Home > कार्य > राष्ट्ररक्षण > सत्सेवेच्या माध्यमातून हिंदु राष्ट्राच्या कार्यात जिज्ञासूंनी स्वत:चा सहभाग वाढवावा ! – सद्गुरु (कु.) स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था
सत्सेवेच्या माध्यमातून हिंदु राष्ट्राच्या कार्यात जिज्ञासूंनी स्वत:चा सहभाग वाढवावा ! – सद्गुरु (कु.) स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था
Share this on :
सोलापूर आणि चिंचवड (पुणे) येथील जिज्ञासूंसाठी दोन दिवसांच्या ‘ऑनलाईन’ सत्संग सोहळ्याचे आयोजन
सोलापूर – जीवनात साधनेचे महत्त्व अनन्यसाधारण असून सत्सेवेच्या माध्यमातून मिळणार्या संधीचा अधिकाधिक लाभ करून घ्या. ईश्वरी नियोजनानुसार हिंदु राष्ट्र येणारच आहे. सत्सेवेच्या माध्यमातून जिज्ञासूंनी हिंदु राष्ट्राच्या कार्यात स्वतःचा सहभाग वाढवावा, असे आवाहन सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी केले. २० आणि २१ नोव्हेंबर या दिवशी चिंचवड (पुणे) आणि सोलापूर जिल्ह्यातील ‘साधना सत्संगा’मध्ये नियमित सहभागी होणार्या जिज्ञासूंसाठी ‘ऑनलाईन’ सत्संग सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी त्या मार्गदर्शन करत होत्या. या सोहळ्याला ३५० हून अधिक जिज्ञासू ‘ऑनलाईन’ सहभागी झाले होते. या दोन दिवसांच्या सत्संग सोहळ्याचे सूत्रसंचालन सनातनच्या साधिका सौ. मेघा जोशी आणि सौ. वंदना जोशी यांनी केले, तर कार्यक्रमाचा उद्देश सौ. सुनीता पंचाक्षरी आणि सौ. अनिता बुणगे यांनी सांगितला. सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांच्या अमूल्य मार्गदर्शनाने प्रभावित झालेल्या जिज्ञासूंनी साधना करण्यास आरंभ केल्यापासून आलेले अनुभव आणि अनुभूती यांचे उत्स्फूर्तपणे कथन केले.