धर्मशिक्षण आणि हिंदूसंघटन यांमुळे हिंदुहित शक्य ! – सद्गुरु (कु.) स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था

राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी यांच्यासाठी आयोजित ‘ऑनलाईन’ व्याख्यानासाठी १ सहस्र ४४५ जणांची उपस्थिती

सद्गुरु (कु.) स्वाती खाडये

कोल्हापूर – देशात बहुसंख्य असलेल्या हिंदूंवर केवळ २० टक्के असलेल्या मुसलमानांची ‘हलाल’ची उत्पादने लादली जात आहेत. ‘हलाल’च्या माध्यमातून मिळणार्‍या आर्थिक स्रोतांद्वारे केवळ आतंकवाद्यांनाच साहाय्य केले जाते. त्यामुळे हलाल पद्धतीला हिंदूंनी संघटितपणे विरोध करणे आवश्यक आहे. त्यासाठी हिंदूंना धर्मशिक्षण देऊन त्यांना हिंदु धर्माचे महत्त्व पटवून द्यावे लागेल. तसेच धर्मशिक्षण आणि हिंदूसंघटन यांमुळे हिंदुहित शक्य आहे, असे प्रतिपादन सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी केले. कोल्हापूर जिल्ह्यातील राष्ट्र आणि धर्म प्रेमी यांच्यासाठी २३ डिसेंबर २०२१ या दिवशी एका ‘ऑनलाईन’ व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी त्या मार्गदर्शन करत होत्या.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सनातन संस्थेच्या सौ. मेघमाला जोशी यांनी केले. हिंदु जनजागृती समितीच्या सौ. राजश्री तिवारी यांनी कार्याची माहिती देण्यासह ‘जिहादच्या माध्यमातून संपूर्ण जगावर इस्लामिक राज्य आणण्याचे कसे प्रयत्न चालू आहेत ?’, याविषयीची सविस्तर माहिती सांगितली. या व्याख्यानामध्ये १ सहस्र ४४५ जिज्ञासू ‘ऑनलाईन’च्या माध्यमातून सहभागी झाले होते.

वैशिष्ट्यपूर्ण

१. काही ठिकाणी धर्मप्रेमींनी गट करून व्याख्यान ऐकले.

२. मार्गदर्शनानंतर पट्टनकुडी येथील प्राध्यापक श्री. पुंडलिक सुतार यांनी दूरभाष करून अधिक सूत्रे जाणून घेतली.

३. या व्याख्यानासाठी कर्नाटक राज्यातील निपाणी आणि संकेश्वर येथील, तर कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोली, हुपरी, मत्तीवडे, केर्ली, मलकापूर, गिरगाव, उंचगाव, कसबा बावडा, वाठार, पडवळवाडी, राधानगरी यांसह अन्य गावांमधील धर्मप्रेमी ‘ऑनलाईन’ उपस्थित होते. गावांमधील धर्मप्रेमींचा हा सहभाग लक्षणीय होता.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment