लेख क्रमांक : ७
मागील लेख क्रमांक ६ वाचण्यासाठी भेट द्या. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीसमोरील औदुंबराच्या वृक्षाची पाने सूर्यप्रकाशात चकाकत असल्यासारखी दिसण्यामागील अध्यात्मशास्त्र
सनातनच्या ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांना मिळत असलेले समजण्यास कठीण असणारे अपूर्व ज्ञान ! सनातन संस्थेच्या ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांना विविध विषयांच्या संदर्भात ज्ञान मिळते. हे ज्ञान काही वेळा कळण्यास कठीण असते, तर काही वेळा त्यात असणार्या काळ्या शक्तीमुळे ते अनेक वर्षे वाचणे शक्य होत नाही. असे काही तरी असते, हे वाचकांना कळावे, यासाठी लेख येथे देत आहोत. (लेख ७) |
ज्ञानाची धारिका वाचतांना परात्पर गुरु डॉ. आठवले आणि कु. मधुरा भोसले यांना आलेल्या अनुभूती
१. परात्पर गुरु डॉ. आठवले ज्ञानातील कठीण भाषा आणि त्रासदायक शक्ती यांच्यामुळे १४ वर्षांमध्ये ८ वेळा प्रयत्न केल्यानंतर ते वाचू शकणे
७.४.२००७ या दिवशी प्रथम ही धारिका पाहिल्यावर मला तीव्र त्रास जाणवला; म्हणून मी धारिका पडताळली नाही. त्यानंतर २०.१२.२००९, २८.१२.२०११, ९.६.२०१५, २३.११.२०२० या दिवशी धारिका पाहिल्यावरच तीव्र त्रास जाणवला; म्हणून धारिका पडताळली नाही. २०.१२.२०२० या दिवशी सूत्र क्र. १ अ.पर्यंत धारिका वाचल्यावर डोळ्यांवर आणि डोक्यात दाब जाणवला; म्हणून पुढचे वाचले नाही. २९.१२.२०२० या दिवशीही धारिका उघडून बघितल्यावर त्रास झाला. शेवटी १८.११.२०२१ या दिवशी धारिका पडताळता आली.
१८.११.२०२१ या दिवशी धारिका वाचण्यात येणार्या अडचणींचे प्रमाण ३० टक्के होते. त्यातील ज्ञानाची भाषा ३० टक्के कठीण आणि लिखाणावर असलेले त्रासदायक शक्तीचे आवरण २० टक्के असल्यामुळे ते ज्ञान कळणे कठीण होत होते. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
२. कु. मधुरा भोसले यांना धारिका बघितल्यावर ज्ञानातील त्रासदायक शक्तीमुळे डोके जड होणे आणि संगणकाच्या पडद्यापासून (स्क्रीनपासून) दोन फूट अंतरावर हाताचा पंजा आणल्यावरही पंजा मागे ढकलल्याप्रमाणे जाणवणे
या धारिकेतील ज्ञानामध्ये त्रासदायक शक्ती साठलेली असल्यामुळे ते वाचतांना डोके जड होते. संगणकाच्या पडद्यापासून (स्क्रीनपासून) दोन फूट अंतरावर हाताचा पंजा आणल्यावर त्रास जाणवतो आणि पंजा मागे ढकलल्याप्रमाणे जाणवतो. – कु. मधुरा भोसले (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२८.१.२०२१)
पर्यावरणाची सूक्ष्म स्तरावरील थोडक्यात ओळख आणि पर्यावरण नष्ट करण्यासाठी वाईट शक्तींनी विविध काळात केलेले प्रयत्न
ज्ञानप्राप्तकर्ते : श्री. निषाद देशमुख (आताची आध्यात्मिक पातळी ६२ टक्के)
अनुक्रमणिका
- ज्ञानाची धारिका वाचतांना परात्पर गुरु डॉ. आठवले आणि कु. मधुरा भोसले यांना आलेल्या अनुभूती
- १. परात्पर गुरु डॉ. आठवले ज्ञानातील कठीण भाषा आणि त्रासदायक शक्ती यांच्यामुळे १४ वर्षांमध्ये ८ वेळा प्रयत्न केल्यानंतर ते वाचू शकणे
- २. कु. मधुरा भोसले यांना धारिका बघितल्यावर ज्ञानातील त्रासदायक शक्तीमुळे डोके जड होणे आणि संगणकाच्या पडद्यापासून (स्क्रीनपासून) दोन फूट अंतरावर हाताचा पंजा आणल्यावरही पंजा मागे ढकलल्याप्रमाणे जाणवणे
- पर्यावरणाची सूक्ष्म स्तरावरील थोडक्यात ओळख आणि पर्यावरण नष्ट करण्यासाठी वाईट शक्तींनी विविध काळात केलेले प्रयत्न
- १. व्याख्या
- २. पर्यावरणाची उत्पत्ती , स्थिती, सध्याची स्थिती आणि लय या स्थितींच्या वेळी त्रिगुणांचे प्रमाण
- ३. पर्यावरण नष्ट होण्याची स्थूल आणि सूक्ष्म कारणे
- ४. वाईट शक्तींची पर्यावरण नष्ट करण्याची प्रक्रिया
१. व्याख्या
१ अ. ‘पर्यावरण’ या शब्दाची ‘श्री गुरुतत्त्वा’ने दिलेली अयोग्य व्याख्या
‘पश्य + आवरण’ या शब्दापासून ‘पश्यावरण’ शब्दाची उत्पत्ती झाली. या शब्दाचा अपभ्रंश होऊन ‘पर्यावरण’ हा शब्द निर्माण झाला. ‘पश्य’ शब्दाचे दोन अर्थ आहेत.
१. पश्य म्हणजे बघणे. स्थूल स्वरूपात आपल्याला जे दिसते आणि ज्यामध्ये आपण अडकतो (स्थूल जगत, प्राणी इत्यादी) ते पश्यावरण.
२. ज्या आवरणाला पश्यंती (उच्च) वाणीवर ताबा असलेले जीव ओळखू शकतात, ते आवरण म्हणजेच माया.
– श्री गुरुतत्त्व (श्री. निषाद देशमुख यांच्या माध्यमातून, ८.५.२००६, सकाळी ९.०७)
१ आ. ‘पर्यावरण’ या शब्दाची ‘एक विद्वान’ यांनी दिलेली योग्य व्याख्या
संकलक : पर्यावरण शब्दाची वरील व्याख्या योग्य आहे का ?
एक विद्वान : नाही.
१ आ १. पर्यावरण, वातावरण आणि वायूमंडल यांविषयी ‘एक विद्वान’ यांनी दिलेली माहिती
अ . पर्यावरण : पर्यावरण म्हणजेच ‘पर्याप्त स्थितीत निर्माण झालेली आवरणात्मक माया.’ वर्तमानस्थितीला ‘पर्याप्त स्थिती’ असे म्हणतात. वर्तमानस्थितीत वातावरणात विविध ऊर्जांच्या संचयातून, तसेच कार्यकारी भावातून अनेक तर्हेचे प्रवाह निर्माण होत असतात आणि लयाला जात असतात. या नश्वर वर्तमानात्मक वायूमंडलाच्या स्थितीला ‘पर्यावरण’ म्हणतात.
आ. वातावरण : हा शब्द त्या त्या ऊर्जात्मक पर्यावरणाशी संबंधित क्षेत्राला उद्देशून म्हटला जातो. ‘वातावरण’ याचा अर्थ वातरूपी, म्हणजेच वायूधारणात्मक पोकळीने युक्त आवरण.
इ. वायूमंडल : पर्यावरण आणि वातावरण या दोहोंच्या संगमाने ‘वायूमंडल’ बनते. वायूमंडलात या दोन्ही, म्हणजेच जडत्वधारी ‘पर्यावरण धारणा’ आणि त्याला सामावून घेणारी ‘पोकळीस्वरूप क्षेत्र’, म्हणजेच वातावरण धारणा सामावलेली असते.
– एक विद्वान (७.४.२००७, दुपारी १२.३३)
१ इ. ‘पर्यावरण’ या शब्दाची ‘धर्मतत्त्व’ यांनी सांगितलेली व्याख्या
‘अ. पूर्ण ब्रह्मांडात विविध प्रकारची आवरणे असतात. त्यापैकी जे आवरण भूमंडलावरून कार्यरत होते, त्याला ‘पर्यावरण’ म्हणतात.
आ. ‘ब्रह्मदेवाच्या ‘पर्य’ इच्छाशक्तीच्या क्रमिक दोहनामुळे (पिळवणूकीमुळे) मायेने ज्या आवरणाची उत्पत्ती केली, ते ‘पर्यावरण’. पंचतत्त्वाच्या टप्प्याटप्प्याने, म्हणजेच एक-एक पंचतत्त्वाचे पृथ्वीच्या उत्पत्तीसाठी झालेले निर्गुणातून सगुणतेच्या क्रमानुसार पिळवणूकीलाच ‘क्रमिक पिळवणूक’ असे म्हणतात.’
– धर्मतत्त्व (श्री. निषाद देशमुख यांच्या माध्यमातून, ८.५.२००६, सकाळी ९.०९)
२. पर्यावरणाची उत्पत्ती , स्थिती, सध्याची स्थिती आणि लय या स्थितींच्या वेळी त्रिगुणांचे प्रमाण
उत्पत्ती | स्थिती | सध्याची स्थिती | लय * | |
सत्त्व | ३५ | ३० | २० | २० |
रज | ३० | ३० | ३० | २० |
तम | ३५ | ४० | ५० | ६० |
एकूण | १०० | १०० | १०० | १०० |
– श्री गुरुतत्त्व (श्री. निषाद देशमुख यांच्या माध्यमातून, ८.५.२००६, सकाळी ९.११)
* एक विद्वान (७.४.२००७, दुपारी १२.५९)
२ अ. सध्याच्या पर्यावरणाच्या स्थितीसाठी कारणीभूत घटक
कारण | टक्के | |
१. | स्थूल | ३० |
२. | सूक्ष्म | ७० |
एकूण | १०० |
३. पर्यावरण नष्ट होण्याची स्थूल आणि सूक्ष्म कारणे
३ अ. स्थूल कारणे
३ अ १. मानवाचे अधर्माचरण
द्वापरयुगाच्या तुलनेत कलियुगात मनुष्याचे अधर्माचरण १० टक्क्यांनी वाढले आहे. त्यामुळे वायूमंडलात तमकणांचा प्रभाव वाढून सत्त्वकण कमी होत गेले. सत्त्व, रज आणि तम यांचा समतोल बिघडल्यामुळे पर्यावरणातील प्रत्येक घटकाचे बंधन नष्ट झाले आणि पूर्ण धर्म विस्कळीत झाला.
३ अ २. विज्ञानाचा अनुचित प्रयोग
विज्ञानाचा मानवाने आपल्या बुद्धीने अयोग्य पद्धतीने वापर केला. त्यामुळे विज्ञानातून प्रक्षेपित होणार्या शक्तीचा पर्यावरणाच्या विरुद्ध उपयोग सुरू झाला. विज्ञानातून प्रक्षेपित होणार्या शक्तीमुळे तमकण प्रबळ होत गेले.
३ आ. सूक्ष्म कारणे
३ आ १. उच्च पातळी असलेले संत नसणे
सत्य, त्रेता आणि द्वापर या युगांत मानवांत प्रचंड प्रमाणात सात्त्विकता होती. त्यामुळे त्यांच्याकडून काही प्रमाणात सात्त्विकतेचे प्रक्षेपण केले जात होते. तसेच या काळात उन्नत जीव प्रचंड प्रमाणात होते. त्यांच्या अस्तित्वामुळे वातावरणात असलेल्या सत्त्वकोषाला सत्त्वकणांचा पुरवठा होत असल्यामुळे तमकणांचे प्रमाण आपोआप कमी व्हायचे.
३ आ २. धर्मतेज असलेला राजा नसणे
पूर्वीच्या काळी अनेकदा पर्यावरणाची घडी बिघडायची; परंतु त्या वेळी धर्माचरण करणारे राजे असल्यामुळे त्यांना स्वतःलाच राजबळावर पर्यावरणाला संतुलित करता यायचे. एखाद्या देवतेचा आदेश किंवा कोप यांमुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडल्यास राजा आपल्या सामर्थ्याने त्यांना संतुलित करायचा, उदा. सात्त्विक राजा जनकाने पाऊस पडण्यासाठी शेतात नांगर चालवला.
३ आ ३. यज्ञ-यागासारखे अनुष्ठान कमी होणे
यज्ञ केल्यामुळे, तसेच त्या यज्ञात पर्यावरणात व्याप्त घटकांना देव समजून त्यांना यज्ञाचे फळ अर्पण केल्यामुळे त्या त्या घटकांची तृप्ती होऊन त्यांचा तोल योग्य स्वरूपात स्थिर रहायचा. सध्याच्या काळात होत असलेले यज्ञ हे अज्ञय (टीप) असल्यामुळे त्यातून सात्त्विकतेचे संवर्धन अत्यल्प प्रमाणात होऊन पर्यावरणावर परिणाम होतो.
टीप – ‘अज्ञानरूपी यज्ञकर्माच्या प्रकटतेलाच ‘अज्ञयता’ असे म्हटले जाते. सध्याच्या काळात होत असलेले यज्ञ हे यज्ञामागील मूळ कार्यकारणरूपी ज्ञानाच्या अभावी, म्हणजेच ‘समष्टी कल्याण साध्य करण्याचे ध्येय’ या यज्ञाच्या मूळ विचारापासून विलग होत असल्यामुळे ‘अज्ञय यज्ञ’ हा शब्द वापरला आहे.’ – एक ज्ञानी (७.१.२००७, संध्याकाळी ६.०५)
३ आ ४. वाईट शक्तींचे षडयंत्र
पर्यावरणाला इजा पोहोचवण्यात वाईट शक्तींचा सर्वांत मोठा हात आहे. वाईट शक्तींनी पद्धतशीरपणे हिंदूंना छळले आणि त्यांची वैदिक परंपरा, धर्म यांना लुप्त करण्याच्या कटात त्यांना काही प्रमाणात यश मिळाले. त्यामुळे धर्मसूर्य लुप्त होऊन प्रत्येक घटकात व्याप्त धर्मही हळूहळू लुप्त होऊ लागला. वाईट शक्तींनी अधर्माला प्रोत्साहन देऊन त्याचे संवर्धन करून त्याच्या माध्यमातून समाजात तमकणांचे प्रक्षेपण वाढवले. (श्री. निषाद देशमुख यांच्या माध्यमातून, ८.५.२००६, सकाळी ९.१२)
४. वाईट शक्तींची पर्यावरण नष्ट करण्याची प्रक्रिया
४ अ. प्रमुख उद्देश
वाईट शक्तींनी पर्यावरण नष्ट व्हावे किंवा त्याचा तोल बिघडावा, यासाठी प्रयत्न करायला प्रारंभ केला. पर्यावरणाचा तोल बिघडवण्यासाठी वाईट शक्तींनी तमकणांचे सर्वदूर समप्रमाणात प्रक्षेपण केले. त्यामुळे वाईट शक्तींना संपूर्ण पृथ्वीला तमकणांनी भरून पृथ्वीवरून स्वर्गलोकापर्यंत जाणार्या ऊर्ध्वरेषेवर (या रेषेच्या माध्यमातून स्वर्गलोक ते पृथ्वीलोकापर्यंत संपर्क रहातो.) अधिपत्य निर्माण करून त्या माध्यमातून स्वर्गलोकापर्यंत आपले राज्य स्थापित करण्यात यश मिळवता येणार होते. (श्री. निषाद देशमुख यांच्या माध्यमातून, ८.५.२००६, सकाळी ९.१२)
४ आ. पर्यावरण बिघडवण्यासाठी वाईट शक्तींनी केलेले प्रयत्न
अज्ञात शक्ती : अधर्मपक्षाकडून पर्यावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला गेला, तर धर्मपक्षाने काय केले ? पर्यावरणाच्या रक्षणासाठी धर्म-अधर्माचे लढे केव्हापासून चालू झाले ? अधर्मपक्षाने केलेली कृती आणि त्यावर त्यांना खर्च कराव्या लागणार्या शक्तीचे प्रमाण काय ?
धर्मतत्त्व : पर्यावरण बिघडवण्यासाठी वाईट शक्तींचे प्रयत्न वर्ष १९३० पासून चालू झाले. याच काळापासून त्याला विरोध करण्यासाठी धर्मपक्षानेही लढा चालू केला. कालगणनेप्रमाणे चक्र पाच वेळा पूर्ण फिरले की, पंचक्रमचक्र (स्थूल कालगतीच्या वरच्या कालगतीचे चक्र) पूर्ण होते. (अनुक्रमे पाच वेळा पूर्ण फिरणार्या चक्राला ‘पंचक्रमचक्र’ अशी संज्ञा आहे.) प्रत्येक पंचक्रमचक्रात काय काय घडामोडी झाल्या, ते पुढे दिलेल्या सारणीत दिले आहे. त्या त्या काळात काय प्रक्रिया झाली ?, हे सारणीच्या पुढे दिले आहे.
पंचक्रमकाळ (वर्ष) | वाईट शक्तींनी खर्च केलेल्या शक्तीचे प्रमाण (टक्के) | |
१. | १९३१-१९३५ | २० |
२. | १९३६-१९४० | ३० |
३. | १९४१-१९४५ | ३० |
४. | १९४६-१९५० | ५० |
५. | १९५१-१९५५ | ७० |
६. | १९५६-१९६० | ५० |
७. | १९६१-१९६५ | ३० |
८. | १९६६-१९७० | ५० |
९. | १९७१-१९७५ | ७० |
१०. | १९७६-१९८० | ३० |
११. | १९८१-१९८५ | ५० |
१२. | १९८६-१९९० | ९० |
१३. | १९९१-१९९५ | ६५ |
१४. | १९९६-२००० | ७० |
१५. | २००१-२००५ | ९० |
४ इ. त्या त्या काळात झालेली प्रक्रिया
* वर्ष १९३१ ते १९३५
पर्यावरण म्हणजे पंचतत्वांची सगुण स्वरूपात झालेली उत्पत्ती. हे वाईट शक्तींना ज्ञात असल्यामुळे त्यांनी सर्वात जास्त प्रमाणात तमकणांचे प्रमाण असलेल्या पृथ्वीच्या स्थूल स्वरूपाची निवड करून त्याच्यात तमकणांचे प्रक्षेपण चालू केले. यासाठी वाईट शक्तींनी अन्य तेल इत्यादींचे रसातळामध्ये स्थान निर्माण करून त्रासदायक तंतूंचे साठे करणे चालू केले.
* वर्ष १९३६ ते १९४०
१. त्यांनी पृथ्वीच्या आतल्या बाजूला असलेल्या स्तरापर्यंत धैर्यवीर सिद्धींचा वापर करून त्रासदायक तंतूंचे साठे निर्माण करून ते पसरवले. त्यामुळे पूर्ण विश्वात असलेल्या भूमीवर त्रासदायक तंतूंचे अधिपत्य निर्माण होऊन सत्त्वकण नष्ट झाले.
२. पृथ्वीच्या खालच्या स्तरातील अन्न-संवर्धन पोकळीत त्रासदायक तंतूंचे प्रक्षेपण केले. त्यामुळे पृथ्वीवरील अन्न (भारताला सोडून) तमकणाने भारित झाले.
३. भूमीवर तमकणांचे मोठे आवरण निर्माण झाले. त्यामुळे जिवांची प्राणशक्ती न्यून व्हायला प्रारंभ झाला.
* वर्ष १९४१ ते १९४५
१. विश्वयुद्धात मेलेल्या जिवांचे शव जमिनीत पुरल्यामुळे भूमीच्या गर्भात त्रासदायक शक्तींचे साठे वाढले.
२. भूभागाच्या खालच्या टोकाच्या (पृथ्वीच्या ‘केंद्रबिंदू’च्या) वरच्या भागात असलेल्या आपतत्त्वाला नष्ट करू न शकल्यामुळे त्याच्यात विषारी वायूचे प्रक्षेपण केले.
३. विश्वयुद्धामुळे निर्माण झालेल्या त्रासदायक तीर्यक लहरींचे भारतावर प्रक्षेपण केले.
४. विश्वपोकळीत स्थित असलेल्या चैतन्याला विरोध करण्यासाठी जास्त प्रमाणात शक्ती खर्च करून आवरण निर्माण केल्यामुळे ५० टक्के चैतन्य पुन्हा परावर्तित होते.
*वर्ष १९४६ ते १९५०
१. भारताच्या फाळणीचा लाभ घेऊन वाईट शक्तींनी भारताच्या भूमीत त्रासदायक तंतूंचे मोठे साठे निर्माण केले.
२. मेलेल्या अनेक मुसलमानांमध्ये त्रासदायक शक्ती भरण्यात आली आणि त्यांना जमिनीत पुरून भारताच्या पुण्यभूमीत त्रासदायक शक्ती कायम स्वरूपात भरून ठेवणे वाईट शक्तींना शक्य झाले.
३. भारत सोडून अन्य देशांत विविध प्रकारचे विधी करून वायूत यंत्रे बसवण्यात आली. यंत्रांच्या माध्यमातून यंत्रांचे आणि प्रसंगी मंत्रांचे कार्यही करता येते. त्यामुळे वायू दूषित होऊ लागला.
४. वाईट शक्तींना सूर्याच्या तेजाला इजा करणे शक्य नसल्यामुळे त्यांनी विविध प्रकारच्या आवरणांची निर्मिती केली. त्या माध्यमातून त्यांना पूर्ण विश्वात येत असलेले सूर्याचे तेज १० ते १५ टक्के थांबवणे शक्य झाले.
