Home > कार्य > समाजसाहाय्य > सनातन संस्थेच्या वतीने गरीब मुलांना सनातनच्या ‘संस्कार वह्या’ आणि ग्रंथ यांचे विनामूल्य वितरण सनातन संस्थेच्या वतीने गरीब मुलांना सनातनच्या ‘संस्कार वह्या’ आणि ग्रंथ यांचे विनामूल्य वितरण January 10, 2022 Share this on : मुलांना ग्रंथ वितरण करतांना डावीकडून अधिवक्त्या अमिता सचदेवा आणि अधिवक्त्या कु. कृतिका खत्री देहली – सनातन संस्थेच्या वतीने वेळोवेळी विविध समाजोपयोगी उपक्रम राबवले जातात. या अंतर्गत संस्थेच्या वतीने स्थानिक गीता कॉलनी येथील स्वयंसेवी संस्था ‘गॉड गिव्स एव्हरिथिंग’च्या ५० हून अधिक गरीब मुलांना २ जानेवारी २०२२ या दिवशी सनातननिर्मित ‘संस्कार वही’ आणि व्यक्तिमत्त्व विकासविषयक ग्रंथ यांचे विनामूल्य वितरण करण्यात आले. मुलांमध्ये व्यक्तिमत्त्व विकास व्हावा आणि अभ्यास करतांना त्यांना साहाय्य व्हावे, यादृष्टीने ग्रंथांचे वितरण करण्यात आले. सनातन संस्थेच्या अधिवक्त्या कु. कृतिका खत्री, हिंदु विधीज्ञ परिषदेच्या अधिवक्त्या अमिता सचदेवा आणि श्री. प्रतीक यादव यांच्या हस्ते हे वितरण करण्यात आले. या वेळी ‘गॉड गिव्स एव्हरिथिंग’चे व्यवस्थापक श्री. आशिष गुप्ता उपस्थित होते. संदर्भ : दैनिक सनातन प्रभात Share this on : संबंधित लेख सनातन संस्थेच्या वतीने ‘बिंदूदाबन उपचार’ शिबिराचे छत्रपती संभाजीनगर येथे आयोजन !अहिल्यानगर येथे सनातन संस्थेच्या वतीने बिंदूदाबन उपचार शिबिर पार पडले !सनातन संस्था आयोजित बिंदूदाबन शिबिराचा नाशिक जिल्ह्यातील शिबिरार्थींनी घेतला लाभ !पुणे येथील विश्वशांतीनिकेतन विद्यालयाच्या कुरुळी शाखेमध्ये पालकांसाठी व्याख्यानाचे आयोजन !धरुहेडा (हरियाणा) येथे सनातन संस्थेच्या वतीने ‘नैतिक मूल्यांचे संवर्धन’ या विषयावर मार्गदर्शनसनातन संस्थेच्या वतीने मथुरा (उत्तरप्रदेश) येथील ‘राधा माधव इंटर कॉलेज’मध्ये ‘तणाव निर्मूलन’ विषयावर व्याख्यान पार...