दत्तजयंतीनिमित्त शिवगिरी संप्रदायाच्या दत्त पालखीचे सनातनच्या देवद (पनवेल) येथील आश्रमात आगमन !

दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा !

दत्तगुरूंच्या प्रतिमेला ओवाळतांना श्री. अविनाश गिरकर

पनवेल – प्रतिवर्षीप्रमाणे श्री शिवगिरी संप्रदायाच्या दत्तजयंतीच्या निमित्ताने निघणार्‍या दत्तपालखीचे सनातनच्या देवद (पनवेल) येथील आश्रमात सायंकाळी ७ वाजता  शंखध्वनी आणि ‘दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा’ या नामघोषाच्या गजरात  आगमन झाले. फुलांच्या माळांनी सजवलेल्या पालखीत श्री दत्तात्रेयांची प्रतिमा, त्यांची मूर्ती आणि प.पू. शिवगिरी महाराजांच्या पादुका आसनस्थ होत्या !

पालखीच्या अग्रस्थानी धर्मदंड हातात घेतलेले भक्त होते. आश्रमात पालखीचे आगमन झाल्यावर धर्मदंड घेतलेल्या भक्तांच्या पायावर जल अर्पण करण्यात आले आणि धर्मदंडाला कुंकू लावून त्याचे पूजन करण्यात आले. पालखीतील श्री दत्तात्रेयांच्या प्रतिमेला सनातनचे ६४ टक्के आध्यात्मिक पातळीचे साधक श्री. अविनाश गिरकर यांनी ओवाळले आणि पुष्पहार अर्पण केला. मुंबई आणि रायगड जिल्ह्यातून शिवगिरी संप्रदायाचे भक्त या पालखीत सहभागी होण्यासाठी आले होते.

क्षणचित्रे

१. अब्दागिर आणि भगवा ध्वज यांमुळे पालखीत वेगळाच डौल निर्माण झाला होता !

२. ढोलकी, झांज या वाद्यांच्या साथीने आणि टाळ्यांच्या ठेक्यात चालू असलेला दत्तगुरूंच्या नामजपाचा जयघोष यांमुळे पालखी आश्रमात आल्यावर क्षणार्धात वातावरणात पालट होऊन उत्साह आणि चैतन्य निर्माण झाले !

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment