Home > कार्य > समाजसाहाय्य > भगिनींनो, शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक आत्मबल वाढण्यासाठी साधनेची कास धरा ! – सौ. मोहिनी मांढरे, सनातन संस्था भगिनींनो, शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक आत्मबल वाढण्यासाठी साधनेची कास धरा ! – सौ. मोहिनी मांढरे, सनातन संस्था March 18, 2022 Share this on : उरण (जिल्हा रायगड) येथे महिलादिनानिमित्त व्याख्यान (डावीकडून) श्री गोपाल कृष्ण वाचनालयाचे सचिव श्री. श्रीकांत वैशंपायन, अध्यक्ष अधिवक्ता पराग म्हात्रे, ज्येष्ठ कार्यकारिणी मंडळ सदस्या श्रीमती मालती भावे आणि सनातनच्या सौ. मोहिनी मांढरे उरण (जिल्हा रायगड) – आपल्यासमोर आदर्श राजमाता जिजाऊ, अहिल्याबाई होळकर, राणी चेन्नम्मा, राणी लक्ष्मीबाई या वीरांगना आहेत. प्रत्येक पुरुषामागे एक स्त्री शक्तीच्या रूपाने कार्यरत असते. पंडिता विदुषी तिलोत्तमा आणि महाकवी कालिदास यांच्या उदाहरणातून स्पष्ट केले. कालिदास यांची विवाहाच्या वेळी फसवणूक झाल्याने तिलोत्तमाने ‘तुम्ही जेव्हा ज्ञानी व्हाल, तेव्हाच माझे खर्या अर्थाने पती असाल’, असे सांगून त्यांच्याकडून अभ्यास करवून घेतला. पुढे ते कवी कालिदास म्हणून राजकवी बनले. घरातली स्त्री ही सुसंस्कारी असेल, तर कुटुंब संस्कारक्षम होते. धर्माचरण हे प्रत्येक स्त्रीने करायला हवे. महिलांचे शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक आत्मबल वाढण्यासाठी साधना करणे आवश्यक आहे, असे सनातन संस्थेच्या सौ. मोहिनी मांढरे या वेळी म्हणाल्या. येथील श्री गोपाळकृष्ण वाचनालय येथे वाचनालयातील वाचकांसाठी महिला दिनानिमित्त ‘महिला सक्षमीकरण’ या विषयावर सनातन संस्थेच्या वतीने व्याख्यान घेण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन वाचनालयाचे उपाध्यक्ष श्री. अरुण पाठारे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. वृषाली पाठारे यांनी, तर आभारप्रदर्शन ग्रंथपाल सौ. जिजा घरत यांनी केले. या वेळी अनेक जिज्ञासू उपस्थित होते. या वेळी वाचनालयाचे अध्यक्ष अधिवक्ता पराग म्हात्रे, माजी अध्यक्षा सौ. वैशाली कोळगावकर, तसेच अन्य कर्मचारी हे उपस्थित होते. Share this on : संबंधित लेख सनातन संस्थेच्या वतीने ‘बिंदूदाबन उपचार’ शिबिराचे छत्रपती संभाजीनगर येथे आयोजन !अहिल्यानगर येथे सनातन संस्थेच्या वतीने बिंदूदाबन उपचार शिबिर पार पडले !सनातन संस्था आयोजित बिंदूदाबन शिबिराचा नाशिक जिल्ह्यातील शिबिरार्थींनी घेतला लाभ !पुणे येथील विश्वशांतीनिकेतन विद्यालयाच्या कुरुळी शाखेमध्ये पालकांसाठी व्याख्यानाचे आयोजन !धरुहेडा (हरियाणा) येथे सनातन संस्थेच्या वतीने ‘नैतिक मूल्यांचे संवर्धन’ या विषयावर मार्गदर्शनसनातन संस्थेच्या वतीने मथुरा (उत्तरप्रदेश) येथील ‘राधा माधव इंटर कॉलेज’मध्ये ‘तणाव निर्मूलन’ विषयावर व्याख्यान पार...