Home > कार्य > धर्मजागृती > ‘हे विश्वचि माझे घर ।’ असे उदात्त चिंतन हिंदु धर्मानेच जगाला दिले आहे ! – सौ. लक्ष्मी पै, सनातन संस्था ‘हे विश्वचि माझे घर ।’ असे उदात्त चिंतन हिंदु धर्मानेच जगाला दिले आहे ! – सौ. लक्ष्मी पै, सनातन संस्था January 15, 2022January 14, 2022 Share this on : मंगळुरू (कर्नाटक) येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘One Humanity Many Paths’ या विशेष कार्यक्रमात सनातन संस्थेचा सहभाग प्रवचन घेतांना सनातन संस्थेच्या सौ. लक्ष्मी पै, मागे बसलेले अन्य धर्मीय मान्यवर मंगळुरू (कर्नाटक) – येथील बोंदेल येथे असलेल्या ‘महात्मा गांधी सेंटिनरी पी.यू. कॉलेज’मध्ये ‘One Humanity Many Paths’ (एक मानवता अनेक मार्ग) असा विशेष कार्यक्रम १२ जानेवारी या दिवशी आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात हिंदु धर्माच्या प्रतिनिधी म्हणून सनातन संस्थेच्या सौ. लक्ष्मी पै यांना आमंत्रित करण्यात आले होते. बोंदेल चर्चचे फादर गोन्सालविस हे ख्रिस्ती धर्माचे, तर शमशाद हे इस्लामचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते.सौ. लक्ष्मी पै उपस्थितांना संबोधित करतांना म्हणाल्या, ‘‘सनातन हिंदु धर्म हा अनादि अनंत आहे. ‘हे विश्वचि माझे घर ।’, असा उदात्त विचार हिंदु धर्मानेच विश्वाला दिला आहे. ‘सर्वेऽत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः । सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चिद् दुःखमाप्नुयात् ॥’ (अर्थ : हे भगवंता, सर्व प्राणीमात्र सुखी होवोत. सर्वांना चांगले आरोग्य लाभो. सर्वजण एकमेकांचे कल्याण पाहोत. कुणाच्याही वाट्याला कधीही दुःख न येवो.), अशी प्राचीन भारतीय ऋषि-मुनींची प्रार्थना आहे. पुण्यभूमी भारत सर्व धर्मांना आश्रय देणारे स्थान राहिले आहे. प्रत्येकाने धर्माचरण करून सात्त्विक समाज घडविणे, ही काळाची आवश्यकता आहे.’’ ख्रिस्ती आणि इस्लाम या धर्मांच्या प्रतिनिधींनीही या वेळी आपले विचार मांडले. अनुमाने ४०० विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाचा लाभ घेतला. Share this on : संबंधित लेख इंदूर (मध्यप्रदेश) येथील ‘जैविक महोत्सवा’मध्ये सनातन संस्थेचा सहभागहिंदूंनो, धर्मशिक्षण घेऊन धर्मशिक्षित व्हा ! – सद्गुरु स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्थासनातन संस्थेच्या ग्रंथ प्रदर्शनाला प्रसिद्ध आचारी विष्णु मनोहर यांची सदिच्छा भेट !सनातन संस्थेचे साधक यांनी घेतल्या ‘संत समावेश’ कार्यक्रमात विविध मान्यवरांच्या भेटी !हिंदु धर्मावर होणारे विविध आघात रोखण्यासाठी जनजागृती महत्त्वाची ! – सदगुरु स्वाती खाडये, सनातन संस्थापुणे, मिरज येथे गुढीपाडव्यानिमित्त काढलेल्या शोभायात्रेत सनातन संस्था सहभागी !