‘व्हॅलेंटाईन डे’ सारख्या पाश्चात्त्य विकृतीला देशातून हद्दपार करून धर्मरक्षणासाठी सिद्ध व्हा ! – सद्गुरु (सुश्री(कु.)) स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था

‘व्हॅलेंटाईन डे’च्या वाढत्या कुप्रथेविषयी राष्ट्रप्रेमी,
हितचिंतक आणि जिज्ञासू यांचे ‘ऑनलाईन’ व्याख्यानातून प्रबोधन

सद्गुरु (सुश्री ) स्वाती खाडये

 

छत्रपती शिवाजी महाराजांसह देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणांची
आहुती देणार्‍या क्रांतीकारकांचा आदर्श ठेवा ! – सद्गुरु (सुश्री) स्वाती खाडये

प्रेम हे केवळ तरुण-तरुणींचे नव्हे, तर गुरु-शिष्य, माता-पिता, भाऊ-बहीण यांच्या पवित्र नात्यांतही असते, तसेच ते मातृभूमी, राष्ट्र अन् धर्म यांविषयीही असते. हिंदवी स्वराज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज, देशाच्या स्वातंत्र्यासाठी युवावस्थेतच प्राणांची आहुती देणारे भगतसिंग, राजगुरु, सुखदेव, चापेकर आदी क्रांतीकारकांचा आदर्श आपल्यासमोर ठेवा.

पुणे – आज भारताकडे ‘युवकांचा देश’ म्हणून पाहिले जाते. भारताच्या लोकसंख्येतील २२ टक्के लोकसंख्या १८ ते २८ वयोगटातील आहेत. आजचे युवक-युवती मात्र हिंसक आणि अश्लील मालिका, चित्रपट, व्यसनाधीनता, बंगला-गाडी अशा भौतिक सुखात अडकले आहेत. ‘व्हॅलेंटाईन डे’ साजरा करणे, म्हणजे खरे प्रेम हे केवळ एका दिवसापुरते आणि दिखाऊ असते का ? स्वामी विवेकानंद हे ‘देशाला वळण कसे लागावे ?’, याची चिंता करत असत; मात्र आजचा युवक ‘केसाला वळण लागावे’, या चिंतेत आहे. मातापित्यांना ‘ओल्ड एज होम’मध्ये (वृद्धाश्रमात) पाठवून ‘मदर्स् डे – फादसर्् डे’ साजरा करण्याची पद्धत पाश्चात्त्य आहे. त्यामुळे ‘व्हॅलेंटाईन डे’ सारख्या पाश्चात्त्य विकृतीचे दुष्परिणाम जाणून तिला देशातून हद्दपार करूया आणि धर्मरक्षणासाठी सिद्ध होऊया, असे मार्गदर्शन सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु (सुश्री (कु.)) स्वाती खाडये यांनी केले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘व्हॅलेंटाईन डे’च्या वाढत्या कुप्रथेविषयी ११ फेब्रुवारी या दिवशी राष्ट्रप्रेमी, हितचिंतक आणि जिज्ञासू यांचे ‘ऑनलाईन’ व्याख्यानातून प्रबोधन करण्यात आले. त्या वेळी त्या मार्गदर्शन करत होत्या. या व्याख्यानाला मुंबई, ठाणे, रायगड, पुणे, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या जिल्ह्यांतून आणि गोवा राज्य येथून १ सहस्रहून अधिक राष्ट्रप्रेमी, हितचिंतक आणि जिज्ञासू उपस्थित होते.

या व्याख्यानाचा प्रारंभ प्रार्थना आणि श्री गणेशाच्या श्लोकाने झाला. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे युवा संघटक श्री. हर्षद खानविलकर यांनी व्याख्यानाचा उद्देश सांगितला. या व्याख्यानाचे सूत्रसंचालन कु. प्राची शिंत्रे यांनी केले.

क्षणचित्रे

१. ‘राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणार्थ आपण सिद्ध आहात ना !’, असे सद्गुरु (सुश्री) स्वाती खाडये यांनी विचारल्यावर काही क्षणांतच ४५० धर्मप्रेमींनी ‘जय श्रीराम’ असा संदेश पाठवून त्याला अनुमोदन दिले.

२. व्याख्यानामध्ये प्रार्थना चालू असतांना श्री. हर्षद खानविलकर यांना ते बसलेल्या ठिकाणी मागच्या बाजूला २ मोर दिसले.

विशेष अभिप्राय
१. श्री. धोंडीराम पवार – व्याख्यानाचा विषय लहान मुले, युवा आणि प्रौढ यांच्यासाठी उपयुक्त होता. हिंदूंचे संघटन करून त्यांना धर्मशिक्षण देणे, ही काळाची आवश्यकता आहे.

२. श्री. प्रशांत भुजबळ – पालकांनी धर्मशिक्षण घेऊन ते मुलांना शिकवायला हवे. सर्वांनी एकत्रितपणे पाश्चात्त्यांच्या बौद्धिक गुलामगिरीतून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करायला हवेत.

आनंदी रहाण्यासाठी धर्मशिक्षण घेणे आणि
धर्माचरण करणे आवश्यक ! – सद्गुरु (सुश्री (कु.)) स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था

सोलापूर येथे ‘ऑनलाईन’ आयोजित केलेला श्री गणेश जयंती सोहळा भावपूर्ण वातावरणात पार पडला !

हिंदूंना धर्मशिक्षण मिळत नसल्याने ते धर्माचरण करण्यातील आनंद घेऊ शकत नाहीत. ‘हॅलो’ या शब्दाचा अर्थ माहिती नसूनही मोठ्या उत्साहाने तो अनेक जण उच्चारतात, त्याऐवजी ‘नमस्कार’, ‘जय श्रीराम’, ‘जय श्रीकृष्ण’ असे म्हणण्याने मोठ्या प्रमाणात धर्माची शक्ती जाणवते. ती शक्ती अनुभवायला हवी. त्यामुळे आनंदी रहाण्यासाठी धर्मशिक्षण घेणे आणि धर्माचरण करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु (सुश्री (कु.)) स्वाती खाडये यांनी केले. सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने श्री गणेश जयंती सोहळ्याचे ‘ऑनलाईन’ आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी त्या  ‘साधना आणि गुरुसेवा’ या विषयावर मार्गदर्शन करत होत्या. या वेळी श्री गणेशाची मानसपूजा सनातन संस्थेच्या संत पू. (कु.) दीपाली मतकर यांनी सांगितली. या सोहळ्यात ३३० हून अधिक जिज्ञासू सहभागी झाले होते.

या सोहळ्याचे सूत्रसंचालन हिंदु जनजागृती समितीच्या कु. ऋतुजा ढगे यांनी केले. सोहळ्यामध्ये ‘ऑनलाईन’ उपस्थित असलेल्या धर्मप्रेमींनी श्री गणेशाचा एकत्रित नामजप केला, तसेच शंखनाद करून श्री गणेशाची आरती करण्यात आली. सोहळ्याची सांगता सङ्कष्टनाशन-स्तोत्राने करण्यात आली. या वेळी अनेक धर्मप्रेमींनी ‘श्री गणेशाचे अस्तित्व अनुभवता आले’, असे सांगितले.

Leave a Comment