प्रजासत्ताकदिनानिमित्त देवद (पनवेल) येथील ‘सनातन संकुल’मधील बालसाधकांनी काढली प्रबोधन फेरी

‘सनातन संकुल’मधील फेरीत सहभागी झालेले बालसाधक

पनवेल – २६ जानेवारी या दिवशी प्रजासत्ताकदिनाच्या निमित्ताने देवद गावातील ‘सनातन संकुल’मधील सनातनच्या बालसाधकांनी उत्स्फूर्तपणे प्रबोधन फेरी काढली. प्लास्टिकचा राष्ट्रध्वज न वापरण्याविषयी या वेळी बालसाधकांनी प्रबोधन केले. या वेळी ‘भारतमाता की जय’, ‘जय श्रीराम’ अशा घोषणा बालसाधकांनी दिल्या. तसेच ‘धर्म की जय हो । अधर्म का नाश हो । प्राणीयोमें सद्भावना हो । विश्व का कल्याण हो ।’ असा जयघोषही करण्यात येत होता. फेरीसाठी बालसाधकांनी स्वतःहून राष्ट्रध्वज, तसेच भगवे झेंडे आणले होते.मुले सामाजिक अंतर पाळून या फेरीत सहभागी झाली होती. येथील स्वयंभू शिवमंदिरापासून फेरीचा आरंभ होऊन संकुलातील परिसरात फेरी झाल्यावर सांगताही या मंदिरापाशी करण्यात आली. फेरीच्या आरंभी राष्ट्रगीत, तर अखेरीस ‘वन्दे मातरम्’ म्हणण्यात आले. सर्व कार्यक्रम झाल्यानंतर कृतज्ञता व्यक्त केली.

Leave a Comment