रूपेश रेडकर,
ई-मेल : mav.research२०१४@gmail.com
‘आम्ही आध्यात्मिक संशोधनाच्या दृष्टीकोनातून साधनेमुळे व्यक्तीचे अंतर्मन, बाह्यमन आणि शरीर यांच्यावर होणार्या परिणामांचा अभ्यास करत आहोत. या परिणामांकडे जिज्ञासू वृत्तीने पाहिले, तरच ईश्वर या संदर्भातील अमूल्य ज्ञान देईल अन्यथा बुद्धीप्रामाण्यवादात अडकल्यास ईश्वर भरभरून देत असलेल्या देणगीपासून आपण वंचित राहू.’ – संपादकयेथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार संतांच्या/साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |