नांदेड – येथील विष्णुपुरी गावातील श्री काळेश्वर महादेव मंदिर येथे सनातन संस्थेच्या वतीने सात्त्विक उत्पादने आणि ग्रंथ यांचे प्रदर्शन लावण्यात आले होते. या प्रदर्शनाला अनेक मान्यवरांनी भेटी दिल्या. श्री काळेश्वर महादेव मंदिराचे सचिव श्री. बालाजी हंबर्डे यांनी ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादन यांच्या प्रदर्शनाचे दीपप्रज्वलन केले, तर विष्णुपुरी गावचे सरपंच विलास हंबर्डे यांनी सनातन संस्थेच्या ग्रंथाचे (ज्ञानगंगेचे) पूजन केले. या वेळी नांदेड शहराचे पालकमंत्री आणि राज्याचे महसूलमंत्री अशोकराव चव्हाण यांना ‘सण उत्सव साजरे करण्यामागील शास्त्र’ हा ग्रंथ भेट देण्यात आला. माजी खासदार अन् काळेश्वर देवस्थानचे अध्यक्ष भास्करराव खतगावकर, तसेच नांदेड दक्षिण मतदारसंघाचे मोहनराव हंबर्डे यांनी प्रदर्शनाला भेट दिली.
Home > कार्य > अध्यात्मप्रसार > नांदेड येथे सनातन संस्थेच्या वतीने लावण्यात आलेल्या प्रदर्शनाला मान्यवरांच्या भेटी !
नांदेड येथे सनातन संस्थेच्या वतीने लावण्यात आलेल्या प्रदर्शनाला मान्यवरांच्या भेटी !
Share this on :
Share this on :
संबंधित लेख
नवी मुंबईतील सनातन संस्थेच्या ग्रंथप्रदर्शनाला मान्यवरांच्या भेटी !
श्री रामलल्ला प्राणप्रतिष्ठेच्या वर्षपूर्तीनिमित्त सनातन संस्थेच्या वतीने हरियाणामध्ये कार्यक्रमांचे आयोजन
नवी मुंबईत क्रेडाई-बी.ए.एन्.एम्.च्या ‘प्रॉपर्टी एक्झिबिशन’मध्ये सनातन संस्थेचे ग्रंथ प्रदर्शन !
हिंदु आध्यात्मिक आणि सेवा मेळा, मुंबई येथे सनातन संस्थेच्या प्रदर्शनाला आरंभ !
श्री दत्तगुरूंच्या उपासनेने मनुष्यजीवनातील अनेक त्रासांवर मात करणे शक्य ! – सद़्गुरु स्वाती खाडये, सनातन...
सनातन संस्थेच्या वतीने रांची (झारखंड) येथे साधनाविषयक प्रवचन पार पडले !