फरिदाबाद (हरियाणा) – महाशिवरात्रीच्या निमित्ताने २२ फेब्रुवारी या दिवशी सनातनच्या पूनम अरोडा यांनी येथील पिंपलेश्वर मंदिरामध्ये येणार्या भाविकांना मार्गदर्शन केले. या वेळी त्यांनी शिवाच्या उपासनेचे अध्यात्मशास्त्रीय महत्त्व, शास्त्राप्रमाणे शिवाचे पूजन कसे करावे ?, ‘ॐ नम: शिवाय ।’ नामजप करण्याचे लाभ, तसेच कुलदेवता आणि ‘श्री गुरुदेव दत्त’ नामजप का करावा ? यांविषयी माहिती दिली. या मार्गदर्शनाचा अनेक जिज्ञासूंनी लाभ घेतला.
महाशिवरात्रीच्या दिवशी ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन
येथील पिंपलेश्वर मंदिर आणि सेक्टर २८ मधील शिवशक्ती मंदिर येथे सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथप्रदर्शन लावण्यात आले होते. या प्रदर्शनाचा अनेक जिज्ञासूंनी लाभ घेतला. प्रदर्शनाच्या ठिकाणी ‘सनातन चैतन्यवाणी ॲप’च्या माध्यमातून भगवान शिवाचा नामजप लावण्यात आला होता. हा नामजप ऐकून काही जिज्ञासूंनी हे ‘ॲप’ही ‘डाऊनलोड’ करून घेतले.