हिंदु धर्माचे धर्मचिन्ह ‘ॐ’ची उत्पत्ती आणि त्याचे परिणाम

लेख क्रमांक :

मागील लेख क्रमांक २ वाचण्यासाठी भेट द्या. चित्तशुद्धी

ज्ञानप्राप्तकर्ता साधक : श्री. निषाद देशमुख (आताची आध्यात्मिक पातळी ६२ टक्के)

संकलक : परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले

 

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले
ज्ञानाची कठीण भाषा आणि त्यातील काळी शक्ती यांमुळे परात्पर गुरु डॉ. आठवले यांना १४ वर्षे वाचता न आलेले ज्ञान : ‘हिंदु धर्माचे धर्मचिन्ह ‘ॐ’ची उत्पत्ती आणि त्याचे परिणाम’ या ज्ञानातील कठीण भाषा आणि काळी शक्ती यांमुळे मजकूर बघून आणि वाचतांना खूप त्रास होत होता; म्हणून ६.१०.२००७, २०.१२.२००९, २८.१२.२०११, ९.६.२०१५, २३.११.२०२० या दिवशी मजकूर पुन्हा पाहिला. पाहिल्यावरच तीव्र त्रास जाणवला; म्हणून मजकूर पडताळला नाही. १९.१२.२०२० या दिवशी पडताळला. त्यानंतर परत २१.८.२०२१ या दिवशीही पडताळता आला नाही. ६.१२.२०२१ या दिवशी सोप्या भाषेत दिलेले ज्ञान पडताळू शकलो. – परात्पर गुरु डॉ. आठवले

१. कठीण भाषेतील मूळ ज्ञान

१ अ. उत्पत्ती

‘ॐ’ म्हणजे ब्रह्मांडाच्या उत्पत्तीच्या बिजाचे स्थूल दृश्य स्वरूप असणे – ‘ॐ’ हे मूळ ब्रह्मांडाच्या उत्पत्तीचे बीज आहे. ‘ॐ’ चे दृश्य स्वरूप हे ब्रह्मांडाच्या उत्पत्ती काळात बीजस्वरूपात निर्माण झालेल्या ‘ॐ’ च्या बिंदू-आकार-स्वरूपाचा नाद स्वरूपात प्रक्षेपित झाल्यानंतर तेजाच्या प्रक्षेपणाने उत्पन्न झालेल्या दृश्याचे स्थूल दृश्य स्वरूपात झालेले प्रकटीकरण आहे.

१ आ. होणारे परिणाम

ब्रह्मांडाच्या बीजाक्षराला धर्मचिन्ह केल्यामुळे हिंदु धर्माच्या प्रत्येक घटकात निर्गुण ब्रह्माची तेजस्वरूपी शक्ती येणे – मूळ ब्रह्मांडाच्या बीजाक्षराला निर्गुण स्थानरूपी आधार मिळाल्याने, तसेच तेजतत्त्वाचे दृश्य स्वरूपात प्रकटीकरणस्वरूपी रूप धर्मतेजाचे पायरीरूप आधार असल्याने तेजतत्त्वरूपी आधारभूत आधाराने हिंदु धर्मात उत्पत्तीत येते. प्रत्येक घटकात निर्गुण ब्रह्माची तेजस्वरूपी शक्ती उत्पत्तीत आलेली आहे.

– धर्मतत्त्व (श्री. निषाद देशमुख यांच्या माध्यमातून, ७.३.२००६, दुपारी ३.४५)

श्री. निषाद देशमुख

२. थोडे सोप्या भाषेतील ज्ञान

२ अ. उत्पत्ती

ब्रह्मांडाचे उत्पत्तीबीज ‘ॐ’ हे ब्रह्मांड उत्पत्तीच्या ऊर्जेचे सगुण दृश्यस्वरूप असणे – ‘ॐ’ हे मूळ ब्रह्मांडाचे उत्पत्तीबीज आहे. ब्रह्मांडनिर्मितीच्या काळात उत्पत्तीस्वरूप कार्य करण्यासाठी उत्पत्तीबीज हे निर्गुणातून सगुणाच्या (पंचतत्त्वांच्या) प्रत्येक टप्प्यावर त्या-त्या सगुणत्वाशी निगडित स्तरावर कार्यरत झाले. नादातून तेजतत्त्वाच्या स्तरावर कार्यरत झालेले मूळ ब्रह्मांडाचे उत्पत्तीबीज ॐकार नादस्वरूपात हिंदु धर्मात घेण्यात आले. तेजतत्त्वाच्या स्तरावर कार्यरत झालेली ब्रह्मांडउत्पत्तीची ऊर्जा सगुण दृश्य स्वरूपात ‘ॐ’ या अक्षराच्या स्वरूपात प्रकट झाली.

२ आ. परिणाम

ब्रह्मांडाचे बीजाक्षर ‘ॐ’हे धर्मचिन्ह म्हणून घेतल्याने सृष्टीची संरचना, जिवाचे सगुणातून निर्गुणात जाणे, ईश्वरी ऊर्जा अनुभवणे, अशा विविध टप्प्यांवर लाभ होणे – ‘ॐ’ मूळ ब्रह्मांडाचे बीजाक्षर हे धर्मचिन्ह म्हणून घेण्यात आल्याने आणि निर्गुण स्तरावरील ऊर्जा हीच धर्माचा आधार असल्याने निर्गुण स्तरावरील ऊर्जेच्या माध्यमातून सगुण सृष्टीची संरचना करणे शक्य असते, तसेच निर्गुणाला उत्पत्ती, स्थिती आणि लय यांचे बंधन नसल्याने धर्म अनंत काळापर्यंत टिकून रहातो. धर्मचिन्ह हे तेजतत्त्वातून आकाशतत्त्वापर्यंत (नादापर्यंत) धर्मस्वरूपात ग्रहण केल्याने जिवाला सगुणातून निर्गुणात जाणे सहज शक्य होते. यासोबत सृष्टीची कार्यरतता दृश्य स्वरूपात असल्याने हिंदु धर्माप्रमाणे आचरण केल्याने निर्गुण स्तरावरील ऊर्जा सृष्टी कार्यरततेतून गतीमान होत असल्याने सृष्टी कार्यरतेत ईश्वरी ऊर्जा अनुभवता येते.

– एक ज्ञानी (श्री. निषाद देशमुख यांच्या माध्यमातून, १३.१०.२००७, रात्री ८.२३)

लेख क्रमांक ४ वाचण्यासाठी भेट द्या. ‘प.पू. डॉ. आठवले यांचे कार्य आणि त्यांची वैशिष्ट्ये’ या सदराचा लाभ घेण्याबाबत साधकांची विदारक स्थिती

1 thought on “हिंदु धर्माचे धर्मचिन्ह ‘ॐ’ची उत्पत्ती आणि त्याचे परिणाम”

Leave a Comment