‘रोटरॅक्ट क्लब ऑफ कृष्णा व्हॅली’चे माजी अध्यक्ष किर्ती भगवानदास पटेल यांच्याकडून कै. ग.रा. पुरोहित कन्या प्रशालेस सनातनची ग्रंथसंपदा भेट !

कै. ग.रा. पुरोहित कन्या प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीमती श्रद्धा सुनील केतकर (डावीकडे) यांना ग्रंथ भेट देतांना श्री. किर्ती भगवानदास पटेल

सांगली – येथील सनातन संस्थेचे हितचिंतक, तसेच ‘रोटरॅक्ट क्लब ऑफ कृष्णा व्हॅली’चे माजी अध्यक्ष श्री. किर्ती भगवानदास पटेल यांच्याकडून कै. ग.रा. पुरोहित कन्या प्रशालेस विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरतील, असे ग्रंथ भेट देण्यात आले. हे ग्रंथ शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती श्रद्धा सुनील केतकर यांनी स्वीकारले. या वेळी सनातन संस्थेच्या साधिका सौ. स्मिता माईणकर आणि सौ. शीतल जोशी उपस्थित होत्या. भेट देण्यात आलेल्या ग्रंथांमध्ये ‘सात्त्विक आहाराचे महत्त्व’, ‘अभ्यास कसा करावा’, ‘असात्त्विक आहाराचे दुष्परिणाम’, ‘बोधकथा’, ‘सुसंस्कार चांगल्या सवयी’, ‘भोजनापूर्वीचे आचार’, ‘टी.व्ही. मोबाईल, इंटरनेटचे दुष्परिणाम’, अशा ग्रंथांचा समावेश आहे.

 

सनातनचे ग्रंथ अत्यंत उपयुक्त असून विद्यार्थीदशेत
सुसंस्कार करणारे आहेत ! – श्रीमती श्रद्धा सुनील केतकर

हे ग्रंथ अत्यंत उपयुक्त असून विद्यार्थीदशेत सुसंस्कार आहेत. हे ग्रंथ निश्चितच विद्यार्थिनींच्या भावी आयुष्याला नवीन दिशा देणारे ठरतील. यासाठी या अमूल्य भेटीबद्दल प्रशालेच्या वतीने आभार, असे मत मुख्याध्यापिका श्रीमती श्रद्धा सुनील केतकर यांनी व्यक्त केले.

कै. ग.रा. पुरोहित कन्या प्रशालेस भेट दिलेले ग्रंथ, तसेच मुख्याध्यापिका श्रीमती श्रद्धा सुनील केतकर (डावीकडे) आणि किर्ती भगवानदास पटेल (उजवीकडे)

 

सनातनच्या उपक्रमांची माहिती समजल्यावर ते
तात्काळ राबवण्यास अनुमती देणार्‍या श्रीमती श्रद्धा सुनील केतकर !

या वेळी सनातन संस्थेच्या वतीने राबवण्यात येणार्‍या विविध ग्रंथांची माहिती श्रीमती श्रद्धा सुनील केतकर यांना दिल्यावर, ‘‘या वर्षीचे शैक्षणिक वर्ष संपले असून जूनपासून चालू होणार्‍या नवीन वर्षात हे उपक्रम राबवू’’, असे त्यांनी सांगितले. १० वीच्या विद्यार्थ्यांच्या पालक सभेत प्रथमोपचार शिबिर घेऊ शकता, असे त्यांनी सुचवले, तसेच व्यक्तीमत्त्व विकासाच्या अंतर्गत स्वभावदोष निर्मूलन, शौर्यजागरण प्रवचन, स्वरक्षण प्रशिक्षणविषयक प्रात्यक्षिके घेण्यासही अनुमती दिली.

 

सनातनच्या ग्रंथातील अनमोल ज्ञानामळे विद्यार्थिनींना
त्यांचे आयुष्य घडवण्यास साहाय्य ! – किर्ती भगवानदास पटेल

सनातनच्या ग्रंथातील अनमोल ज्ञानामुळे विद्यार्थिनींना त्यांचे आयुष्य घडवण्यास साहाय्य होईल. यातील ज्ञान हे दिशादर्शक असून आयुष्यात कोणतेही निर्णय घेतांना ते मार्गदर्शक ठरतील; म्हणून हे ग्रंथ मला शाळेला भेट द्यावे वाटले, असे मनोगत श्री. किर्ती भगवानदास पटेल यांनी या प्रसंगी व्यक्त केले.

Leave a Comment