
मुंबई – महाशिवरात्रीच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने मुंबई, मुंबई उपनगरे, नवी मुंबई येथे एकूण ४१ ठिकाणी शिवमंदिरांमध्ये सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथप्रदर्शने लावून अध्यात्मप्रसार करण्यात आला. कोरोनाविषयक नियमांचे पालन करून लावण्यात आलेल्या या ग्रंथप्रदर्शनांचा सहस्रो जिज्ञासूंनी लाभ घेतला.


या वेळी शिवसेना करवीर तालुकाप्रमुख राजू यादव, रिक्शासेना जिल्हाप्रमुख राजू जाधव, कामगारसेना जिल्हाप्रमुख राजू सांगावकर, रिक्शासेना शहरप्रमुख वसंत पाटील, बाबुराव पाटील, सुनील पारपाणी उपस्थित होते.