
देवद (पनवेल) – व्यापारी संघटनेचे अध्यक्ष, ज्वेलर्स असोसिएशनचे अध्यक्ष आणि भाजपचे संघटक श्री. कमलेश कोठारी यांनी नुकतीच येथील सनातन संस्थेच्या आश्रमाला भेट दिली. या वेळी त्यांनी आश्रमात करण्यात येणार्या विविध सेवांविषयी जाणून घेतले. या वेळी त्यांच्या समवेत हिंदुत्वनिष्ठ श्री. मनीष तिवारी होते. कोठारी म्हणाले, ‘‘हिंदु धर्मासाठी तुम्ही करत असलेले कार्य समजले. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी काय करायला हवे, हे लक्षात आले.’’