परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणांच्या आणि हातांच्या बोटांच्या नखांवर उभ्या रेषा अन् नखाच्या मुळापासून वर जाणारी गुलाबी रंगाची अर्धवर्तुळाकार २ – ३ वलये यांचा स्पर्श खडबडीत लागणे आणि या रेषांचा उठावदारपणा वाढणे यांमागील अध्यात्मशास्त्र !
संतांच्या केवळ अस्तित्वानेही वातावरणाची शुद्धी होते. संतांच्या सहवासातील वस्तूंवरही त्यांच्या चैतन्याचा सकारात्मक परिणाम दिसून येतो. परात्पर गुरु डॉ. आठवले हे समष्टी गुरु आणि जगद्गुरु असल्यामुळे त्यांचे अवतारी कार्य संपूर्ण ब्रह्मांडात चालू असते. हे कार्य पूर्णत्वास नेण्यासाठी त्यांच्या देहातही पंचतत्त्वे कार्यरत असतात. त्यामुळे अवतारी कार्य चालू असतांना त्यांच्या सूक्ष्म देहातून प्रक्षेपित होणार्या लहरींचा परिणाम त्यांच्या देहावरही दिसून येतो. हा कोणता चमत्कार नसून साधनेमुळे झालेला परिणाम आहे. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यातील चैतन्याचा त्यांचे हात आणि चरण यांच्या बोटांच्या नखांवर दिसून आलेला दृश्य परिणाम आणि त्याची कारणमीमांसा या लेखाद्वारेे अभ्यासूया.
‘जून २०२१ पासून परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या हातांच्या आणि चरणांच्या बोटांच्या नखांवर उभ्या रेषा (छायाचित्र क्र. १ पहावे) आणि नखाच्या मुळापासून वर जाणारी गुलाबी रंगाची अर्धवर्तुळाकार २ – ३ वलये दिसत होती. ऑगस्ट २०२१ पासून या रेषांचा स्पर्श खडबडीत लागू लागला. ६.१०.२०२१ या दिवशी या रेषांचा उठावदारपणा वाढल्याचे लक्षात आले. (छायाचित्र क्र. २ पहावे) यामागील अध्यात्मशास्त्र पुढीलप्रमाणे आहे.
नखांवरील उभ्या रेषांमधून संपूर्ण वातावरणात पुष्कळ प्रमाणात मारक शक्ती आणि चैतन्य यांच्या लहरींचे प्रक्षेपण होते. नखांवरील अर्धवर्तुळाकार वलयांमध्ये तारक शक्ती आणि चैतन्य कार्यरत असते. त्यामुळे परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर पाताळातील मोठ्या वाईट शक्ती प्रक्षेपित करत असलेल्या त्रासदायक काळ्या शक्तीच्या लहरी देहात प्रविष्ट होण्यापासून रोखल्या जातात. नखांवरील उभ्या रेषा काळ्या शक्तींचे विघटन करण्याचे आणि अर्धवर्तुळाकार रेषा त्रासदायक लहरींपासून रक्षण करण्याचे कार्य करतात.
१. नखांवरील रेषांमध्ये पंचतत्त्वांच्या स्तरावरील चैतन्य कार्यरत झाल्यावर रेषांमध्ये होणारे पालट
१.अ. पंचतत्त्व नखांवरील रेषांवर होणारा परिणाम
१.अ.१. पृथ्वी – सुगंध जाणवणे
१.अ.२. आप – रेषांतून शक्ती आणि चैतन्य सहजरित्या प्रवाहित होणे
१.अ.३. तेज – चमक वाढणे
१.अ.४. वायु – स्पर्श मऊ जाणवणे
१.अ.५. आकाश – निर्गुण स्तरावरील चैतन्य प्रक्षेपित होणे
सर्वसामान्य व्यक्ती आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या नखांमध्ये कार्यरत असणार्या शक्तीनुसार त्यांच्या नखांवरील रेषांचा स्पर्श खडबडीत जाणवणे आणि रेषा उठावदार दिसू लागणे.
सर्वसामान्य व्यक्तीच्या नखांमध्ये जेव्हा रज-तम प्रधान शक्तीच्या लहरी कार्यरत होतात, तेव्हा नखांचा स्पर्श खडबडीत जाणवतो. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या नखांमध्ये कार्यरत असणार्या निर्गुण-सगुण स्तरावरील शक्तीच्या लहरी जेव्हा सगुण-निर्गुण स्तरावर प्रक्षेपित होऊ लागतात, तेव्हा त्यांचे घनीकरण होऊ लागते. त्यामुळे नखांवरील रेषांचा स्पर्श खडबडीत जाणवतो आणि रेषा उठावदार दिसू लागतात.
– कु. मधुरा भोसले (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के) (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२०.११.२०२१)
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत. |