जालना – महाराष्ट्र ही संत आणि शूर यांची भूमी असूनही येथे प्रतिदिन हिंदुविरोधी भूमिका घेतली जाते. हे योग्य नसून हिंदु धर्माची पताका सर्वत्र फडकवणार्या सनातन संस्थेवर बंदीची मागणी करणार्या मंत्र्यांना आवर घालणे आवश्यक आहे. हिंदुत्वाचा अवमान म्हणजे स्वर्गीय बाळासाहेब यांचाच अवमान आहे. त्यामुळे सनातन संस्थेवर नव्हे, तर हिंदुद्रोही मंत्र्यांवरच बंदी घालावी, अशी मागणी राष्ट्रीय वारकरी परिषदेचे उपाध्यक्ष ह.भ.प. कारभारी साहेबराव अंभोरे महाराज यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.
पत्रकात त्यांनी पुढे म्हटले आहे की, हिंदुविरोधी कारवाई करण्यात धन्यता मानणार्या मंत्र्यांनी हेसुद्धा लक्षात ठेवावे की, नाशिक कुंभमेळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीत घायाळ झालेले भाविक आणि साधू-संत यांची सनातन संस्थेने मनोभावे सेवा केलेली आहे. नवाब मलिक यांचा हिंदुद्वेष समजू शकतो; परंतु छगन भुजबळ यांच्याकडून बंदीची मागणी होणे आणि त्यांचे वक्तव्य पडताळल्यास त्यांच्यात पराकोटीचा हिंदुद्वेष निर्माण झाल्याचे लक्षात येते.
स्वर्गीय बाळासाहेब यांना अपेक्षित असा मंत्रीमंडळाचा कारभार होत नसून महाराष्ट्रात झालेल्या दंगली, धर्मांतर, साधू-संत यांच्या हत्या, गोधन तस्करी-चोरी, गोहत्या, गोरान भूमीवरील अतिक्रमणे, देवतांचे विडंबन, भ्रष्टाचार, मद्यसंस्कृतीला सहकार्य, परधर्मियांचे लांगूलचालन, मराठी भाषेपेक्षा उर्दू भाषेला मिळालेला राजाश्रय अशा असंख्य गोष्टी संतभूमी आणि स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या महाराष्ट्रात घडत आहेत. या सर्वांतच सनातन संस्थेसारख्या संस्थेवर बंदीची मागणी झाल्यास आम्ही त्याच्या विरोधात वैध मार्गाने अवश्य संघर्ष करू !