*१९५१-१९५५
१. भारताच्या प्रमुखांचा वाईट शक्तींनी ताबा घेतल्यामुळे पूर्ण भारतात ९१ ठिकाणी सूक्ष्म-यंत्रे स्थापित करण्यात आली. त्यामुळे भारतावर सतत त्रासदायक शक्तीचे प्रक्षेपण करणे वाईट शक्तींना शक्य झाले.
२. पूर्ण विश्वात वाईट शक्तींचे ५० ते ७० टक्के राज्य होते.
३. वाईट शक्तींना सूक्ष्म स्तरावर मोठ्या प्रमाणात लढा द्यावा लागल्यामुळे त्यांना विजय प्राप्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर शक्ती खर्च करावी लागली.
* वर्ष १९५५ ते १९६०
१. वाईट शक्तींनी आपल्या मंत्रशक्तीच्या घर्षणाच्या साहाय्याने सुप्त विषाणू जागृत करून त्यांना भूमंडलात सर्व ठिकाणी प्रकाशाच्या गतीने पाठवले.
२. वाईट शक्तींनी कलीच्या जागृत शक्तीच्या आधारे हिमालयातून प्रक्षेपित होणार्या थंड चैतन्यदायक स्फूर्तीत्मक लहरींचे प्रक्षेपण थांबवले.
३. कलीच्या जागृतीमुळे बळीची शक्ती वाढली. त्यामुळे ब्रह्मांडात कार्यरत कृष्णविवराकडे ज्या पोकळीतून त्रासदायक शक्ती जाते, त्या पोकळीचे आकुुंचन वाढले आणि भूमंडलातून कृष्णविवराकडे जात असलेल्या वाईट शक्तींचे प्रमाण ३० टक्के कमी झाले.
* वर्ष १९६१ ते १९६५
१. वाईट शक्तींनी भूमंडलाच्या कक्षमर्यादेत असलेल्या वायूचे संचारण दूषित करणे चालू केले. यासाठी त्यांनी मूळ कलीबिजाच्या गर्भातून मायावी वायूचे बाहुल्य असलेली तमात्मक ‘अधोगामी वायू शक्ती’ घेतली आणि त्या शक्तीतून असंख्य यंत्रांची निर्मिती करून त्यांच्या माध्यमातून असंख्य त्रासदायक जंतूंची निर्मिती केली अन् त्यांचे वार्यात प्रक्षेपण केले.
२. वाईट शक्तींनी सूर्याचे तेज कमी व्हावे, यासाठी मायावी आकर्षण शक्तीचे आवरण निर्माण केले. त्यामुळे सूर्याचे तेज १० टक्के कमी झाले, तर स्थुलातून २-३ टक्के प्रकाश न्यून झाला.
३. वाईट शक्तींनी भूमातेच्या उत्पादनक्षमतेवर प्रहार केला. त्यामुळे पृथ्वीची उत्पादकता एकूण १० ते ३० टक्के कमी झाली.
४. वाईट शक्तींची शक्ती वाढल्यामुळे वायूच्या खालच्या पट्ट्यात तमकणांचे प्रक्षेपण होऊ लागले.
* वर्ष १९६६ ते १९७०
१. वाईट शक्तींनी ‘आकाश सोडून इतर स्थूल चार तत्त्वांवर ३० टक्क्यांहून जास्त प्रमाणात ताबा घेता यावा’, यासाठी बळीराजाच्या एकत्रित शक्तीच्या बळावर पंचतत्त्वावर आक्रमण केले.
२. पृथ्वीतत्त्वाच्या सर्व भागांवर वाईट शक्तींनी आक्रमण करून त्रासदायक शक्तीचे जडत्वदर्शक अधोगामी चिकट साठे निर्माण केले. त्यामुळे अन्नात त्रासदायक शक्तीचे प्रमाण वाढले.
३. वाईट शक्तींनी आपतत्त्वात १० टक्के विष मिळवण्यात यश प्राप्त केले. त्यामुळे पाणी दूषित होऊन अनेक जिवांमध्ये विषाने प्रवेश केला.
४. वायूतत्त्वाचा दूषितपणा १० टक्के वाढला.
* वर्ष १९७१ ते १९७५
१. वाईट शक्तींनी आकाशतत्त्वावर ताबा मिळवता यावा, म्हणून कली आणि बळीराजा यांची इच्छाशक्ती अन् क्रियाशक्ती यांच्या आधारे पंचधनुष्य, म्हणजे ब्रह्मांडाच्या तेजःपुंजाला ग्रहण करून घेतलेले शक्ती घेतली.
२. तेजःपुंजाने पुण्यवान वाईट शक्तींना आकाशावर ताबा घेण्यासाठी पाठवण्यात आले. ते फक्त स्थूल आकाशावर १० टक्के ताबा मिळवू शकले.
३. आकाशावर ताबा मिळाल्यामुळे वाईट शक्तींना अन्य घटकांवरचा परिणाम १० टक्के वाढवता आला.
* वर्ष १९७६ ते १९८०
१. वाईट शक्तींनी त्रासदायक वज्रशक्तीच्या आधारे पृथ्वीच्या मूळ बिंदूतून (भारतातून) ब्रह्मांड-पोकळीपर्यंत जाणार्या आणि विश्वाची रचना योग्य स्वरूपात ठेवणार्या रेषेवर हल्ला केला. त्यामुळे भारतात अप्रत्यक्षपणे आपत्काळ आला.
२. आपत्काळात वाईट शक्तींची शक्ती दुप्पट झाली. त्यामुळे निसर्गातून प्रक्षेपित होणार्या रज-सत्त्वात्मक लहरींचे नैसर्गिक प्रक्षेपण न्यून झाल्यामुळे देशात संकट निर्माण झाले.
३. आपत्काळाच्या शेवटी युद्धामुळे वाईट शक्तींची शक्ती अल्प झाल्यामुळे एका क्षणातच भारतावर आलेले संकट अल्प झाले.
* वर्ष १९८१ ते १९८५
१. वाईट शक्तींनी कठोर तप केल्यामुळे त्यांना पंचतत्त्वांवर ताबा मिळवणारी राज्यसिद्धी शक्ती मिळाली. या शक्तीच्या आधारे वाईट शक्तींनी सुप्त झालेल्या किंवा नष्ट झालेल्या यंत्रांना पुन्हा जागृत केले.
२. या काळात वाईट शक्तींनी पर्यावरणाच्या आवरणाला ब्रह्मदेवाने कलीला दिलेल्या इच्छाशक्तीच्या आधारे १० टक्के क्षीण केले. त्यामुळे पूर्ण भूतलाच्या पंचतत्त्वांच्या पंचकरेषा दोलायमान झाल्या.
३. वाईट शक्तींनी काश्मीरमध्ये आक्रमणांची संख्या वाढवली. त्यामुळे चैतन्याच्या कारंज्याच्या रूपात येत असलेल्या शक्तीचे चैतन्याच्या प्रकाशझोताच्या स्वरूपात प्रक्षेपण होऊ लागले. उन्नत जीवच त्याचा लाभ घेऊ शकले.
* वर्ष १९८६ ते १९९०
१. या काळात पाकिस्तानकडून प्रहारमयी नादरूप आघातात्मक शक्तीचे प्रक्षेपण झाल्यामुळे भारतात आणि पूर्ण विश्वात भूमंडलाच्या गर्भरेषेत असलेले स्थिरांकुर बीज डळमळू लागले. त्यामुळे पृथ्वीवर प्रचंड प्रमाणात तमकण वाढले.
२. याच काळात ब्रह्मांडातून येत असलेली ईश्वराची तेजोमय कृपाशक्ती शक्ती कमी झाल्यामुळे सूर्याचे मारक तेज संपुष्टात येऊ लागले.
३. ब्रह्मांडकक्षेच्या बाह्य भागात यशोराज्ञी (टीप) शक्तीचे उच्च प्रदीर्घ घणात्मक सुप्त धर्धणात्मक (सूक्ष्म-नादाचा विस्फोट होतांना येणारा नाद) नादाचा वाईट शक्तींनी कल्कीकडून अग्रध (सरळऐवजी वक्र) प्रक्षेपण घेतल्यामुळे पृथ्वीरेषेवर असलेल्या सत्त्वकणांच्या कवचात कंपन होऊ लागले.
(टीप – ‘ब्रह्मांडात प्रवाहित होणारी ब्रह्मदेवाच्या स्वरूपात्मक संरचना करणार्या इच्छाशक्तीला ‘यशोराज्ञी शक्ती’ म्हटले जाते. शब्द कठीण वाटत असल्यास ‘ब्रह्मदेवाच्या सृष्टी निर्मितीसाठी ब्रह्मांडात कार्यरत असणारी इच्छाशक्ती’ असे लिहावे.’- एक ज्ञानी (७.१.२००७, संध्याकाळी ६.२७))
४. वरील क्रियेमुळे भूतलावर असलेल्या पंचकरेषेचे प्रमाण बिघडले.
* वर्ष १९९१ ते १९९५
१. या काळात वाईट शक्तींनी मायावी रूप घेऊन प्रत्येक कृती केली.
२. वाईट शक्तींद्वारे तमकणांच्या संगोपनासाठी भारताच्या मध्यक्षेत्रात स्थितीबिंदूवर त्रासदायक तंतूंचे प्रक्षेपण केल्यामुळे बिंदू आपल्या स्थानावर गतीमान झाला. त्यामुळे पृथ्वीच्या एकूण पंचरेषेचे प्रमाण डळमळू लागले.
३. विश्वात तमकणांचे पूर्ण प्रक्षेपण करून त्या भागातील पंचतत्त्वांत सत्त्वकण न उरल्यामुळे मोठे नैसर्गिक आघात होऊ लागले.
४. वाईट शक्तींनी ब्रह्मांडरेषेच्या उच्च भागी गणकयंत्राची स्थापना करून त्याच्या माध्यमातून सुप्त वर्षक (टीप) लहरींचे प्रक्षेपण केल्यामुळे पर्यावरणात दाबात्मक प्रमाण वाढू लागले.
(टीप – ‘वायूमंडलात असलेल्या आपतत्त्वात्मक लहरींचे ऊर्ध्वगामी दिशेतून अधोगामी दिशेत होत असलेल्या प्रक्षेपणाला ‘वर्षक’ असे म्हटले जाते. या लहरी पावसाप्रमाणे अनियंत्रित रूपाच्या असतात.’ – एक ज्ञानी (७.१.२००७, संध्याकाळी ६.३०))
* वर्ष १९९६ ते २०००
१. वाईट शक्तींनी दाबात्मक परिस्थितीचा लाभ घेऊन या माध्यमातून पूर्ण मानवजातीवर मोठे चक्राकार मायावी लहरींचे प्रक्षेपण आणि संगोपन केले. त्यामुळे सर्वसामान्य जिवांना पर्यावरणातून मिळत असलेले चैतन्य ३० टक्क्यांहून १० टक्क्यांवर आले.
२. विविध प्रकारच्या नैसर्गिक आपत्ती आणून वाईट शक्तींनी सहस्रो लोकांचा बळी घेतला.
३. वाईट शक्तींनी ब्रह्मांडाच्या वरच्या भागात स्थितीदर्शक लहरींचे प्रक्षेपण केले. त्यामुळे पंचकरेषेचे (पंचकमार्ग) प्रमाण अंतिम स्थितीच्या जवळ आले.
४. वाईट शक्तींनी पाताळातील कार्यरत वातावरण काही ठिकाणी सूक्ष्म-स्वरूपात कार्यरत केले.
* वर्ष २००१ ते २००५
१. वाईट शक्तींनी पंचकरेषेला विविध कालखंडात तडा दिला. परिणामी पूर्ण विश्वात पूर येणे, कडक ऊन पडणे असे प्रकार घडून अनेक लोक मेले.
२. वाईट शक्तींनी पूर्ण पंचकरेषेला नष्ट करण्यासाठी वेळोवेळी प्रयत्न केले.
३. पर्यावरणाला लवकरात लवकर कमी शक्तीत नष्ट करण्यासाठी वाईट शक्तींनी प.पू. डॉक्टरांच्या प्राणदेहावर आक्रमण केले.
४. वाईट शक्तींनी या कालखंडात उच्च त्रिर्यक रेषेला खालच्या स्तरावर आणले. त्यामुळे अकाली पाऊस पडणे, जमिनीतील पाणी सुकणे, या प्रकारचे आपतत्त्वाशी निगडित प्रकार घडले.
– धर्मतत्त्व (श्री. निषाद देशमुख यांच्या माध्यमातून, ८.५.२००६, सकाळी ९.१५)
वरील सर्व माहिती फक्त २-३ मिनिटांत मिळाली; परंतु टंकलेखन करतांना गोंधळल्यासारखे किंवा संभ्रमात पडल्यासारखे झाले नाही. तसेच कोणताही त्रास झाला नाही; मात्र ‘खूप मोठे लिखाण एका दिवसात पूर्ण करणे अशक्य असल्याने टंकलेखनाला प्रारंभ करू नये’, असा विचार येत होता. पूर्ण लिखाण टंकलिखित करायला दोन दिवस लागले.
– श्री. निषाद देशमुख, भोपाळ (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के)
लेख क्रमांक ८ वाचण्यासाठी भेट द्या. आध्यात्मिक पर्यावरणाची शुद्धी आणि त्याच्या रक्षणासाठी ऋषींनी केलेले प्रयत्न