सनातनने मठ-मंदिरे यांच्या सुव्यवस्थापनाचे शिक्षण द्यावे ! – श्री. संजय शर्मा

‘एटर्नल हिंदु फाऊंडेशन’चे राष्ट्रीय समन्वयक श्री. संजय शर्मा
यांची रामनाथी (गोवा) येथील सनातन आश्रमाला सदिच्छा भेट !

श्री. विक्रम डोंगरे (सर्वांत उजवीकडे) यांच्याकडून आश्रमातील ध्यानमंदिराची माहिती जाणून घेतांना श्री. संजय शर्मा आणि त्यांचे कुटुंबीय

रामनाथी (गोवा) – आश्रमातील स्वच्छता, पावित्र्य आणि आध्यात्मिक सौंदर्य अप्रतिम आहे. आश्रमात घडलेले साधक मंदिरांचे व्यवस्थापन उत्तम प्रकारे सांभाळू शकतात. त्यामुळे सनातनने ‘मठ-मंदिर यांचे सुव्यवस्थापन कसे करावे’, याचे शिक्षण समाजाला द्यावे, असे मत ‘एटर्नल हिंदु फाऊंडेशन’चे राष्ट्रीय समन्वयक श्री. संजय शर्मा यांनी व्यक्त केले. २१ डिसेंबर २०२१ या दिवशी श्री. शर्मा यांनी सनातनच्या रामनाथी (गोवा) येथील आश्रमाला सदिच्छा भेट दिली. या वेळी सनातनचे साधक श्री. विक्रम डोंगरे यांनी श्री. शर्मा यांना आश्रमात चालणारे राष्ट्र अन् धर्म प्रसाराचे कार्य, तसेच आध्यात्मिक संशोधनाविषयीचे कार्य यांविषयी माहिती दिली.

श्री. शर्मा यांनी सर्व माहिती आस्थेने जाणून घेतली. या वेळी त्यांच्यासमवेत त्यांची आई श्रीमती बिनादेवी, पत्नी अन् ज्योतिषशास्त्राच्या अभ्यासक सौ. नीतू शर्मा, मुलगी कु. देवांशी आणि मुलगा कु. देवांश उपस्थित होते. सनातन संस्थेचे ६६ टक्के आध्यात्मिक पातळीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांचीही त्यांनी भेट घेतली. या वेळी श्री. शर्मा यांना वर्ष २०२२ चे सनातन पंचांग आणि ‘हिन्दू राष्ट्र : आक्षेप एवं खण्डन’ हा हिंदी भाषेतील सनातनचा ग्रंथ भेट देण्यात आला.

सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस (डावीकडे) श्री. शर्मा यांना वर्ष २०२२ चे सनातन पंचांग आणि ‘हिन्दू राष्ट्र : आक्षेप एवं खण्डन’ हा हिंदी भाषेतील सनातनचा ग्रंथ भेट देतांना

 

श्री. संजय शर्मा यांचा परिचय

श्री. संजय शर्मा ‘एटर्नल हिंदु फाऊंडेशन’च्या माध्यमातून हिंदु धर्मजागृतीचे कार्य करतात. श्री. शर्मा हे नवी मुंबईतील त्यांच्या घरी मासातील ५-६ दिवसच असतात. अन्य सर्व दिवस ते हिंदुत्वाच्या प्रसाराच्या कार्यासाठी भारतभर भ्रमण करतात. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने घेण्यात येणार्‍या ऑनलाईन कार्यक्रमांनाही ते वक्ता म्हणून उपस्थित असतात.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment