मकरसंक्रांतीच्या निमित्ताने धर्मप्रसाराचे कार्य अव्याहतपणे करणार्‍या सनातनच्या आश्रमांना धर्मदान करून आध्यात्मिक लाभ मिळवा !

सर्वत्रच्या अर्पणदात्यांना सुवर्णसंधी !

मकरसंक्रांतीचे महत्व

मकरसंक्रांत (१४ जानेवारी २०२२) ते रथसप्तमी (७ फेब्रुवारी २०२२) पर्यंतचा काळ हा पर्वकाळ आहे. धर्मशास्त्रानुसार या पर्वकाळात केलेले दान, जप, तसेच धार्मिक अनुष्ठान यांचे अत्यंत महत्त्व सांगितले आहे. या पर्वकाळी केलेले दान आणि पुण्यकर्मे विशेष फलद्रूप होतात. या काळात केलेले दान पुनर्जन्म झाल्यानंतर (पुढील जन्म झाल्यास) शंभरपटीने प्राप्त होते. या काळात दिलेल्या दानामुळे देवतेची कृपा होऊन जिवाला इच्छित फलप्राप्ती होते. दान हे पापनाशक असून ते पुण्यबळाची प्राप्ती करून देते.

 

१. अन्नदानाचे अनन्यसाधारण महत्त्व !

‘अन्नदान करणे’, हे श्रेष्ठ कर्म मानले जाते. हिंदु धर्मशास्त्रानुसार जो गृहस्थ अर्थार्जन करतो आणि ज्याच्या घरी प्रतिदिन अन्न शिजते, त्याने अन्नदान करणे, हे त्याचे कर्तव्यच आहे. ‘सद्भावनेने ‘सत्पात्रे अन्नदान’ केल्यास अन्नदात्याला त्याचे उचित फळ मिळते, तसेच सर्व पातकांतून त्याचा उद्धार होऊन तो ईश्वराच्या जवळ जातो’, असे धर्मशास्त्र सांगते. अन्नदान केल्यास अन्नदात्याला आध्यात्मिक स्तरावरही लाभ होतो.

 

२. धर्मप्रसाराचे कार्य अव्याहतपणे करणारा रामनाथी, गोवा येथील सनातनचा आश्रम !

सध्या धर्मग्लानीचा काळ असल्याने ‘धर्मप्रसार करणे’, हे काळानुसार आवश्यक कार्य आहे. धर्मप्रसाराचे कार्य करणारे संत, संस्था वा संघटना यांना अन्नदान करणे, हे सर्वश्रेष्ठ दान आहे. सनातन संस्था राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांसाठी कटीबद्ध आहे. भारतात विविध ठिकाणी साधक धर्मप्रसाराचे कार्य करत आहेत. सध्याच्या काळात राष्ट्र आणि धर्म यांची सेवा करण्याचे महत्त्व लक्षात घेऊन शेकडो साधक रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात आणि देशभरात विविध ठिकाणी राहून पूर्णकालीन सेवा करत आहेत.

 

३. धर्मकार्य करणार्‍या सनातन आश्रमाला दान द्या !

धर्मजागृतीचे कार्य अव्याहतपणे करणार्‍या सनातनच्या साधकांना, तसेच आश्रम आणि सेवाकेंद्रातील साधकांना अन्नदानासाठी धनरूपात साहाय्य करणे, तसेच आश्रमात वापरण्यायोग्य वस्तू , वैद्यकीय आणि विविध उपकरणे अर्पण करण्याची संधी अर्पणदात्यांना आहे.

जे अर्पणदाते मकरसंक्रांतीच्या निमित्ताने साधकांसाठी अन्नदान्य किंवा वस्तूंकरता धनरूपात साहाय्य करून धर्मकार्यात सहभागी होऊ इच्छितात, त्यांनी खालील क्रमांकावर संपर्क साधावा.

नाव आणि संपर्क क्रमांक : सौ. भाग्यश्री सावंत – ७०५८८८५६१०
संगणकीय पत्ता : [email protected]
टपालाचा पत्ता : सौ. भाग्यश्री सावंत, द्वारा ‘सनातन आश्रम’, २४/बी, रामनाथी, बांदिवडे, फोंडा, गोवा. पिन – ४०३४०१

अन्नदानासाठी संस्थेला धनादेश द्यावयाचा असल्यास तो ‘सनातन संस्था’ या नावाने द्यावा.

https://www.sanatan.org/en/donate येथेही दान (अर्पण) करण्याची सुविधा उपलब्ध आहे.’

– श्री. वीरेंद्र मराठे, व्यवस्थापकीय विश्वस्त, सनातन संस्था.

Leave a Comment