पुणे – महाशिवरात्रीच्या निमित्ताने पुणे जिल्ह्यात, तसेच पिंपरी-चिंचवड येथे सनातन संस्थेच्या वतीने सात्त्विक उत्पादने, ग्रंथप्रदर्शन, फ्लेक्स प्रदर्शन, फलक लेखन, प्रत्यक्ष आणि ‘ऑनलाईन’ व्याख्यान यांच्या माध्यमातून व्यापक धर्मप्रसार करण्यात आला. पुणे जिल्ह्यात २२ ठिकाणी, तर पिंपरी-चिंचवड २२ येथे ठिकाणी ग्रंथप्रदर्शन आणि सात्त्विक उत्पादने यांचे कक्ष उभारण्यात आले होते. या कक्षास भाविक-जिज्ञासू यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. अनेकांनी संस्थेचे कार्य जिज्ञासेने जाणून घेतले. हे प्रदर्शन लावण्यात धर्मप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ यांचा सक्रीय सहभाग होता. काही प्रदर्शनस्थळी विविध मान्यवरांनी भेटी दिल्या.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका शाळा नेवाळे वस्ती येथे इयत्ता पाचवी ते सातवीच्या मुलांना महाशिवरात्रीविषयी माहिती सांगण्यात आली. या वेळी ९५ विद्यार्थी उपस्थित होते.
‘पूना केबल’वर सकाळी ८ ते ९ या वेळेत महाशिवरात्रीविषयीचे व्हिडिओ दाखवण्यात आले. ‘पीसीएम्सी केबल टीव्ही’वर २८ फेब्रुवारी आणि १ मार्च या दिवशी सकाळी ८ आणि सायंकाळी ७ वाजता व्हिडिओ दाखवण्यात आले.
धानोरी विश्रांतवाडी येथील भैरवनाथ मंदिर, तसेच हडपसर येथील निळकंठेश्वर मंदिरात फ्लेक्स प्रदर्शन लावण्यात आले होते. त्याला जिज्ञासूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
मान्यवरांच्या दिलेल्या भेटी
१. धायरेश्वर मंदिर प्रदर्शन कक्षाला आमदार भीमराव (अण्णा) तापकीर यांनी भेट दिली. ‘तुमचे कार्य अतिशय उत्तम आहे. तुम्ही सर्वजण भक्तांसाठी पुष्कळ चांगले काम करता’, असे ते म्हणाले.
२. भाजपच्या नगरसेविका सौ. वर्षा तापकीर, कोथरूड प्रभाग क्रमांक १३ च्या नगरसेविका सौ. मंजुश्री खर्डेकर, माजी नगरसेवक श्री. योगेश मोकाटे, नगरसेविका सौ. अल्पना गणेश वरपे, नगरसेविका सौ. हर्षाली दिनेश माथवड, तसेच भाजपा कोथरूड मतदारसंघाचे सरचिटणीस श्री. गिरीश भेलके यांनीही ठिकठिकाणच्या कक्षांना भेटी दिल्या.
३. शिवगणेश महादेव मंदिर येथे वडगांव बुद्रुकचे विश्वस्त श्री. हेमंतदादा दांगट पाटील आणि श्री. संभाजी दांगट पाटील यांच्या हस्ते शिवाच्या ५०० नामपट्ट्यांचे वितरण करण्यात आले.
वैशिष्ट्यपूर्ण घटना
१. ‘प्रजापिता ब्रह्मकुमारी’ या संस्थेच्या महिलांनी प्रदर्शनाला भेट दिली. ‘उपस्थित साधकांच्या तोंडवळ्यावर आनंद जाणवतो’, असे सांगून त्यांनी साधकांना खाऊ दिला.
२. बिबवेवाडी येथे देवीच्या मंदिरात सनातनच्या साधिका फलक लिखाण करण्यास गेल्यावर विश्वस्तांनी स्वतः नवीन फलक लिहिण्यासाठी आणून दिला. फलक लिहून झाल्यानंतर त्यांनी फलकाला हळदी-कुंकू वाहिले, फुले वाहिली आणि पूजा केली, तसेच खडीसाखरेचा प्रसाद उपस्थितांना वाटायला सांगितला. त्यांनी फलकावर ‘श्री’ लिहून स्वस्तिक काढले.
३. विठ्ठल-रखुमाई मंदिर, बिबवेवाडी येथे मंदिरातील एक गृहस्थ सनातनचे साधक फळा लिहायला कधी येतात, याचीच वाट पहात होते.
४. हडपसर येथील सनातन प्रभातच्या वाचिकेच्या मुलीने ‘ऑनलाईन’ नोकरी सांभाळून कार्डशीटवर स्वतःहून ५ फलक सिद्ध करून दिले.
५. जिज्ञासू आणि व्यवसायाने शिक्षिका असणार्या सौ. संगीता लोखंडे यांनी महाशिवरात्रीचे हस्तपत्रक भिंतीवर लावले अन् स्वतःच्या भ्रमणभाषमध्ये ‘स्टेटस’लाही ठेवले.