सणांच्या निमित्ताने करावयाची सिद्धता

सण साजरे करतांना ते शास्त्र जाणून घेऊन साजरे केल्यास मिळणारा लाभ अधिक असतो. सण साजरा करतांना करायची पूर्वसिद्धता आणि घ्यावयाची काळजी याविषयीचे विवेचन या लेखात केले आहे.

 

१. सण साजरे का करावेत ?

‘सण साजरे केल्यामुळे आपल्याला प्रसन्नता जाणवून आनंद मिळतो. देवतांचे सण साजरे केल्यामुळे त्यांची आपल्यावर कृपा होते. त्यामुळे आपले आरोग्य, व्यवसाय आणि इतर इच्छित गोष्टी चांगल्या होतात.’

– ईश्वर (कु. मधुरा भोसले यांच्या माध्यमातून, ६.११.२००७, दुपारी २.३०)

 

२. उद्देश

‘नक्षत्र चरणांतून निघणार्‍या यम, सूर्य, प्रजापती आणि संयुक्त या तेज लहरींचा ३६० गणांशी, म्हणजे तेजलहरींशी संबंध असतो. या तेजप्रवाह समुदायांचा आपल्या शरिरावर अनुकूल परिणाम होऊन जीवात्म्याने सूक्ष्मात्मा, दिव्यात्मा, विशुद्धात्मा आणि मुक्तात्मा या पद्धतीने प्रगती करून जन्म-मरणाच्या फेर्‍यांतून नेहमीसाठी मुक्त व्हावे, या सद्हेतूने या वेदभूमीतील प्राचीन ऋषीमुनींनी आपल्याला यज्ञ, पूजन, व्रतवैकल्ये, श्रृति-स्मृती, पुराण यांद्वारे अनेक विधी करण्यास सांगितले आहेत.’ – स्वामी विद्यानंद, मुंबई (ख्रिस्ताब्द १९८७)

 

३. सण साजरा करण्यापूर्वी करावयाची सिद्धता

सणाच्या एक-दोन दिवस आधी घराची स्वच्छता, रंगरंगोटी इत्यादी करावी. घराच्या प्रवेशद्वारावर श्री गणपतीच्या चित्राची स्थापना करावी. घरापुढे मोकळी जागा, अंगण असल्यास तेथे मांडव घालावा़. भूमी सारवून स्वस्तिक, कमळ इत्यादी शुभचिन्हांनी युक्त अशी रांगोळी काढावी. सणाच्या दिवशी नवीन कपडे आणि आभूषणे परिधान करावीत.

 

४. सण आणि धार्मिक विधी यांवेळी दाराजवळ करायची सजावट

अ. घराचे प्रवेशद्वार

द्वाराच्या चौकटीला तोरण बांधणे
द्वाराच्या चौकटीला तोरण बांधणे

 

‘वास्तूशांती, तसेच इतर सणासमारंभी घराच्या प्रवेशद्वाराला विशेष महत्त्व असते. समोरील द्वाराच्या चौकटीला तोरण बांधणे, द्वारावर स्वस्तिकादी शुभचिन्ह काढणे, द्वारापुढे रांगोळी काढणे, दिवाळीत पणत्या लावणे आणि गुढीपाडव्याला द्वाराजवळ गुढी उभी केली जाते.

 

तोरण विषयक चलच्चित्रपट (Videos : ५)

आ. घराचे मागील द्वार

घराच्या मागील द्वाराजवळ वरीलपैकी कोणतेही शुभकृत्य करणे वर्ज्य मानले जाते. या द्वाराजवळ केवळ दिवाळीला किंवा एरवी दोन पणत्या लावल्या जातात.’ – कु. मधुरा भोसले यांच्या माध्यमातून (१०.११.२००७)

 

५. सण, व्रते आणि उत्सवांमागील शास्त्र समजून ते करावेत

सण, व्रते आणि उत्सव केवळ रूढी म्हणून साजरे न करता त्यांमागील शास्त्र समजून साजरे केले, तर त्यातून आपल्याला चैतन्य मिळते. धर्मशास्त्र सांगण्यासह ‘सध्या उत्सवातील अपप्रकार टाळणे, हेही धर्मपालनच आहे.’

 

६. विद्युत रोषणाई नको, तर तेला-तुपाचे दिवे लावा !

 

आजकाल सणासमारंभाच्या दिवशी मांगलिकाचे प्रतीक म्हणून विद्युत रोषणाई केली जाते. पूर्वीच्या काळी तेला-तुपाच्या दिव्यांनी रोषणाई केली जात असे. विद्युत रोषणाई आकर्षक असली, तरी सात्त्विकतेच्या दृष्टीकोनातून पाहिले, तर तेला-तुपाच्या दिव्यांनी केलेली रोषणाईच जास्त लाभदायक आणि डोळ्यांना आनंददायी असते; कारण विद्युत् दिव्यामध्ये तेला-तुपाच्या दिव्यांपेक्षा रज-तम जास्त असते अन् ते वातावरणात पसरते. त्यामुळे धार्मिक विधींच्या ठिकाणी वातावरणात सात्त्विकता टिकून रहावी, यासाठी तेला-तुपाचे दिवेच लावावे.

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘सण, धार्मिक उत्सव आणि व्रते’

Leave a Comment