परात्पर गुरु डॉ. आठवले
१. परात्पर गुरु डॉ. आठवले हे अवतारी पुरुष असून
त्यांनी भारतातच नव्हे, तर जगभरात हिंदु राष्ट्र (ईश्वरी राज्य) आणण्याचा संकल्प केला असणे
ईश्वरी राज्य येण्यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले हे गेली ३० – ३५ वर्षे कार्यरत आहेत. हा ‘सत् विरुद्ध असत्’ असा लढा आहे. या कार्यासाठी त्यांनी साधनारत असलेले सहस्रो साधक घडवले आहेत आणि त्यांना ते या समष्टी साधनेसाठी मार्गदर्शन करत आहेत. त्याचा परिणाम आता दिसून येत आहे. अनेक जिज्ञासू या समष्टी कार्याला जोडले जात आहेत. तसेच भारतातील संत आणि हिंदुत्वनिष्ठ हेही आता हिंदु राष्ट्राची मागणी सार्वजनिकरित्या करू लागले आहेत.
परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या उजव्यागालावर भारताच्या नकाशाप्रमाणे दिसत असलेला आकार (गोलात मोठा करून दाखवला आहे.)
२. भारत देश हे विश्वाचे बीज असल्याने तेथे ईश्वरी राज्य आल्यास जगभरात
ते आपोआपच येणार असणे आणि त्याच्या नकाशाप्रमाणे आकार परात्पर गुरु डॉ. आठवले
यांच्या गालावर दिसून आला, म्हणजे भारताला ईश्वरी राज्य येण्याचे वरदान मिळालेले असणे
ईश्वरी राज्याच्या स्थापनेतील हा ‘सत् विरुद्ध असत्’चा लढा इतकी वर्षे सूक्ष्मातून लढला गेला. आता त्या युद्धात विजय प्राप्त होऊ लागल्यावर तो आता स्थुलातून होण्याची वेळ आली आहे. स्थुलातून होणार असलेला लढा म्हणजे होणार असलेले तिसरे महायुद्ध ! भारत देश हा विश्वगुरु आहे. तेथे ईश्वरी राज्य आल्यास जगभरात ते आपोआपच येणार आहे. त्याचप्रमाणे भारत देश हे विश्वाचे बीज आहे. त्यामुळे या बिजात ईश्वरी राज्य आल्यास ते वृक्षात आपोआपच पसरणार आहे. हे भारताचे महत्त्व आहे. त्यामुळे परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या गालावर भारताच्या नकाशाप्रमाणे आकार दिसून आला आहे. असा आकार दिसणे, हे त्यांचे आध्यात्मिक वैशिष्ट्य आहे. त्यांच्यासारख्या अवतारी पुरुषाच्या गालावर भारताच्या नकाशाप्रमाणे आकार दिसणे, म्हणजे आध्यात्मिकदृष्ट्या भारताला ईश्वरी राज्याचे वरदान मिळाले आहे.
सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ
३. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या उजव्या गालावर आणि त्यांचा उजवा डोळा
अन् उजवा कान यांच्या मध्ये भारताच्या नकाशाप्रमाणे आकार दिसण्याचा लागलेला अर्थ
मनुष्याची उजवी बाजू म्हणजे सूर्यनाडीशी संबंधित आहे. भारतात ईश्वरी राज्य येण्याचे कार्य चालू असल्याने परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या उजव्या गालावर भारताच्या नकाशाप्रमाणे आकार दिसत आहे. ईश्वरी राज्य येण्यामध्ये भारताच्या पश्चिम आणि पूर्व दिशेला जी शत्रू राष्ट्रे आहेत, त्यांचा अडथळा आहेच. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या उजव्या गालावर भारताचा नकाशा अशा रितीने दिसत आहे की, त्याची पूर्व बाजू उजव्या डोळ्याच्या बाजूला आणि पश्चिम बाजू उजव्या कानाच्या दिशेने आहे. आध्यत्मिकदृष्ट्या डोळे हे तेजतत्त्वाशी संबंधित असतात, तर कान हे आकाशतत्त्वाशी संबंधित असतात. त्यामुळे तेजतत्त्व आणि आकाशतत्त्व भारताचे त्याच्या शत्रूराष्ट्रांपासून रक्षण करणार आहेत.
४. कृतज्ञता
परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने त्यांच्या गालावर दिसून आलेल्या भारताच्या नकाशासारख्या आकाराविषयी ही आध्यात्मिक स्तरावरील सूत्रे शिकायला मिळाली, याबद्दल मी त्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतो.’
– (सद्गुरु) डॉ. मुकुल गाडगीळ, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा.
आध्यात्मिक संशोधनाकडे शिकण्याच्या दृष्टीकोनातून पहा !
‘आम्ही आध्यात्मिक संशोधनाच्या दृष्टीकोनातून साधनेमुळे व्यक्तीचे अंतर्मन, बाह्यमन आणि शरीर यांच्यावर होणार्या परिणामांचा अभ्यास करत आहोत. ‘जिज्ञासूच ज्ञानाचा अधिकारी असतो’, या उक्तीप्रमाणे साधनेमुळे होणार्या परिणामांकडे जिज्ञासू वृत्तीने पाहिले, तरच ईश्वर या संदर्भातील अमूल्य ज्ञान देईल अन्यथा बुद्धीप्रामाण्यवादात अडकल्यास ईश्वर भरभरून देत असलेल्या देणगीपासून आपण वंचित राहू.’ – महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा.