हिंदु युवा वाहिनी’कडून सनातन संस्थेच्या सौ. प्राची जुवेकर यांचा विशेष सन्मान

  • ‘हिंदु युवा वाहिनी’च्या वतीने ‘हिंदु युवा संमेलन’ आणि ‘हिंदु रत्न’ सन्मान कार्यक्रम पार पडला !
  • ‘हिंदु युवा वाहिनी’कडून सनातन संस्थेच्या सौ. प्राची जुवेकर यांचा विशेष सन्मान
सौ. प्राची जुवेकर

वाराणसी – आज संपूर्ण विश्वामध्ये सर्वाधिक युवक भारतात आहेत आणि हे युवकच क्रांती करू शकतात. क्रांतीसाठी आध्यात्मिक बळाची आवश्यकता असते. त्यासाठी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श घेऊन साधना आणि धर्माचरण करणे आवश्यक आहे. तेव्हाच त्यांच्यामध्ये धर्माविषयी खरा अभिमान जागृत होईल आणि ते इतरांमध्येही धर्मजागृती करू शकतील, असे प्रतिपादन सनातन संस्थेच्या सौ. प्राची जुवेकर यांनी केले. ‘हिंदु युवा वाहिनी’च्या वतीने २ जानेवारी २०२२ या दिवशी येथील नाटीइमलीमधील गणेश मंडपम्मध्ये ‘हिंदु युवा संमेलन’ आणि ‘हिंदु रत्न सन्मान’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमामध्ये सौ. प्राची जुवेकर यांना ‘विशेष अतिथी’ म्हणून आमंत्रित करून त्यांचा सन्मान करण्यात आला. या वेळी उपस्थितांना संबोधित करतांना त्या बोलत होत्या.

या कार्यक्रमाला अन्नपूर्णा मंदिराचे महंत दिगंबर शंकरपुरी महाराज यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमामध्ये समाजामध्ये उल्लेखनीय कार्य करून हिंदुत्वाचा गौरव वाढवल्याविषयी काशी येथील २७ व्यक्तींना शाल आणि स्मृतीचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.

 

क्षणचित्रे

१. हिंदु युवा वाहिनीचे वाराणसी मंडल प्रभारी श्री. अम्बरीशसिंह भोला यांनी सनातन संस्थेला स्वत:हून राष्ट्र आणि धर्मशिक्षण देणारे फ्लेक्स फलक अन् ग्रंथ प्रदर्शन लावण्याची विनंती केली.

२. सौ. प्राची जुवेकर यांचा विषय ऐकून अनेक युवक आणि महिला प्रभावित झाल्या.

३. अनेक युवकांनी हिंदु राष्ट्र, प्रथमोपचार, आपत्काळ आणि धर्माचरण यांच्याशी संबंधित ग्रंथ खरेदी केले अन् हिंदी पाक्षिक ‘सनातन प्रभात’चे सदस्य झाले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment